' “आमचं काश्मीर सोडा” भारतीय क्रिकेटर्सचा शाहिद आफ्रिदीला दम! – InMarathi

“आमचं काश्मीर सोडा” भारतीय क्रिकेटर्सचा शाहिद आफ्रिदीला दम!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

पाकिस्तानचा माजी कर्णधार शहीद आफ्रिदी हा नेहेमी वादाच्या भोवऱ्यात असतो. पण ह्यावेळी तर त्याने भारत-पाकिस्तानची अगदी नाजूक नस पकडली आहे. म्हणजेच जम्मू-काश्मीर वाद. जम्मू-काश्मीर येथील परिस्थितीवर एक विवादित ट्वीट करून आफ्रिदीने एक नवा वाद छेडला आहे.

 

त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर भारताच्या झेंड्यासोबतचा एक फोटो शेअर करत त्यावर ट्वीट केले की, ‘आम्ही सर्वांचा आदर करतो. हे एक खेळाडू असण्याचे उदाहरण आहे. पण जेव्हा गोष्ट मानवी अधिकारांची येते तेव्हा आम्हाला असं वाटत की आमच्या निष्पाप काश्मिरी लोकांचाही आदर केला जावा.’

ह्यानंतरच्या ट्वीटमध्ये त्याने म्हटले की, ‘भारत अधिकृत काश्मीर ची स्थिती ही चिंताजनक आहे. येथे आत्मनिर्णय आणि स्वातंत्र्यासाठी आवाज उठविणाऱ्या निष्पाप लोकांना मारल्या जात आहे. मला आश्चर्य होत आहे की, संयुक्त राष्ट्र आणि इतर अंतरराष्ट्रीय संगठन कुठे आहेत? ते ह्या संघर्षाला थांबविण्यासाठी काही करत का नाहीत?’

 


गेल्या रविवारी जेव्हा भारतीय सेनेने जम्मू-काश्मीर येथील आतंकरोधी अभियानाअंतर्गत १३ आतंकवाद्यांना कंठस्नान घातलं. ह्याचं मुद्द्यावरून आफ्रिदीने काश्मीरची स्थिती ही चिंताजनक आणि बैचैन करणारी असल्याचं म्हणत संयुक्त राष्ट्र आणि इतर अंतरराष्ट्रीय संगठनांवर देखील पश्न उपस्थित केले आहेत.

आफ्रिदीच्या ह्या ट्वीटवरून आता सोशल मिडीयावर एक नवा वाद बघायला मिळतो आहे. ज्यावर आफ्रिदीच्या हाय ट्वीटसाठी त्याला खडे बोल सुनावले जात आहेत. इत्रांसोब्तच आपल्या क्रिकेट टीमच्या खेळाडूंनी देखील आफ्रिदीची चांगलीच शाळा घेतल्याचं दिसून येत आहे.

 

ह्यावर गौतम गंभीरने ट्वीट केले की, ‘आमच्या काश्मीर आणि संयुक्त राष्ट्रावर शाहीद आफ्रिदी केलेल्या ट्वीटवर रिएक्शन जाणून घेण्यासाठी मला अनेक मीडियातून कॉल आले की, ह्यावर तुमचं काय म्हणणं आहे? आफ्रिदीला केवळ संयुक्त राष्ट्र (UN) दिसत आहे, त्याच्या डिक्शनरीमध्ये ह्याचा अर्थ Under Nineteen असा आहे. मिडीयाला ह्याला सिरीअसली घ्यायला नको. आफ्रिदी हा नो-बॉलवर ऑउट होण्याचं सेलिब्रेशन करत आहे.’

 

बघुयात इतरांनी ह्यावर काय प्रक्रिया दिल्या आहेत :

 

 

कदाचित आफ्रिदीला आता वादाच्या भोवऱ्यात अडकायची सवय झालेली आहे. म्हणून तो अधून-मधून अश्या प्रकारच्या ट्वीट करत असतो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?