' तुलसी होणार अमेरिकेच्या प्रेसिडेंट?!.. अमेरिकेत इतिहास घडतोय…. – InMarathi

तुलसी होणार अमेरिकेच्या प्रेसिडेंट?!.. अमेरिकेत इतिहास घडतोय….

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्राची पहिली हिंदू रिप्रेझेंटेटिव्ह तुलसी गबार्ड यांनी जाहीर केले की २०२० मध्ये त्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाग घेणार आहेत.

तुलसी अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्राच्या काँग्रेसच्या पहिल्या सदस्य आहेत ज्यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून सदस्य पदाची शपथ घेतली होती.

गबार्ड यांच्या प्रतिष्ठेमुळे त्यांना बराचसा लोकतंत्रिक मतदार आहे. तुलसी डोनाल्ड ट्रम्प यांच्या पेक्षाही परखडपणे आपले मत मांडण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

कदाचित यामुळेच त्यांच्या पक्षातील इतर सदस्यांपेक्षाही त्यांना डोनाल्ड ट्रम्प प्रबळ उमेदवार मानतात. जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठ्या फरकाने हिलरी क्लिंटन यांना पराजित केले होते त्यावेळी तुलसी यांनी पुढे होऊन या जनमताचं स्वागत केलं होत.

 

tulsi-rump-nmarathi
rt.com

त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अजून एक अभ्यासण्यासारखा पैलू म्हणजे त्या त्यांची हिंदू म्हणून असणारी ओळख कुठेही लपवताना दिसत नाहीत. त्यांनी त्यांच्या मतदारांसोबत एक हळवं नात तयार करून ठेवलं आहे.

त्यांच्या भारतभेटी दरम्यान त्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्या, या भेटीच्या वेळी त्यांनी त्यांची स्वतःची भगवतगीतेची प्रत नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून दिली.

सप्टेंबर २०१४ मध्ये माननीय पंतप्रधान यांची भेट झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्ट मध्ये लिहिले होते की,

“अस म्हटलं जातं की आपण कोणालाही देऊ शकणारी सर्वात मोठी भेटवस्तू वस्तू कुठली असेल तर ती म्हणजे आपल्याला प्रिय असणारी वस्तू भेट म्हणून दिली पाहिजे. म्हणून मी आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझ्यातर्फे भगवतगीता सदिच्छा भेट म्हणून दिलेली आहे.”

गब्बार्ड यांनी, अमेरिकेने नरेंद्र मोदी यांना विसा नाकारल्यानंतर त्या निर्णयाविरुद्ध आवाज उठवला होता त्यांनी या सर्व प्रकाराला एक षडयंत्र असं नाव दिलेलं होत.

 

tulsi-modi-inmarathi
thehindu.com

नोव्हेंबर २०१३ मध्ये अमेरिकेच्या सदनामध्ये तुलसी यांनी एका प्रस्तावाला कडाडून विरोध केला होता तो प्रस्ताव म्हणजे धार्मिक स्वातंत्र्य आणि त्याच्याशी संबंधित मानवाधिकार यांचाही समावेश संयुक्त राष्ट्राच्या भारताशी चालणाऱ्या चर्चेमध्ये घेतलं गेलं पाहिजे.

त्याला विरोध करताना तुलसी यांनी असे सांगितले की,

“या प्रस्तावामुळे दोन देशांमधील संबंधांमध्ये ताण पडू शकतो आणि हे दोन्ही देशातील नागरिकांच्या दृष्टीने हितावह नाही. या प्रस्तावामुळे मेहनती अमेरिकन नागरिक मुख्यतः भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक यांच्या भावनिक मानवाधिकारांच उल्लंघन ठरेल. सबंध इतिहासात भारत हे असे राष्ट्र आहे ज्या राष्ट्रात अनेक प्रकारचे धर्म आणि पंथ यांचे संरक्षण केले जाते.”

तुलसी गबार्ड या इस्लामिक आतंकवाद हा शब्द वापरण्याला पाठिंबा देत नाहीत.

त्यांनी ओबामा यांच्या शासन काळातील याबाबतीतील एका निर्णयाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर एका मुलाखतीदरम्यान त्यांनी असे भाष्य केले की,

“संपूर्ण जगामध्ये जेवढे दहशतवादी हल्ले होतात त्यामध्ये जास्त करून हे हल्ले अशा समूहांकडून घडविले जातात जे समूह इस्लामिक विचारधारा हिंसात्मक पद्धतीने पुढे घेऊन जाण्यावर विश्वास ठेवतात. पण जेव्हा आपण इस्लामिक दहशतवाद म्हणून बघतो, माझ्या मते त्या वेळी आपण त्यातील गांभीर्य काढून टाकतो आणि विषयाला वेगळं वळण देतो.”

जरी तुलसी या हिंदू कुटुंबातील असल्या तरी त्या डेमोक्रेटिक पार्टीमध्ये परडॉक्स म्हणूनच ओळखल्या जातात. त्यांचीं अनेक बाबतीत अनेक मुद्द्यांवर असलेली मतही बदलताना दिसत आहेत. उदाहरणार्थ, आज त्या समलैंगिक विवाह पाठिंबा जरी देत असल्या तरी भूतकाळात त्यांनीच या विरुद्ध आवाज उठवलेला आपल्या निदर्शनास येईल.

 

Tulsi-inmarathi
WILX.com

त्या धार्मिक बाबतीत ‘भक्तिवेदांत’ या आश्रमाची सेवा करतात, त्या प्रसिद्ध स्वामी प्रभुपाद यांच्या शिष्य असून स्वामींनी अमेरिकेतील समाजाला उन्नतीकडे नेण्यासाठी मोठे काम केले आहे.

गब्बार्ड यांचा पाकिस्तानबद्दल असलेला सूरही भारतीयांना रुचेल असाच आहे. त्यांच असं म्हणणं आहे की,

“पाकिस्तानातील शासन व्यवस्था गेली कित्येक वर्ष दहशतवादाला पाठिंबा व खतपाणी घालण्यासाठी प्रयत्नशील आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ले जगासाठी नवीन नाहीत मागील पंधरा वर्षात या सर्वांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे आणि हे कुठेतरी थांबले पाहिजे.

त्यामुळेच अमेरिकन काँग्रेसमध्ये मी वेळोवेळी पाकिस्तानला मिळणारी मदत अमेरिकेकडून थांबलीच पाहिजे या मुद्द्याचा समर्थन करते आहे.”

तुलसी या पहिल्या हिंदु ठरल्या आहेत ज्या अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. त्यांच भारताबद्दल असे मत आहे की,

“माझ्या माहितीत भारतामध्ये मुसलमानांबद्दल कुठलाही दुजाभाव केला जात नाही आणि जर भारताने येत्या काळात अल्पसंख्यांकांवर अन्याय करणारा कुठलाही निर्णय घेतला तर मी त्याविरोधात आवाज उठवेल.”

 

gabbard-inmarathi
cnn.com

त्यातल्या त्यात गबार्ड यांच्याकडे जनमताला गवसणी घालण्यासाठी लागणारी ओळख आहे ती म्हनजे त्या एक महिला आहेत, त्या एका अल्पसंख्यांक समाजाच्या नेत्या आहेत, त्या स्त्रीशक्ती शक्तीच्या अमेरिकेतील समर्थक आहेत.

त्यांच्यासाठी चांगली गोष्ट म्हणजे त्यांचा उत्साही स्वभाव आणि त्यांनी कमी राजकीय वयामध्ये गाठलेला हा लांबचा पल्ला. त्यांनी आपल्या वयाच्या एकविसाव्या वर्षे राजकीय प्रवासाला सुरुवात केली.

त्यांच्यावर टीका करण्यासाठी त्यांचे विरोधक त्यांचे हिंदूंबद्दल असणारे मत तसेच नरेंद्र मोदी यांच्याशी असणारे संपर्क किंवा भारतीय जनता पार्टीबद्दल त्यांचे असणारे मत या सर्व गोष्टींवरून त्यांच्यावर टीका करण्यात येऊ शकते.

त्यांचे हिंदू अमेरिकन या फाउंडेशनशी जवळचे संबंध आहेत. या फाउंडेशनवर हिंदू राष्ट्राचा प्रचार व प्रसार करण्याचा आरोप आहे त्यामुळे डेमोक्रॅटिक पक्ष या सर्वांचा विचार करूनच त्यांना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार करायचं की नाही हे ठरवेल.

तुलसी खरंच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होतील का? कदाचित हो! वेळच या प्रश्नाचे नेमके उत्तर देऊ शकेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?