तरुणांनो नि लहानग्यांच्या मातांनो – “टू मिनिट्स मॅगी” चं हे भयंकर वास्तव तुम्हाला माहितीये का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लहान मुलांच्या आयांना, बॅचलर तरुणांना आणि मेस मधील जेवण खाऊन कंटाळलेल्यांना मॅगीने एक चविष्ट आणि झटपट तयार होणारा पदार्थ म्हणून एक सोपा पर्याय दिला. बाजारात मॅगीने इन्स्टंट नूडल्स म्हणून प्रचंड लोकप्रियता मिळवली.

पोहे, उपमा , थालीपीठ ह्यासारखे आपले पारंपरिक पदार्थ सोडून मॅगी खाणं हे मॉडर्नपणाचं लक्षण मानलं जाऊ लागलं.

लहान मुलं सुद्धा शाळेतून आल्यावर पोळी , चिवडा, पौष्टिक लाडू मागायचं सोडून आयांकडे मॅगी मागू लागली आणि आया सुद्धा ,”बस दो मिनिट” म्हणत मुलांना मॅगी देऊ लागल्या.

हॉस्टेल मध्ये राहणारे मुलं-मुली मेसचं जेवण खाऊन खाऊन कंटाळले की मॅगीचा आसरा घेऊ लागले.

मॅगीप्रमाणेच अन्य कंपन्यांनी आपापल्या “पौष्टिक इन्स्टंट नूडल्स, पास्ता” बाजारात आणले आणि आमचेच नूडल्स कसे चांगले, व्हिटॅमिन्स, फायबर युक्त, करण्यास सोपे आणि चविष्ट आहेत ह्याची सर्व ब्रॅण्ड्समध्ये स्पर्धाच लागली.

 

maggi-inmarathi
youtube

सर्वांची मॅगीवर गुजराण सुखा समाधानाने सुरु होती की अचानक २०१७ साली बॉम्ब पडला की मॅगी आरोग्यास घातक आहे. तरीही लोकांनी मॅगी खाणे सोडले नाही, पण कोर्टाच्या आदेशावरून हजारो किलो मॅगी अक्षरश: कचऱ्यात फेकून द्यावी लागली, नष्ट करावी लागली.

तरीही काही महिन्यांनी नेस्ले कंपनीने मॅगी परत बाजारात आणली आणि काहीही न झाल्यासारखे लोक त्यावर परत तुटून पडले.

गुरुवार ३ जानेवारी २०१९ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने नेस्ले कंपनीच्या विरुद्ध सुरु असलेल्या केसवरील स्टे उठवला. नेल्स कंपनीवर आरोप आहे की त्यांच्या मॅगी इन्स्टंट नूडल्स मध्ये लेडचे अंश आणि एमएसजी म्हणजेच मोनोसोडियम ग्लुटामेट आढळले आहे.

न्यायालयाने ही केस परत सुरु करण्याची परवानगी दिली आहे. नेस्ले कंपनीने कोर्टात हे मान्य केले आहे की त्यांच्या नूडल्समध्ये हे घातक पदार्थ आहेत.

नेस्लेच्या वकिलांनी कोर्टात हे मान्य केले आहे की मॅगी नूडल्स मध्ये लेड आणि एमएसजी ह्या घातक पदार्थांचे अंश आहेत. CFTRI म्हणजेच सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने मॅगी नूडल्सची जी सॅम्पल टेस्ट केली त्यात ह्या घातक पदार्थांचे अंश आढळले आहेत.

 

maggi-inmarathi
dnaindia.com

नेसले कंपनीने हे मान्य केले असले तरी त्यांचे असे म्हणणे आहे की त्यांच्या नूडल्समध्ये ह्या पदार्थांचे अंश permissible लिमिट मध्येच आहेत. Permissible limit म्हणजे परवानगी असलेल्या प्रमाणात असणे. पण तरीही विष हे विषच आहे.

ते थोड्या प्रमाणात असले तरी त्याचा आपल्या शरीरावर चांगला परिणाम न होता घातकच परिणाम होतो.

जी लहान लहान मुले लहानपणापासून हे थोड्या प्रमाणात का होईना पण हे विष खात आहेत , पुढे जाऊन त्यांच्या कोवळ्या शरीरावर घातकच परिणाम होणार आहे.

कोर्टाने सुद्धा हाच प्रश्न उपस्थित केला की परवानगी असलेल्या प्रमाणात का होईना पण त्यांच्या नूडल्समध्ये शिस्याचे अंश आहेत, मग हे नूडल्स लोकांनी का खायचे?

ह्या निमित्ताने हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे की भारतात करोडो लोक जे अन्न खातात जे कितपत खाण्यायोग्य आहे? किती सुरक्षित आहे?

आता मॅगीचेच बघा. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते शिसे हे क्युमिलेटिव्ह टॉक्सिकन्ट म्हणजेच शरीरात संचय होऊ शकणारा विषारी पदार्थ आहे. शिस्याचा आपल्या शरीरातील अनेक प्रणालींवर घातक परिणाम होतो. आपल्या यकृत आणि मूत्रपिंडांसाठी तर हे अतिशय घातक आहे.

 

lead-inmarathi
indianexpress.com

खास करून लहान बाळांसाठी आणि गरोदर स्त्रियांसाठी तर हे विषच आहे. कारण ह्याने बाळांची सेंट्रल नर्व्हस सिस्टीम निकामी होऊ शकते. लेड किंवा शिसे हा धातू जड असल्याने त्याचा हाडे व दातांमध्ये संचय होतो.

गरोदर स्त्रियांमध्ये जर शिसे दीर्घ काळापर्यंत शरीराच्या संपर्कात आले तर त्याने गर्भपात होऊ शकतो शिवाय अर्भक कमी वजनाचे जन्माला येऊ शकते व अर्भकात काही व्यंग तयार होऊ शकते.

मोनोसोडियम ग्लुटामेट किंवा एमएसजी हे अनेक पदार्थांत प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून वापरले जाते. पण हे सुद्धा शरीरासाठी घातकच आहे. हे एक अमिनो ऍसिड आहे. हे आपल्या शरीरात सुद्धा काही प्रमाणात आढळते. ह्याने पदार्थाला एक विशिष्ट चव येते म्हणूनच बऱ्याचश्या चायनीज पदार्थांत ह्याचा सढळहस्ते वापर केला जातो.

पदार्थ टिकवून ठेवण्यासाठी हे वापरतात म्हणून कॅन केलेल्या भाज्या, रेडिमेड सूप्स, प्रोसेस केलेले मांस ह्या पदार्थांत हे असते.

परंतु जास्त प्रमाणात एमएसजीचे किंवा साध्या भाषेत आपण ज्याला अजिनोमोटो म्हणतो त्याचे सेवन केल्यास शरीरावर गंभीर परिणाम होतात. जास्त प्रमाणात एमएसजी शरीरात गेल्यास त्याने डोकेदुखी, मळमळ, अति प्रमाणात घाम येणे, छातीत दुखणे, तसेच चेहेऱ्याची आग होणे, मानेला व इतर ठिकाणी मुंग्या आल्याची भावना होणे असा त्रास होतो.

 

pain-inmarathi
webmd.com

डॉक्टर असेही सांगतात की जास्त प्रमाणात एमएसजीचे सेवन केल्यास त्याने दमा होऊ शकतो व काही वेळा मेंदू सुद्धा निकामी होऊ शकतो.

एमएसजीमुळेच काही लोकांना चायनीज पदार्थ खाल्ल्यानंतर त्रास होतो. FDA च्या नियमानुसार एमएसजी घातक नाही. पण जास्त प्रमाणात ह्याचे सेवन केल्यास शरीरावर दुष्परिणाम होतात हे हि तितकेच सत्य आहे.

म्हणजेच थोडक्यात हे जे फास्ट फूड ,जंक फूड आहे ते कितीही चविष्ट लागत असले, कितीही झटपट बनत असले तरीही ते एक प्रकारचे विषच आहे. आपल्या आसपास तसेही वातावरण आधीसारखे चांगले राहिलेले नाही.

अन्नपदार्थांत भेसळ,  प्रदूषणयुक्त हवा, पाणी, आपली जीवनशैली ह्याने तसेही आपल्या शरीरावर गंभीर परिणाम होत आहेत. त्यात हे असे विष असलेले पदार्थ खाऊन आपण स्वत:च्याच शरीराची काय अवस्था करून घेत आहोत?

आपल्या घरच्या लहान लहान मुलांना चवीच्या, फॅशनच्या नावाखाली कुठले विष खायला घालत आहोत आणि त्यामुळे त्यांच्या कोवळ्या शरीरावर किती घातक परिणाम होणार आहेत ह्याचा आपण विचार करायला हवा.

 

maggi-inmarathi
india.com

आता तर ह्या कंपनीने स्वत:च मान्य केले आहे की त्यांच्या पदार्थांत हे शिसे आणि एमएसजी आहे, ते कितीही कमी प्रमाणात असले तरी ते घातकच आहेत.

त्यामुळे आपले पारंपरिक घरचे पौष्टिक पदार्थ खायचे की झटपट होणारे जंक फूड खाऊन झटपट शरीर खराब करून घ्यायचे हे आता आपल्याच हातात आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

4 thoughts on “तरुणांनो नि लहानग्यांच्या मातांनो – “टू मिनिट्स मॅगी” चं हे भयंकर वास्तव तुम्हाला माहितीये का?

 • January 13, 2019 at 9:23 am
  Permalink

  nice

  Reply
 • January 13, 2019 at 9:40 am
  Permalink

  ??

  Reply
 • January 20, 2019 at 2:33 pm
  Permalink

  फक्त चवीसाठी व जिभेचे चोचले पुरविण्यासाठी खाणे म्हणजे तरुणाईने स्वत:ला, स्वत:च्या प्रौढावस्थेत आणि पुढच्या पिढीला शिक्षा देण्यासारखेच आहे.एकतर सध्या कृत्रिम खतांवर घेतली जाणारी पिके, त्यावर फवारले जाणारी घातक रसायने, यामुळे धान्ये, कडधान्ये,फळे, भाज्या हेच पूर्वी सारखे शुध्द राहिले नाही. त्यात घातक ‘प्रीझर्वेटिव्ह’ टाकून तयार केलेले जंकफुड किती घातक असेल?! ते टाळणेच चांगले!

  Reply
 • January 26, 2019 at 1:58 pm
  Permalink

  खूप

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?