इतिहासातील काही रहस्यमयी मृत्यूंचा आणि खुनांचा अखेर छडा लागला !

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

असं म्हणतात की ह्या जगातील सर्व प्रश्नांची उत्तरं विज्ञानाकडे आहेत. पण काही प्रश्न असे असतात ज्यांची उत्तर विज्ञानही देऊ शकत नाही. अश्याच काही ऐतिहासिक मृत्यूंचा छडा अखेर लागला आहे.

इतिहासाच्या पानांत काही अश्या मृत्यूंचा उल्लेख आहे ज्यांचं रहस्य आजवर उलगडलेलं नव्हतं. ह्या घटना अतिशय रहस्यमयी आणि त्रासदायक देखील होत्या. पण अखेर विज्ञान जिंकलं आणि त्या रहस्यमयी मृत्यूंचा छडा लावला.

तळघरात सापडलेला मुलाच्या हाडांचा सापळा :

 

boy-skeleton-inmarathi
topyaps.com

मॅरीलॅंडमध्ये १९९१ साली एका १६ वर्षांच्या मुलाचा हाडांचा सापळा आढळला होता. नंतर अशी माहिती मिळाली की एरीन कुलेन नावाच्या व्यक्तीला खोदकाम करत असताना सापडलेला हा हाडांचा सापळा खूप वर्षांपूर्वीचा आहे.

वैज्ञानिक तपासानंतर असे कळाले की, हा हाडांचा सापळा एका कोकेशियन व्यक्तीचा आहे. ज्याला १६६५ ते १६७५ दरम्यान पुरण्यात आले असावे.

फॉरेंसिक तपासात कळाले की त्या व्यक्तीचं दात, स्पाईन आणि मनगटाचे हाड तुटलेलं होतं.

त्यावर वैज्ञानिकांनी असा निष्कर्ष काढला की ही व्यक्ती कदाचित त्या घरची नोकर असेल, ज्याचं शोषण केल्यानंतर त्याला मारून पुरण्यात आले. जेणेकरून कुणालाही काही माहित होऊ नये.

नेपोलियनच्या मृत्युचं रहस्य :

 

napoleon-inmarathi
npr.org

फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्ट ह्यांचा १८२१ साली सेंट हेलेना बेट येथे मृत्यू झाला. युद्धात पराजय झाल्यानंतर नेपोलियनला ह्या बेटावर निर्वासित करण्यात आले होते.

डॉक्टरांच्या मते त्यांचा मृत्यू हा पटातील अल्सरमुळे झाला होता. पण अनेक लोकांच्या मते त्यांना ब्रिटीश कैदींनी त्यांना विष देऊन मारलं.

२००७ साली वैज्ञानिकांनी आधुनिक टेक्निकच्या मदतीने नेपोलियन च्या मृत्युची पुन्हा तपासणी केली, ज्यामध्ये त्यांच्या केसांत खूप मोठ्या प्रमाणात अर्सेनिक हे विष आढळलं.

पण त्यांच्या शरीरात विष आढळलं नाही. तर त्यांच्या पोटात घाव आणि रक्तस्त्राव आढळून आला. ज्यावरून हाचं निष्कर्ष निघाला की, त्यांचा मृत्यूही पोटाच्या कॅन्सरने झाला.

जेचरी टेलर ह्यांचा खून झाला होता? :

 

taylor-inmarathi
history.com

अमेरिकेचे १२ वे राष्ट्रपती जेचरी टेलर ह्यांचा ९ जुलै १८५० ला मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांच्या मृत्युचं कारण पोटाचा आजार असल्याचं सांगितलं. पण नंतर त्यांच्या मृत्युचं आणखी एक कारण समोर आलं.

टेलर ह्यांच्यावर कादंबरी लिहिणाऱ्या इतिहासकार क्लारा राइजिन्ग ह्यांच्या मते त्यांचा मृत्यू हा कुठल्या विकारामुळे झालेला नाही, तर त्यांचा मृत्यू ज्या प्रकारे झाला त्याची लक्षणं काही वेगळी होती, म्हणजे त्यांचा मृत्यू जसा झाला असं तेव्हाच होतं जेव्हा एखाद्या व्यक्तीला अर्सेनिक हे विष दिलं जातं.

जेव्हा जेचरी हे राष्ट्रपती होते, तेव्हा अमेरिकेत गुलामगिरीची प्रथा खूप प्रचलित होती आणि जेचरी ह्यांनी त्याचा अवधी आणखी वाढवला होता. पण त्यांनी ही प्रथा रद्द केली नाही म्हणून लोक त्यांच्यावर नाराज होते. म्हणून कदाचित कोणी त्यांना हे विष दिलं असावं. ह्यानंतर अनेक फॉरेंसिक एक्सपर्टने त्यांच्या मृत शरीराची तपासणी केली.

ज्यानंतर फॉरेंसिक एक्सपर्टला राष्ट्रपती जेचर ह्यांच्या शरीरात आर्सेनिक आढळलं. पण तरी त्यांच्या शरीरात हे विष आहे की नाही ह्याचा काहीही पुरावा मिळालेला नाही. म्हणून त्यांच्या मृत्यूला नैसर्गिक मृत्यू मानलं गेलं.

टाईको ब्राहे ह्यांचा मृत्यू कसा झाला? :

 

tycho brahe-inmarathi
smithsonianmag.com

टाईको ब्राहे हे एक प्रसिद्ध डॅनिश खगोलशास्त्रज्ञ होते. १६०१ साली ब्लॅडर इन्फेक्शनमुळे टाईको ह्यांचा मृत्यू झाला. पण नंतर असं म्हटलं गेलं की, त्यांचे सहायक जोहान्स केप्लर ह्याने टाईको ह्यांना विष देऊन त्यांची हत्या केली.

ज्यासाठी त्याने पाऱ्याचा वापर केला. पण २०१० साली वैज्ञानिकांनी त्यांच्या शरीराची जेव्हा पुन्हा तपासणी केली तेव्हा त्यांच्या शरीरात कुठेही पारा आढळला नाही.

तपासणी दरम्यान समोर आलं की, ब्लॅडर म्हणजेच मूत्राशय फाटल्याने त्यांचा मृत्यू झाला.

त्यावरून असा अंदाज वर्तविण्यात आला की, टाईको हे मेजवानी मध्ये बसले असताना त्यांना तिथून उठून बठ्रून जाणे हे लाजिरवाणे वाटले, ज्यानंतर त्यांच मूत्राशय फाटलं किंवा त्यांच्या किडनीमध्ये इन्फेक्शन झालं ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

विहिरीतील हाडांच्या सापळ्याचा ढीग :

 

norvich-inmarathi
topyaps.com

२००४ साली नॉर्विच येथे पुरातत्व विभागाच्या लोकांना खोदकामात एका विहिरीतून १७ लोकांच्या हाडाचे सापळे आढळून आले. आधी वाटलं की कदाचित ह्या लोकांचा मृत्यू हा प्लेग ह्या आजाराने झाला असावा, पण कार्बन डेटिंग वरून असं समोर आलं की, हे सापळे १२ व्या किंवा १३ व्या शतकातील आहेत.

आणि त्या वेळी इंग्लंड येथे प्लेगची साथ नव्हतीच. ह्यानंतर डीएनए, बोन केमिकल, कार्बन डेटिंग तपासणी आणि ऐतिहासिक तथ्यांच्या आधारे संशोधकांना हे आढळून आलं की, १७ मधून ५ सापळे हे एकाच यहुदी कुटुंबातील होते.

त्यांनी ह्यावरून असा निष्कर्ष काढला की, कदाचित त्या लोकांचे शोषण झाले असावे. पण त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण काळालं नाही.

पुराव्यांच्या आधारे असा निष्कर्ष काढण्यात आला की, ह्या सर्वांनी सामुहिक आत्महत्या केली असेलं किंवा त्यांची हत्या करण्यात आली असेल. ह्या सापळ्यांच्या अवशेषांना नंतर यहुदीच्या कब्रस्तानात दफन करण्यात आलं.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?