शापित सरस्वती! : परळी वैजनाथ मधील स्त्री भ्रूण हत्येचं वास्तव (भाग १) : जोशींची तासिका

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

देशात आणि खासकरून महाराष्ट्रात स्त्रीभ्रूणहत्या प्रकरण आलं की सर्वात पहिले आमचे प्रसारमाध्यमं परळी वैजनाथ येथील सरस्वती व सुदाम या मुंडे दांपत्याचा अगत्याने उल्लेख करतात. सध्या या दांपत्यावर काही खटले सुरू आहेत. काहींचे निकाल आगामी एक – दोन महिन्यांत अपेक्षित आहेत. सुदाम मुंडे सध्या औरंगाबाद कारागृहात आहेत तर सरस्वती मुंडे जामिनावर आहेत. त्यामुळे हा लेख लिहिताना न्याय व्यवस्थेचा अधिक्षेप करणे किंवा या प्रकरणात dilution आणणे हा अजिबात उद्देश नाही.

ह्या लेखाद्वारे मुंडे दांपत्याचे उदात्तीकरण करण्याचा कोणताही हेत्वार्थ नसून या प्रकरणातील नाहीतर आशा कित्येक प्रकरणातील अन्वयार्थ शोधणे हाच माफक उद्देश आहे.

 

या देशात संविधानाने प्रत्येकाला मानवाधिकार दिलेले आहेत अगदी फाशीची शिक्षा झालेल्या कैद्यालासुद्धा, इथे तर प्रकरण अजून जिल्हा न्यायालयात सुरू आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेचा संपूर्ण आदर आणि सन्मान राखून माझ्याजवळ अनेकांनी खाजगीत व्यक्त केलेल्या भावना लिहीत आहे.

कोण आहेत सरस्वती मुंडे?

१७ मे १९५७ रोजी अंबेजोगाई तालुक्यातील डोंगरपिंपळा येथील केंद्रे कुटुंबात जन्मलेल्या या सरस्वतीला वडिलांचा चेहराही कळत नव्हता त्या दीड-दोन वर्षांच्या नकळत्या वयात आईसोबत आजोळी जावे लागले. पुढे सनगांव येथील मुंडे आजोबांनी बाईंना फुलासारखे जपले. (इथून पुढे लेखात सरस्वती मुंडेंचा उल्लेख बाई असा केलेला असेल कारण मी लहानपणी त्यांना अनेकजण बाई म्हणूनच केलेला ऐकलेला आहे.)

बाईंचे प्राथमिक, माध्यमिक अन उच्च माध्यमिक शिक्षण अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयात झाले. सन १९७३ ला दहावी व सन १९७५ ला बारावीत बाई गुणवत्ता यादीत झळकल्या. पुढे १९७५ साली अंबेजोगाईलाच सुरू झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचमध्ये प्रवेश घेऊन उत्कृष्ट गुणांनी १९८० साली डॉक्टर झाल्या.

अशा रितीने सरस्वतीने अधिकृतरित्या वैद्यकीय क्षेत्रात डॉ. सरस्वती म्हणून आपले पहिले पाऊल टाकले. त्याच वर्षी लगेचच बाई तीन वर्षे जेष्ठ असणाऱ्या आणि औरंगाबादमध्ये वैद्यकीय शिक्षणात सुवर्ण पदक प्राप्त मूळच्या सारडगांव येथील डॉ. सुदाम मुंडेंशी विवाहबद्ध झाल्या.

परळी वैजनाथ आणि मुंडे दांपत्य

परळीत जेव्हा मुंडे दांपत्य आले तेव्हा त्यांच्याकडे डॉक्टर म्हणून शासकीय मान्यतेच्या सनदेशिवाय स्वतःचे असे काहीच नव्हते. एक टेबल आणि दोन खुर्च्या असा येथील सुभाष चौकातील नरवाडकर यांच्या वाड्यात दवाखाना तर परमार कॉलनीत भाड्याचे घर असा त्यांच्या व्यवसायाचा श्रीगणेशा झाला.

दरम्यान महात्मा गांधींना आदर्श मानणाऱ्या बाईंच्या संसारवेलीवर २ ऑक्टोबर १९८४ रोजी प्रियदर्शनी (पियू) नावाची कन्या बहरून आली. एक मुलगी झाल्यानंतर बाईंनी आपले स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून शिक्षण पूर्ण केले. पुढे आपल्या मेहनतीवर या दांपत्याने प्रगतीचे अनेक शिखरे पादाक्रांत केले.

अनेक लोक जसे जोडल्या गेले तसे कित्येक जवळचे हितशत्रू निर्माण झाले. परळीने मुंडे कुटुंबियांना ऐश्वर्य दिलं, किर्ती दिली, भरभरून प्रेम दिलं. पण, अचानक असं काय झालं की धन्वंतरी वाटणार हे दांपत्य जगाला राक्षस वाटू लागलं?

इथे सुरू होते वाईटातील वाईट बाजू, द्वेष, ईर्षा, मत्सर, अत्याचार आणि सत्तेचा मदांध वापर.

पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही. जर का यशस्वी झालात तर नसलेली नाती सुद्धा बोलती होतात. आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात. पण, दुर्गुणांवर चर्चा सुरु झाली की मुकेही बोलू लागतात याच नियमाप्रमाणे जे लोक्स कधीकाळी बाईंच्या उंबरठ्यावर लाचारासारखे लाळघोटेपणा करायचे तेच आता त्यांना साधी ओळखही दाखवत नाही. कारण सरळ आहे, “गरज सरो वैद्य मरो…”

गरज सरो वैद्य मरो…

“डॉ. मुंडेंनी एक अख्खा भावी मतदारसंघ लुप्त केला.” “डॉ. मुंडेंचा दवाखाना म्हणजे मृत्यूची गुहा”, “मृत भ्रूण कुत्र्याला खाऊ घालणारे दुष्ट” आदी रसभरीत किंवा करूणरुदन करणाऱ्या अतिरंजित कथा दूरचित्रवाणीवर बघून कोण्याही पाषाणहृदयी व्यक्तीलासुद्धा मुंडे दांपत्य खाटीक / कसाई वाटले नसते तर नवलच.

जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर एका लेखात भ्रूणहत्येविषयी म्हणतात –

“अवांच्छित अर्भकाची हत्या कोणी भलतासलता करू शकत नाही. त्या गर्भाची माता किंवा तिच्या कुटुंबातले लोकच अशा हत्या करीत असतात. अन्य कोणी त्यामध्ये सहभागी होत असेल, तर तो निव्वळ त्यातला मदतनीस असतो. त्यात त्याचा कुठला व्यक्तीगत हेतू असू शकत नाही. मातेला वा कुटुंबातल्याच लोकांना नको झालेले मूल म्हणून असे गर्भपात वा भृणहत्या होत असतात. सहाजिकच त्यातला कपाळकरंटेपणा वा नतद्रष्टता असेल, तर ती आप्तस्वकीयांची असते. नरडीला नख लावणारे त्या अर्भकाचे आप्तस्वकीय वा जन्मदातेच असतात.”

मलाही भाऊंचे म्हणणे मनोमन पटते. आमच्या गावराण भाषेत सांगायचे तर कुटुंबातील सदस्यांनी झक मारली नाही तर मुंडे दांपत्यच काय, इतर कोणीही गर्भपात करू शकेल का – याचा विचार झाला पाहिजे. ज्यांच्यावर बाईंनी जाणते-अजाणतेपणी उपकार केले तेच आता कंठशोष करत आहेत याच्यापेक्षा दुर्दैवविलास तो काय? बव्हंशी समाज हा दुतोंडी गांडुळासारखा असतो. ज्याची चलती असते तिकडे तो आपोआपच जातो. हा लोकशाहीचा शाप की अभिशाप हे आजवर अनेकांनी शोधायचा प्रयत्न केला असेल. पण किती जणांना त्याचे उत्तर सापडले असावे हा वेगळ्या संशोधनाचा विषय आहे.

पुनःश्च एकदा सांगतो, बाई दोषी की नाहीत हे संपूर्णपणे न्यायमंदिर ठरवेल आणि ते सर्वमान्य असेल पण उगाच एखाद्याचा फायदा घेऊन त्याला किंवा तिला अवांच्छितपणे बदनाम करणे कितपत योग्य ह्याचा ज्याचा त्याने विचार करावा.

पुढील भागात वैद्यकीय शास्त्रानुसार गर्भपात म्हणजे काय, त्याचे PCPNDT सारखे कायदे, संयुक्त राष्ट्राची, पोलीस तसेच वकिलांची भूमिका, गर्भपाताची बायोमेडिकल इंजिनिअरिंग बाजू, प्रसारमाध्यमांचे याबाबतचे प्रताप तसेच सरस्वती मुंडे आणि महात्मा गांधींचे नाते, सरस्वती मुंडेंनी डॉक्टर होऊन नेमकं काय गमावलं अन काय कमावलं आदी गोष्टींचे कोणी विच्छेदन म्हणेल पण माझ्या मते विश्लेषण करण्याचा प्रयत्न असेल.

जय हिंद!

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

5 thoughts on “शापित सरस्वती! : परळी वैजनाथ मधील स्त्री भ्रूण हत्येचं वास्तव (भाग १) : जोशींची तासिका

 • February 7, 2019 at 12:33 pm
  Permalink

  अर्धाच आहे

  Reply
 • February 7, 2019 at 12:52 pm
  Permalink

  हे असले अर्धवट लेख टाकून तुम्हाला काय आनंद मिळतो? कालही २-३ लेखांबाबत असेच झाले. तुम्ही आमचा वेळ अशा प्रकारे वाया घालवू नका.तुम्हाला चांगले वाचक नको असल्यास तसे स्पष्ट आणि अधिकृतपणे सांगा

  Reply
 • February 8, 2019 at 8:16 am
  Permalink

  कितीही नाही म्हटलं तरी हे उदात्तीकरण च आहे असं वाटतंय.
  इन मराठी चुकीचा पायंडा पडतेय अस आजकाल वाटतं.

  Reply
 • February 12, 2019 at 6:55 am
  Permalink

  मूर्ख माणसा,तुझी अक्कल शेण खायला गेली आहे का?लोकांचा बुद्धीभ्रम करायला बघतोस का?हे छुपे उदात्तीकरण कशाला करतोयस?अरे गाढवा,सर्वसामान्य लोकांच्या बुध्द्यांकानुसार उच्चशिक्षित डाॅक्टरांनी वागायचं असतं का?लोकांचं प्रबोधन करण्याऐवजी गर्भपात करणाऱ्या डाॅक्टरांची भलामण करतोस मादरचोद. आणि वर साळसूदपणाचा आव आणतोस बघा तिची आणि तिच्या घरच्यांचीच इच्छा नव्हती म्हणून डाॅक्टरांचा नाईलाज झाला.मग अश्याच प्रकारे डाॅ. प्रकाश आमटेसुध्दा वागू शकले असते.नशिब न्यायालयाने तुझ्यासारख्या भाडखाउंसारखा विचार केला नाही.

  Reply
  • May 15, 2019 at 12:55 am
   Permalink

   अबे मूर्खा लेखकाने यात मुंडे दाम्पत्य दोषी नाहीच असे कुठे म्हटलेय? त्यांना योग्य शिक्षा मिळणार आहेच पण त्यांनी स्वतःहून पकडून पकडून आणून लोकांना गर्भपात करायला लावला का? त्यांनी प्रबोधन करायला हवे होते हे बरोबर परंतु असा निर्णय घेतलेले लोक बालिश असतात असे वाटते का तुला? अशा लोकांनी पूर्ण विचारांतीच असा निर्णय घेतलेला असतो आणि एखादा डॉक्टर करायला नाही म्हणाला तर दुसरे अनेक ऑप्शन असतात लोकांकडे.. इतर गोष्टींप्रमाणे ही गोष्टही “गरज आहे तोपर्यंत पुरवठा होत राहणार” या जगाच्या साध्या सिद्धांतावर आधारलेली आहे.

   लेखकाने इथे फक्त समाजाला त्यांचा आरसा दाखवण्याचा प्रयत्न केलाय..समजतंय का बघ.

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?