' चीनमध्ये करोनाग्रस्त रुग्णांसोबत काय होतंय? वाचा, व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य – InMarathi

चीनमध्ये करोनाग्रस्त रुग्णांसोबत काय होतंय? वाचा, व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

=== 

कोरोना व्हायरसने चीनमध्ये थैमान माजवलेलं आहे. संपूर्ण जगात सध्या या व्हायरसमुळे भीतीच्या वातावरणात आहे. या व्हायरसमुळे चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे.

असं म्हटलं जातं की, चिनी लोकांच्या असंतुलित मांसाहारामुळे अशा प्रकारचा व्हायरस चीनमध्ये पसरत गेला, तर काही ठिकाणी असे देखील सांगितले जाते की, कोरोना वायरस म्हणजे जागतिक केमिकल युद्धाची नांदी आहे.

 

wuhan fish market inmarathi
south china morning post

 

कारण चीनने दुसऱ्या देशांना अपाय पोहोचवण्यासाठी अशा प्रकारचा व्हायरस तयार केला होता आणि अपघाताने तो व्हायरस चीनमध्येच लिक झाला, कथा काहीही असो, पण सत्य मात्र हेच आहे की कोरोना व्हायरस चीनमध्ये झपाट्याने पसरत चालला आहे.

या व्हायरसमुळे फक्त चीन नव्हे तर संपूर्ण जगाच्या आर्थिक घटकांवर परिणाम घडत असल्याचं दिसून आलं आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने देखील पूर्ण व्हायरसला जागतिक संकट म्हणून घोषित केलेलं आहे.

 

corona virus 7 inmarathi
natural news

 

एवढं सगळं होऊनही चीन कुठेतरी या व्हायरस बद्दल माहिती लपवत असल्याचा संशय आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त करण्यात येतोय. चीन सरकारच्या म्हणण्यानुसार, आजपर्यंत १७००० चिनी नागरिकांना या व्हायरसची बाधा हा झालेली आहे.

त्यातील काही लोकांचा मृत्यू देखील झालेला आहे. हा आकडा कितपत योग्य आहे याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे कारण, जर तुम्ही थोडा अभ्यास केला तर लक्षात येईल की अनेक वेगवेगळ्या संस्था कोरोना व्हायरस बाबत वेगवेगळे आकडे देताना दिसून येईल.

त्यामुळे, चीन सरकारने दिलेल्या आकडा विश्वासार्ह आहे की नाही याबाबत अजूनही साशंकता आहे.

 

corona virus 1 inmarathi '

 

चीनमध्ये या व्हायरसने थैमान घातलेले असताना काही दिवसांपूर्वी आपल्याकडे एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये चीन सरकार तेथील कोरोना व्हायरस बाधित लोकांना मारत असल्याचे दाखविण्यात आले होते.

परंतु काय आहे या व्हिडिओ मागील सत्य जाणून घेऊयात…..

 

CGTN

कोरोना व्हायरस चीनमध्ये लीक झाला आहे हे कळताच चीन सरकारने अनेक प्रतिबंधात्मक पावलं तात्काळ उचललेली होती. मागच्या काही दिवसांपासून या व्हायरसमुळे जगभरामध्ये मोठ्या प्रमाणावर ती भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

या व्हायरस बाबत रोज नवीन अफवा पसरवण्याचे काम काही समाजकंटकांकडून करण्यात येत आहे. याचाच भाग की काय म्हणून एक व्हिडिओदेखील भारतामध्ये प्रसारित करण्यात आला.

ज्यामध्ये हातात बंदुका असलेले लोक दिसत आहेत, काही अंतर चालल्यानंतर रस्त्याशेजारी एक माणूस बेशुद्धावस्थेत पडलेला आपल्याला दिसून येईल हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर झाल्यामुळे लोकांमध्ये गैरसमज पसरला गेला.

त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार होत आहे. हा व्हिडीओ कंगना रणौतच्या बहिणीने देखील शेअर केला आहे. तिनं यात दावा केला आहे की, चीनमध्ये जवळपास  हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

 

 

तसेच व्हायरसमुळे बाधित लोकांना चीन गोळी मारून ठार करण्याचा प्रयत्न‌ करत आहे.

प्रथमदर्शनी जर आपण हा व्हिडिओ बघितला तर आपल्याला वर लिहिलेल्या सर्व गोष्टी सत्य वाटू लागतात, परंतु जेव्हा तुम्ही परत परत हा व्हिडीओ बघाल तेव्हा लक्षात येईल की हा व्हिडीओ तब्बल चार भागांमध्ये विभागलेला आहे.

या व्हिडिओमध्ये अनेक वेगवेगळ्या क्लिप्स चा देखील मोठ्या युक्तीने फायदा केलेला आहे. यात पहिल्या पंधरा सेकंदाच्या भागात तुम्हाला ३ पोलिस हातामध्ये बंदूक घेऊन एका कार शेजारी उभे असलेले दिसून येतील.

त्यानंतर पुढच्या २१ सेकंदांपर्यंतच्या काळात तेच तीन लोक हातात बंदूक घेऊन एका अपार्टमेंटच्या दिशेने जाताना दिसतील. त्यानंतर २२ ते ३५ सेकंदाच्या काळात तिथे रस्त्यावर रहदारीमुळे येणारी-जाणारी लोक तुम्हाला दिसून येतील त्यासोबतच इतर लोक जवळूनच प्रवास करत असल्याचं लक्षात येईल.

एक गोष्ट लक्षात घ्या, व्हिडिओच्या या भागामध्ये हे तुमच्या लक्षात येईल की, रस्त्यावरची वर्दळ अत्यंत व्यवस्थित पद्धतीने चालू आहे. जर हा व्हिडीओ खरंच कोरोना व्हायरसचा असेल तर विचार करा चीनमध्ये सध्या कोरोना व्हायरसमुळे थैमान माजलेलं आहे.

या व्हायरसच्या भीतीमुळे कितीतरी लोक घराच्या बाहेर देखील पडणं पसंत करत नाहीत. संपूर्ण वुहान शहर बंद आहे. कोणीही घराच्या बाहेर पडत नाही आहे, मग या व्हिडिओमध्ये असणारी वर्दळ कोठून आली?

 

corona virus 6 inmarathi

 

व्हिडिओच्या बॅकग्राऊंड मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वर्दळीचा आवाज देखील तुम्हाला ऐकू येईल.

चौथ्या आणि शेवटच्या भागात रस्त्याशेजारी दोन लोक दिसत आहेत. या दोघांपैकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट होत आहे. या व्हिडिओमध्ये इतर अनेक वैद्यकीय कर्मचारी देखील उपस्थित असल्याचं दिसत आहे जे सर्वार्थाने अशक्य आहे.

कारण चीनने इतर देशांकडूनच प्रोटेक्टिव्ह फेस मास्कची मागणी केलेली आहे. वैद्यकीय पथकाला संपूर्ण दिवसभरात अशा चार फेस मास्क ची आवश्यकता असल्याचं चीन सरकारने म्हटलं आहे.

 

corona virus 9 inmarathi
business magzine

 

अशा भयानक परिस्थिती चीन मध्ये असताना या व्हिडिओमध्ये वैद्यकीय पथक सोडलं तर इतर कोणाच्याही चेहऱ्यावरती तुम्हाला साधं मास्क देखील दिसत नाही. हे कसं शक्य आहे.

शेवटच्या टप्प्यात जेव्हा वैद्यकीय पथक फिरत आहे तेव्हा देखील काही लोक कोणत्याही मास्क शिवाय तिथून जाताना दिसतात. हे देखील सध्याच्या परिस्थितीमध्ये चीनमध्ये अशक्यच आहे.

कारण आधी सांगितल्याप्रमाणे चीनमध्ये कोणीही घराच्या बाहेर पडायचा धोका पत्करत नाही. कोरोना व्हायरसची एवढी भीती असताना रस्त्यावरती मास्क न घालता फिरण्याचा धोका आणि त्यामुळे जीव गमावण्याचा धोका कोण पत्करेल एवढाच विचार करा.

 

China-coronavirus feature InMaarthi

 

या व्हिडिओच्या शेवटी जर तुम्ही नीट लक्ष दिले तर लक्षात येईल की एक पिवळ्या रंगाचे जॅकेट घातलेली व्यक्ती खाली पडलेली दिसत आहे. यावरून france24 ऑब्झर्वरने असे म्हटले आहे की, या व्हिडिओचा आणि कोरोना या व्हायरसचा काहीही संबंध नाही. 

कारण वूजू नावाच्या शहरामध्ये काही दिवसांपूर्वी एक अपघात घडला होता. वूजू हे शहर वूहान या शहरापासून तब्बल दोनशे किलोमीटर अंतरावर आहे आणि आपल्यापर्यंत आलेला हा व्हिडीओ त्याच जुन्या अपघाताचा व्हिडिओ आहे.

दुचाकी अपघाताच्या ठिकाणचे हे दृश्य आहे. २९ जानेवारीला अशा प्रकारचा अपघात वूजू या शहरांमध्ये झाला होता. जुन्या काही व्हिडीओच्या मदतीने अफवा पसरवली जात आहे.

या अपघातामुळे झालेली मोडतोड देखील आपण या व्हिडिओमध्ये सहजरित्या बघू शकतो, त्यामुळे लक्षात घ्या कोरोना ग्रस्त लोकांना गोळी मारून ठार केल्याचा दावा साफ चुकीचा आहे.

चीनमध्ये जेव्हा कोरोना व्हायरस पसरला तेव्हा चीन सरकारने आवश्यक ती सर्व उपाययोजना केली.  त्यामुळे त्या शहरांमधून व्हायरस बाहेर जाण्याची शक्‍यता खूपच कमी आहे.

 

corona virus 2 inmarathi
fox news

 

चीनमध्ये कोरोनामुळे तेराशे लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती चायना ग्लोबल नेटवर्कने दिली होती, परंतु खरा आकडा आज देखील गुलदस्त्यातच आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन देखील या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देत आहे, त्यामुळे अशा कुठल्याही अफवेवर भारतीय नागरिकांनी विश्वास ठेवू नये.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?