“आधार” डेटा हॅक होण्यामागचं वास्तव आणि ट्राय प्रमुखांची ट्विटर ट्रोलिंग

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

आधार डेटा सुरक्षेला हॅकर्स आणि सुरक्षा विश्लेकांनी वारंवार आव्हान दिले असून हा विषय ट्विटर वरती अनेक वेळी चर्चेचा विषय ठरला आहे. याबद्दल पॉलीसिमेकर आणि युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) ला ट्विटरकरांनी अनेकवेळा लक्ष्य केले आहे व त्यांना यावरून कित्येकदा ट्रोल केले आहे.

आधार कार्ड डेटाचा सुरक्षेचा विषय वारंवार समोर आला आहे. याबद्दल अफवा देखील पसरल्या गेल्या होत्या.

 

authentic-adhar-inmarathi
static.sify.com

पण यावेळी थेट हे आव्हान केले गेले भारताच्या दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय), चे अध्यक्ष राम सेवक शर्मा यांना.

राम सेवक शर्मा हे आयएएस आहेत. आयआयटी-कानपूर आणि कॅलिफोर्निया विद्यापीठातील माजी विद्यार्थी शर्मा यांनी यूआयडीएआचे महासंचालक म्हणूनही काम केले आहे आणि यापूर्वी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानाच्या विभागाचे सचिव (केंद्राच्या संप्रेषण आणि माहिती तंत्रज्ञानाच्या अंतर्गत) राहिले आहेत.

आर एस शर्मा यांनी आपला आधार नंबर का जाहीर केला?

एका ट्विटरकराने आर एस शर्मा यांना टॅग करून त्यांना आव्हान दिले की, त्यांना जर १३ फूट वॉल सिक्युरिड सिस्टीमवर इतका विश्वास आहे तर त्यांनी आपला आधार क्रमांक शेअर केला पाहिजे. यावर प्रतिक्रिया म्हणून आर एस शर्मा यांनी त्यांचा आधार क्रमांक या सोशल मीडिया वरती टाकला.

आणि लोकांना म्हणजे ट्विटरकरांना प्रति आव्हान केले की त्यांचा हा आधार क्रमांक वापरून कोणीही त्यांना जमेल तशी इजा पोहचवून दाखवावी.

 

या आव्हानाला शर्मा यांनी ट्विटवर प्रतिक्रिया देताना ट्विटरवर आपला आधार क्रमांक प्रकाशित त्या आधार क्रमांकावरून आपल्या डिटेल्स मिळवून दाखवा असे आव्हान दिले. या प्रणालीवर त्यांचा स्वतःचा विश्वास आहे हे सिध्द करण्यासाठी त्यांचा आधार क्रमांक पब्लिश करण्याचे त्यांना सांगण्यात आले होते.


तथापि, अँडरसनने दावा केला की आर एस शर्मा यांच्या आधार आयडीशी संबंधित त्यांची कोणतीही बँक खाती जोडली गेली नाही, ज्याच्यावर शर्मा यांनी प्रतिसाद दिला,

“तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी माझ्या सर्व बँक खात्यांना आधार ची लिंक जोडलेली आहे.”

आणि लवकरच एका दुसऱ्या त्यांच्या बँक खात्याची माहिती पुरवली.

पण या प्रकरणावर दुसऱ्या दिवशी आधारच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून आपली भूमिका सांगितली. या भूमिकेतून या प्रकरणाची सत्यासत्यता लक्षात येऊ शकेल.

“आधार डेटाबेस पूर्णतः सुरक्षित आणि संरक्षित आहे : यूआयडीएआय”

दुसऱ्या दिवशी २९ जुलैला ट्विटर वरील १७ ट्विटद्वारे या आधार डेटा हॅकसंबंधीचे म्हणणे खोडून काढून, शर्मां यांची माहिती आधार डेटा वरून चोरी केलेली नाही तर ती सहज उबलब्ध झालेली आहे असे यूआयडीएआयने स्पष्ट केले.


आधार डेटाबेसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की

“काही तथाकथित हॅकर्सनी शर्मा किंवा काही लोकांबद्दलच्या वैयक्तिक डेटा, माहिती, फोन नुंबर, ई-मेल आयडी, फोटो, वारंवार होणारे फ्लाइटचे तपशील, वगैरे. मिळवले. ही एक थट्टा असू शकते. अश्या फसव्या लोकांवर, अफवांवर आणि बातम्यांवर विश्वास ठेवू नये.”

“आधार डेटाबेस पूर्णपणे सुरक्षित आणि संरक्षित आहे आणि शर्मा यांची कोणतीही माहिती यूआयडीएआय च्या स्रोतांमधून किंवा आधार डेटाबेसमधून मिळवण्यात आलेली नाही. या प्रकारचे बनावट वृत्त तयार करून लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या अनैतिक घटकांद्वारे केलेली ही फक्त चुकीची प्रसिद्धी आहे.”


वास्तविकपणे कोणीही Google किंवा इतर स्त्रोतांना भेट देऊन शर्मा यांची ही माहिती शोधू शकतो. शर्मा यांचे वैयक्तिक तपशील आधारशिवायच उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, शर्मा यांचा मोबाईल क्रमांक एनआयसीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे, कारण पूर्वी ते भारत सरकारचे सचिव होते.

खरं तर, यामध्ये “तथाकथित हॅक केलेली माहिती” – शर्मा यांचे वैयक्तिक तपशील जसे की त्यांचा पत्ता, जन्मतारीख, फोटो, मोबाईल नंबर, इमेल इत्यादी – सार्वजनिक डोमेनमध्ये आधीपासूनच उपलब्ध होत्या कारण शर्मा अनेक वर्षांपासून सरकारी सेवक आहेत.

त्यात असे देखील आढळून आले की ही माहिती गुगल व अन्य साइट्सवर आधार क्रमांकाशिवायही सहजपणे उपलब्ध होती.

हे एकदा नाही तर वारंवार झाले आहे, आधार हा जगातील पहिला सर्वात मोठा बायोमेट्रिक कार्यक्रम आहे. आधार आणि त्यांच्या समर्थकांवर अशा प्रकारच्या आरोपांची पुनरावृत्ती ट्विटर वर होत राहते.

वास्तविक पाहता आधारविरोधी वक्तयाला धन्यवाद द्यायला हवेत, कारण यामुळेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भारत सरकारने अखेर लोकांना सार्वभौम अधिकार म्हणून खाजगीपणाचे हक्क देण्याचे धोरण स्वीकारले आहे.

 

supreme-court-aadhar-inmarathi
theindianexpress.com

याच धोरणाने २७ जुलैच्या शुक्रवारी न्यायमूर्ती श्रीकृष्ण समितीने सरकारकडे सादर केलेल्या पर्सनल डाटा प्रोटेक्शन बिल तयार करण्यामध्ये भूमिका बजावली आहे.

येथे काळजी करण्याचे मुद्दे आर.एस.शर्मा यांचे वैयक्तिक तपशील आधार डेटाबेसमध्ये हॅक केले जाऊ शकत नाहीत किंवा शक्य नाही हे नसून, आधार डेटा वरील माहिती ही त्यांच्या आधार ऑपरेटर कडून लीक होऊ शकत असल्याची शक्यता आहे म्हणून यूआयडीएआय ने ४९ हजार आधार ऑपरेटरना आधारच्या डेटा एक्सेसमधून ब्लॉक केले आहे.

आधारबद्दलच्या या प्रकरणातून वादाला तोंड फुटले असले तरी नागरिकांनी घाबरून न जाता आधारमध्ये असलेली माहिती पूर्णपणे गोपनीय राहील याची खात्री बाळगण्याचे आवाहन युआयएडीआयने केले आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?