छत्रपती संभाजीराजे आणि गुढीपाडवा : “खरा” इतिहास

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

महाराष्ट्रात सध्या जातीय अस्मिता फार टोकदार होऊ लागल्या आहेत. अशातच व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकसारख्या सोशल मिडीया साईट्स आणि अ‍ॅप्लिकेशन्सच्या माध्यमातून पद्धतशीरपणे तरुणांची माथी भडकवण्याचे प्रकार सर्रास सुरु आहेत. अशातच, ज्यांना सत्य काय माहित नसते अशांना या सगळ्या गोष्टी खऱ्या वाटू लागतात आणि समाजात आणखी तेढ निर्माण होते.

 

shambhu-raje-photo marathipizza

स्त्रोत

गुढीपाडवा जवळ आला की उठणारी आवई म्हणजे “छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू हा मनुस्मृतीनुसार झाला, आणि राजांच्या हत्येच्या आनंदात ब्राह्मणांनी गुढ्या उभारण्यास सुरुवात केली. त्यामूळे गुढीपाडवा हा ब्राह्मणांचा सण साजरा करू नये” ही !

पण – गुढीपाडव्याचे उल्लेख शंभूराजांच्या मृत्यूपूर्वीच्या अनेक ऐतिहासिक कागदपत्रात असल्याने असल्या गैरप्रचाराला बळी पडण्यास काही कारण आहे असं वाटत नाही.

गुढीपाडव्याचे १६८९ पूर्वीचे उल्लेख आपण पाहूया –


 

१) शिवचरित्र साहित्य खंड १ या पुस्तकात पृ ५९ ते ६५ वर लेखांक ४१ म्हणून एक जुना महजर दिला आहे. महजर म्हणजे न्यायाधिशाचे अंतिम लिखित मत ! हा महजर मार्गशीर्ष शुद्ध १ विरोधीनाम संवत्सर शके १५७१ अथवा सुहूर सन खमसेन अलफ म्हणजेच दि. २४ नोव्हेंबर १६४९ रोजीचा असून सदर महजरात “गुढीयाचा पाडवा” असा स्पष्ट उल्लेख आहे.

म्हणजे पाडव्याला गुढ्या उभारत असत हे स्पष्ट दिसते.

 

gudhi padwa inmarathi

 

२) मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड २० (जुना खंड) या पुस्तकात पृ २३४ ते २३८ वर लेखांक १७६ म्हणून एक निवाडपत्र दिले आहे. सदर गृहस्थाला निवाड्यासाठी काही पुरावे म्हणून दाखवायला सांगितले असता त्याने दिलेल्या कागदपत्रातील संबंधीत मजकूर असा –

“शके १५५२ मध्ये कार्तिक पौर्णिमा ग्रामस्थ कसबे वाई याणी ग्रहण काळी कडत जोसी क॥ (कसबे) मजकूर यास प्रतिवर्षी पासोडी येक व गहू व ‘गुढीयाचे पाडव्यास’ कुडव येक देऊ म्हणोन पत्र लेहूँ दिल्हे यास वर्षे तागायत १४८ होतात.”

म्हणजे इ.स. १६३१-३२ मध्ये सुद्धा पाडव्याला गुढ्या उभारल्या जात असत हे येथे स्पष्ट होते.

 

Gudi-Padwa-inmarathi

 

३) श्री रामदासांची कविता खंड १ या पुस्तकात पृ ९६ वर समर्थ रामदासस्वामी श्रीराम रावणाचा वध करून पुन्हा महाराष्ट्रात आल्यावर महाराष्ट्रातील जनतेने ‘गुढ्या उभारल्या’ असे देतात-

“ध्वजा त्या गुढ्या तोरणे उभविली ।”

अर्थात “राम आल्यावर गुढ्या” इत्यादी विषय बाजूला ठेवला तरी समर्थांची समाधी ही संभाजीराजांच्या मृत्युपूर्वी किमान ८ वर्षे असल्याने आणि त्याही पूर्वी समर्थांनी हे काव्य रचल्याने “गुढ्या” या महाराष्ट्राला नविन नव्हत्या हे दिसते.

 

४) शिवकालीन पत्रसारसंग्रह या पुस्तकात पृ ४७७ वर लेखांक १६२५ म्हणून एक नारायण शेणव्याचे मुंबईच्या गव्हर्नरला लिहीलेले चैत्र शुद्ध ८ शके १५९६ म्हणजेच दि. ४ एप्रिल १६७४ रोजीचे पत्र दिले आहे. या पत्रात नारायण शेणवी

“निराजी पंडित पाडव्याकरीता आपल्या घरी आला”

असा उल्लेख असून ऐन राज्याभिषेकाच्या दोन महिने आधी “पाडव्याचा सण” महत्वाचा होता असे दिसते.

एकूणच काय, हे सगळे स्पष्ट असताना आम्ही अजूनही अशा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवायचा का? किमान सुज्ञ लोकांस तरी हे सांगणे न लगे!

बहुत काय लिहीणे? अगत्य असु द्यावे.

===

– © लेखक (इतिहासाच्या पाऊलखुणा) आणि संचालक मंडळ (इतिहासाच्या पाऊलखुणा facebook group).

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page | Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 234 posts and counting.See all posts by omkar

17 thoughts on “छत्रपती संभाजीराजे आणि गुढीपाडवा : “खरा” इतिहास

 • December 10, 2016 at 4:42 pm
  Permalink

  thanks for sharing

  Reply
  • March 18, 2018 at 6:56 am
   Permalink


   प्रिय ॐकारजी ,
   गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा व अगदी समयोचित, वास्तविक व सामाजिक एकता तसेच दृढीसाठी आवश्यक अभ्यासपूर्ण लेख लिहून हिन्दू समाजाचे ऋण मानलेत त्याबद्दल पुनश्च एकवार धन्यवाद व भविष्यात असेच प्रबोधनकारी लेख लिहण्यासाठी शुभेच्छा!
   डॉ. मकरंद करकरे

   Reply
 • December 16, 2016 at 9:00 am
  Permalink

  Its only partially true..1st thing is there is no statement that “Gudhipadva” started on the death of Sambhaji Maharaj…In fact the some of people Bramhan samaj (Only few orthodox) celebrated the death of Sambhaji Maharaj on that day as to show their power & how they can rule on common people. It was a massage they wanted to give to all non-bramhan society that if we can kill your king we can do anything & hence be our slaves…!!!
  Yes Sambhaji Maharaj was killed as per Manusmruti only… If Aurangjeb wanted to kill him then why he taken him from Konkan to Vadhu budruk village? The reason is that from Vadhu Shahaji Raje started the movement of Hindvi Swarjya..He Had done “Suvarna Tula” from here & hence the other name of village Vadhu is Tulapur… So these traitors wanted give clear message that we had killed your King entire generation from where its started…
  This the actual info…!!!

  Reply
  • February 24, 2017 at 8:06 pm
   Permalink

   Yes you are right that Gudi Padwa was celebrated way before Sambhaji Maharaj’s death.Brahmins were also number one enemy of Aurangzeb so he also torched Kavi Kalash too…He was a blind Islam follower so he did not forgive any body.He wanted to give a strong message to other Hindus so he killed Our Raje.

   Reply
  • March 28, 2017 at 1:41 pm
   Permalink

   Mr. Patil, if u check how Aurangjeb killed his own brother, u will find that the procedure was as same as Shambhu raje. 1 more thing would like to ask was there any Marathi Sardar available in Aurangjeb’s darbar, who can write how Shambhu raje was killed? The logic is NO.
   Let’s not fight on cast , this is given to us by British and they have gone back. we should also not think on this . also to add on If Bramhan was the 1 behind Shambhu raje’s death, then you dont know what happend later.

   Reply
 • March 22, 2017 at 8:00 pm
  Permalink

  जर गुडीपाडवा हा हिंदु नववर्ष सण आहे तर हा सण फक्त महाराष्ट्रात का साजरा होतो, राम जेव्हा सितामतेला घेऊन अयोध्येत आले तेव्हा पासुन जर हिंदुनी हा सण साजरा करण्यास सुरुवात केली तर आताच्या काळात आयोधेतल्या लोकांना ह्या सणा बद्दल का माहीत नाय ते लोक का गुडीपाडवा साजरा करत नाहीत का आयोधेतील आताच राहणार समाज हिंदु नाही का त्यांनी केला पाहिजे ना हा सण साजरा मला एक जण तरी दाखवा जो अयोध्येत गुडीपाडवा साजरा करतो मी स्वतः आयुष्यभर गुलाम बनुन राहील त्याचा आणि तुमचा सुद्धा
  एवढा एकच प्रश्न आहे माझा
  धन्यवाद

  Reply
  • March 27, 2017 at 11:34 am
   Permalink

   गुढीपाडवा हा मराठी लोकांचा नवीन वर्षाचा सण आहे गुजराथी लोक त्यांचा नवीन वर्ष दसऱ्याला साजरे करतात, गुडीपाडवा हा सण साजरे करणारे हिंदू आहेत आणि ते मराठी आहेत त्यामुळे तो हिंदूचा सण आहे, त्यामुळे महाराष्ट्रात हिंदूंचे नवीन वर्ष म्हणजे गुडीपाडवा

   Reply
  • March 28, 2017 at 12:28 pm
   Permalink

   It has many names such as Samvatsar Padvo, Yugadi, Ugadi, Cheti Chand or and Navreh. It is also celebrated in the North East state of Manipur and is known as Sajibu Nongma Panba Cheiraoba.

   It is celebrated all over India.

   Reply
  • April 19, 2017 at 8:59 am
   Permalink

   Bhau mag tu lavkarach maza Gulam honar ahes Ya weles Kendriya Sansadet Gudhi Ubharnyat aali hoti. Mhanje ch delhi la

   Reply
  • June 24, 2017 at 11:12 pm
   Permalink

   कृष्ण जसा मित्रांच्या साहाय्याने मनोरा रचून लोणी खात होता तसेच या दिवशी हंडी बांधून मानवी मनोरा रचून ती महाराष्ट्रात फोडली जाते. ही परंपरा महाराष्टु सुरु झाली उत्तर प्रदेशात नाही. तसेच आहे. उगाच नको त्या शंका काढून हिंदू सणांवर टिका करुन संयमी हिंदू समाजाला असहीष्णू बनवू नका.

   Reply
 • April 2, 2017 at 8:34 pm
  Permalink

  Thanks for giving historical references of gudi padava. These references nullifies the criticism. Pleaee also give referece details of the books, amply and loudly.

  Reply
 • April 19, 2017 at 6:25 am
  Permalink

  सामान्य जनता ही शास्त्रोक्त पद्धतीने इतिहास वाचत नाही किंवा त्याचा अभ्यास करत नाही अथवा करू शकत नाही. तसेच आपल्या देशात व्यक्ती पूजक मनोवृत्ती असल्याने नेता (लिडर) जे काही सांगेल ते प्रमाण मानाने ही सवय ( वाईट) झाली आहे. ह्याच गोष्टीचा फायदा राजकारणी अथवा राजकीय असूया असणारे लोक घेतात व समाजावर राज्य करतात.

  Reply
 • January 19, 2018 at 2:55 pm
  Permalink

  Actualy corrupted brahman mantri (7 out of 8 in ashtapradhan mandal of maharaje shivaji.) they plan to rule on maratha kingdom. Shivaji maharaja death is not natural death.It’s well plan murder. 7 brahmin minister order to arrest Shambhuraje .it is a fact. Peshva Balaji vishwanath Bhat from shrivardhan captured maratha kingdom from chatrapati Shahu maharaja. Brahmin caste is on topmost position in India. They are in banking, educational sector.administration .Inaharashtra government out of 14 , 7 ministers are Brahman .&demand for reservation to Brahman.
  In whole life of Shivajimaharaj. Brahman community criticises to raje. Also in todays date Brahmans are top in the que by all methods Sam,dam,sand,bhed.

  Reply
 • January 19, 2018 at 3:03 pm
  Permalink

  Actualy corrupted brahman mantri (7 out of 8 in ashtapradhan mandal of maharaje shivaji.) they plan to rule on maratha kingdom. Shivaji maharaja death is not natural death.It’s well plan murder. 7 brahmin minister order to arrest Shambhuraje .it is a fact. Peshva Balaji vishwanath Bhat from shrivardhan captured maratha kingdom from chatrapati Shahu maharaja. Brahmin is on topmost position in India. They are in banking, educational sector.administration .Inaharashtra government out of 14 , 7 ministers are Brahman .&demand for reservation to Brahman.
  In whole life of Shivajimaharaj. Brahman community criticises to raje. Also in todays date Brahmans are top in the que by all methods Sam,dam,sand,bhed.

  Reply
 • March 17, 2018 at 6:57 am
  Permalink

  गूगलचे मनपूर्वक आभार , माहिती सांगीतल्या बद्दल . {{ जय शिवराय }} {{ जय जिजाऊ }} {{ जय शंभू राजे
  }}

  Reply
 • August 30, 2018 at 2:12 pm
  Permalink

  Instead of debating with each others we should understand, What the author wants to suggest..There are number of evidences they had given..& these are really makes us to think upon.. Thank you Omkarji.. I just want to conclude..MAJHAB NAHI SIKHATA AAPAS ME BAIR RAKHANA, HINDI HE HUM WATAN HE HINDOSTAN HAMARA…

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *