या मंदिराजवळून जाताना ट्रेनची गती अपोआप मंदावते
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
आपल्या देशात लाखो मंदिर आहेत. काही तर असे देखील आहेत जे त्यांच्या चमत्कारिक गोष्टींकरिता जगविख्यात आहेत. आजवर आपण देवी-देवतांच्या अनेक आख्यायिका एकल्या असतील, पण ही गोष्ट जरा वेगळी आहे. आज आपण एका अश्या मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत, जो त्यच्या चमत्कारिक शक्तीकरिता प्रसिद्ध आहे.
मध्यप्रदेशातील शाजापूर जिल्ह्यातील बोलाई गावात एक श्रीसिद्धवीर नावाचे हनुमानाचे मंदिर आहे, या मंदिराबाबत एक गोष्ट खूप प्रचलित आहे. असे सांगितल्या जाते की, या मंदिराजवळून जाणाऱ्या ट्रेनची गती अपोआप मंदावते. हे जरी विश्वसनीय वाटत नसलं, तरी येथील लोकांच्या मते त्यांनी स्वतः हे बघितले आहे.
हनुमानाचे हे मंदिर जवळजवळ ६०० वर्ष जुने आहे आणि येथे येणाऱ्या पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. येथे स्थापित हनुमानाच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे. स्थानिक लोकांच्या मते एकाच ठिकाणी दोन देवांच्या मुर्त्या स्थापित असल्याने हा चमत्कार होत असावा.
या मंदिराबद्दल आणखी एक गोष्ट प्रसिद्ध आहे, असे मानल्या जाते की हनुमानजी येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाची इच्छा पूर्ण करतात, तसेच येथे येणाऱ्या भाविकांना त्यंच्या भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचा देखील आभास होतो.
येथील लोकांच्या मते त्यांनी या मंदिरात अनेक चमत्कार होतांना बघितले आहेत आणि त्यातील सर्वात मोठा चमत्कार म्हणजे ट्रेनची गती मंदावणे. मंदिराजवळून जाणाऱ्या ट्रेनची गती अपोआप मंदावते आणि असे का घडते यामागील गूढ अजूनही कायम आहे.
मंदिरातील पुजारीच्या मते, ट्रेनच्या लोको पायलटचे म्हणणे आहे की, ट्रेन मंदिराजवळून जात असताना त्याला असा आभास होतो की त्याला कोणीतरी ट्रेनची गती कमी करण्यास सांगत आहे आणि जर त्याने या याकडे दुर्लक्ष करत ट्रेनची गती कमी केली नाही तर ट्रेनची गती स्वतःहून कमी होऊन जाते.
आजच्या आधुनिक काळात भलेही या सर्व गोष्टी अंधविश्वास वाटत असल्या, तरी आजही अनेक असे लोकं आहेत जे अश्याप्रकारच्या चमत्कारांवर विश्वास ठेवतात. पण या ठिकाणी ट्रेनची गती का मंदावते या मागील कारण अद्यापही कळू न शकल्याने येथील लोकं याला चमत्कारच मानतात.
स्त्रोत : topyaps.com
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.