' कोण मारणार बाजी? : या असतील महाराष्ट्रातल्या ५ सुपरहिट लक्षवेधी लढती! – InMarathi

कोण मारणार बाजी? : या असतील महाराष्ट्रातल्या ५ सुपरहिट लक्षवेधी लढती!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लोकसभा निवडणूक २०१९ चा निकाल उद्या जाहीर होणार आहे . महाराष्ट्र हे राज्य सरकार स्थापणेच्या दृषटिने महत्त्वाचे आहे . राज्या मध्ये लोकसभेच्या ४८ जागा आहेत. या जागा निर्णायक ठरू शकतात.

चला तर पाहुयात राज्यातील प्रतिष्ठीत व रंगतदार लढती ज्या कडे फक्त राज्याचेच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

१) सुप्रिया ताई सुळे विरूद्ध कांचन कुल

 

kanchan kul inmarathi
yahoonews.com

बारामती मतदार संघ हा शरद पवारांचा बालेकिल्ला आहे. या मतदार संघामध्ये पुर्वी ते स्वतः तर आत्ता त्यांची मुलगी सुप्रिया सुळे या खासदार आहेत. १० वर्षा पासून त्या खासदार आहेत. त्यांना त्याचा कामाबद्दल उत्कृष्ठ संसद सदस्य पुरस्कार मिळाला आहे.

भाजपने दोंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

भाजप ने बारामती मिळवण्या साठी जोरदार प्रयत्न केले आहेत. भाजपचे किती तरी नेते बरमती मध्ये तळ ठोकून बसले होते असे वृत्त निवडणूक प्रचार चालू असताना ऐकले असेल.

बारामतीमध्ये भाजपच निवडून येणार असे चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले आहे. बारामती मध्ये काय होणार? सुप्रियाताई आपली जागा राखणार की कांचन ताईबाजी मारणार हे बघण उत्सुकतेचे ठरणार आहे.

२) सुजय विखे पाटील विरूद्ध संग्राम जगताप

 

sangram inmarathi
hindustan times

अहमदनगर दक्षिण मतदार संघात होणारी निवडणूक विखे पाटील कुटुंबीयासाठी प्रतिष्ठेची आहे.

नुकतेच काँगेस मधून भाजप मध्ये गलेले राधाकृष्ण विखेपाटील यांचे चिरजीव सुजय विखे पाटील यांना भाजप ने उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी ने आमदार संग्राम जगताप यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून निवडणुक प्रतिष्ठेची केली आहे.

नरेंद्र मोदींची सभाही नगर मध्ये झाली असून त्याला चांगला प्रतिसाद लाभला आहे. शरद पवरांनी स्वतः या मतदार संघात जातीने लक्ष घालून काम केले आहे.

संग्राम जगताप यांची आक्रमक आमदार म्हणून त्यांची ओळख आहे, तर सुजय विखे हे संयमी व्यक्तिमत्वाचे नेते आहेत.

विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना तिकीट नाही दिल्या मुळे एक गट नाराज आहे. त्यामुळे दिलीप गांधी यांनी नक्की कुणाला मदत केली हे उद्या कळेलच. उद्या कोण जिंकणार हे बघणे रंगतदार असेल.

३) पार्थ पवार विरुद्ध श्रीरंग बारणे

 

Parth-and-Barane inmarathi
mpcnews.com

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नातू पार्थ पवारच्या उमेदवारीमुळे मावळ लोकसभेची लढत यावेळी खूपच गाजली. इथे पार्थ पवार यांची लढत शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांच्याशी होती.

मावळमध्ये अजित पवार यांनी मुलासाठी जोरदार तयारी केली होती. राष्ट्रवादीने खूपच उत्तम प्रकारे मतदारांना लक्ष करून प्रचार केला आहे, तर मावळ मध्ये शिवसेनेची ताकद आहे.

विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी विकास कामे केली असल्यामुळे तेच निवडून येतील असा त्यांना विश्वास आहे. उद्या कोण गुलाल उधळणार हे कळेलच.

४) नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले

 

nitin-gadkari-nana-patole-inmarathi
Loksatta.com

नागपूर मतदार संघातून भाजपचे विद्यमान खासदार नितीन गडकरी हे उमेदवार आहेत तर काँगेसने भाजप मधुन आलेले नाना पटोले यांना उमेवारी दिली आहे.

नाना पटोले हे भाजप चे खासदार होते. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राजीनामा देऊन काँग्रेस कडून तिकीट घेतले.

नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. नितीन गडकरी हे सध्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्वात उत्कृष्ट मंत्री म्हणून ओळखले जातात.

नाना पटोले यांना विश्वास आहे की ते ५ लाख मताच्या फरकाने निवडून येतील. नाना पटोले यांना ही निवडणूक सोपी नसणार हे मात्र नक्की.

५) सुशीलकुमार शिंदे विरूद्ध जय सिद्धेश्वर विरूद्ध प्रकाश आंबेडकर

 

solapur loksabha inmarathi
Dailyhunt.com

सोलापूर मतदार संघात यावेळी तिरंगी लढत आहे. भाजपने विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचे तिकिट कापुन लिंगायत समाजाचे धर्मगुरु जय सिद्धेश्वर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे तर काँग्रसने माजी मंत्री सुशीकुमार शिंदे यांना तिकीट दिले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष स्वतः प्रकाश आंबेडकर मैदानात उतरल्या मुळे निवडणुक रंगतदार झाली आहे.

सुशीलकुमार शिंदेनीही त्यांची शेवटची निवडणुक असल्याचं सांगुन लोकांना भावनीक आव्हान केले आहे. तर भाजपचे जय सिद्धेश्वर यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

बाबसाहेब आंबेडकरांचे नातू स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या मुळे लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कोण बाजी मारणार याकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

उदया नगाभे २३ मे रोजी देशभरात मतमोजणी होऊन निवडणूक आयोग निकाल जाहीर करेल. लोकसभा निवडणुकीमध्ये जागांवरती कोण बाजी मारणार याकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?