भारतीय कैद्यांना दुसऱ्या महायुद्धात भोगाव्या लागलेल्या नरक यातना

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

दुसर विश्व युद्ध १९३९ ते १९४५ दरम्यान झालं होतं. या युद्धात जगातील सर्वच मोठ्या देशांनी भाग घेतला होता. हे इतिहासातील सर्वात मोठे युद्ध होते. यात ३० देशांचे १० कोटी लोकं सहभागी झाले होते. एका बाजूला जर्मनी, जपान आणि इटली सारखे मोठे देश होते तर दुसरीकडे ब्रिटन, रशिया आणि अमेरिकेसारख्या महाशक्ती होत्या.

त्यावेळी भारत युनायटेड किंग्डमचा गुलाम होता. याचं कारणामुळे लाखो भारतीयांना ब्रिटनकडून युद्ध लढावे लागले होते. या युद्धात ८७ हजार सैनिकांनी आपला जीव गमावला होता. तसे तर जपानने १९४५ साली अमेरिके समोर सरेंडर केले होते तरी देखील या युद्धा दरम्यानच्या ६ वर्षांत जपानने त्याचं भयानक रूप दाखवलं.

 

World War2-inmarathi05

 

जपानने ब्रिटीश इंडियन सोबतच इतर काही देशांच्या हजारो सैनिकांना बंदी बनवले होते. या लोकांना जपानमध्ये अमानवीय वागणूक दिल्या जायची.

 

World War2-inmarathi02

 

दुसऱ्या महायुद्धा दरम्यान जपान ने सिंगापूर येथे युद्ध लढण्यासाठी गेलेल्या हजारो ब्रिटीश-इंडियन सैनिकांना बंदी बनविण्यात आले. यामधील कित्येक कैद्यांना डोळ्यांवर पट्टी बांधून बसवल्या जायचं. त्यानंतर त्यांच्या समोर जपानी सैनिक बसायचे. त्यानंतर या कैद्यांच्या शरीरावर एक पॉईंट सेट करण्यात यायचा, ज्यानंतर जपानी सैनिक यांना निशाना बनवून शुटींग प्रॅक्टिस करायचे.

 

World War2-inmarathi04

 

या कैद्यांना टार्गेट नंबर देखील देण्यात यायचा. यांच्यावर निशाना लावल्यानंतर त्यांच्या शरीरात खिळ्यासारखी गोष्ट टोचून हे सुनिश्चित केल्या जायचं की त्यांच्यापैकी कोणी जिवंत तर नाही.

 

World War2-inmarathi05

 

ब्रिटीश-इंडियन आर्मीसोबतच चीन, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांच्या युद्ध कैद्यांना देखील जपानने क्रूरतेणे ठार केले. या कैद्यांना गोळ्या झाडल्या नंतर त्यांचे शीर कापून टाकण्यात येत होते.

 

World War2-inmarathi03

 

एवढचं नाही तर युद्धा दरम्यान खाण्याची सामग्री कमी पडली तर जपानी सैनिक या कैद्यांना मारून खात असत.

 

World War2-inmarathi06

 

या जपानी सैनिकांनी महिलांवर देखील दया नाही दाखवली. त्यांना सेक्स स्लेव बनवल्या जात असत. त्यांच्यासोबत जबरदस्ती संबंध बनविले जातं आणि त्या गर्भवती झाल्या की या गर्भवती महिलांवर हे जपानी वेगवेगळे प्रयोग करत असत.

 

 

या कैद्यांना मजदूर बनविल्या जातं असत त्यानंतर त्यांच्याकडून फॅक्टरीमध्ये काम करविण्यात येत तसेच त्यांच्याकडून रेल्वे ट्रक टाकण्याचं काम देखील करविण्यात येत असत.

 

World War2-inmarathi08

 

दुसऱ्या महायुद्धा दरम्यान जपानच्या Unit 731 येथे वैज्ञानिक अमानवीय प्रयोग करत असत, ते कैद्यांना बेशुद्ध न करता त्यांचे अंग काढायचे आणि नंतर ते दुसऱ्या ठिकाणी जोडायचे.

 

World War2-inmarathi09

 

कैदींना शिक्षा देण्याचा हा सर्वात निर्दयी प्रकार आहे. आधी ते बांबूच्या रोपाला जमिनीत लावत, त्यानंतर जपानी या कैदींना हात बांधून त्यावर बसवत. बांबूचे झाड खूप वेगात वाढते. त्यामुळे ते झाड कैदीला कापत वाढायचं आणि त्यात त्याचा मृत्यू व्हायचा.

स्त्रोत : ,

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?