इतिहासातील सर्वोत्तम १० सर्जिकल स्ट्राईक्स, ज्यांचे आजही जगभर दाखले दिले जातात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | इंस्टाग्राम

===

सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय? तर एखाद्या देशाच्या सैन्याने दुसऱ्या देशाच्या सीमेत घुसून केलेलं लष्करी ऑपरेशन. शत्रूच्या प्रदेशात स्वतःच्या सैन्याकडून कोणत्याही मदतीची शक्यता नसताना पूर्ण योजना बनवून अशा कारवाया केल्या जातात. त्यामुळे यामध्ये मोठी जोखीम असते.

उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’ ची बरीच चर्चा झाली होती. तेव्हा अनेकांना प्रश्न पडला होता अशा सर्जिकल स्ट्राईक जगात इतरत्र कुठे झाल्या आहेत का?

तर त्याचेच उत्तर म्हणून हा लेख, यात आहेत इतिहासातील १० सर्वोत्कृष्ट सर्जिक स्ट्राईक्स ज्यांचे आजही जगभर दाखले दिले जातात.

१) ऑपरेशन म्यानमार 

 

surgical-strikes-marathipizza01
indianexpress.com

जून २०१५ मध्ये भारतीय सैन्याच्या जवळपास ७० कमांडोच्या टीमने म्यानमारच्या जंगलामध्ये सर्जिकल स्ट्राईक केलं होतं. ४० मिनिटांच्या या ऑपरेशनमध्ये कमांडोनी ३८ क्रूर नागा आतंकवाद्यांना कंठस्नान घातलं होतं आणि ७ जणांना जखमी केले होते.

४ जून २०१५ मध्ये नागा आतंकवाद्यांनी मणिपूर मध्ये जवानांवर केलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून हा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता.

२) ऑपरेशन नेपच्यून स्पिअर

 

surgical-strikes-marathipizza02
youtube.com

मे २०११ मध्ये अमेरिकेच्या स्पेशल फोर्सेसनी पाकिस्तानच्या अबोटाबाद स्थित आयएसआयच्या सेफ हाउसवर सर्जिकल स्ट्राईक केला होता. जेथे ओसामा बिन लादेन लपून बसला होता.

नेपच्यून स्पिअर आणि जेरोनिमो या नावाने सीआयएच्या नेतृत्वाखाली यु.एस. नेव्ही सीलने या ऑपरेशन अंतर्गत ओसामा बिन लादेनला घरात घुसून मारले होते.

३) रेड ऑन  ऐंटबी

 

surgical-strikes-marathipizza03
telegraph.co.uk

इस्राइलच्या डिफेन्स फोर्सेसनी युगांडाच्या विमानतळावर सर्जिकल स्ट्राईक करून ओलीस ठेवण्यात आलेल्या सर्व लोकांची सुखरूप सुटका केली. आजवरच्या इतिहासातील सर्वात यशस्वी आणि चोख ऑपरेशन म्हणून या कामाचे कौतुक केले जाते.

१९७६ च्या जून महिन्यात पॉप्युलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ पेलेस्टाइनच्या सदस्यांनी एयर फ्रान्सच्या विमानाचे अपहरण करून ते जबरदस्तीने युगांडाच्या ऐंटबी विमानतळावर उतरवले होते.

तेव्हाचा युगांडाचा हुकुमशहा इदी अमीनने प्रवाश्यांच्या सुटकेसाठी काहीही प्रयत्न केले नाही.

तेव्हा इस्राइलच्या डिफेन्स फोर्सेसनी स्वत: १०० कमांडोसह सर्जिकल स्ट्राईक करून सर्व आतंकवाद्यांना यमसदनी पाठवले आणि सर्व प्रवाश्यांची सुटका केली.

४) ऑपरेशन बे ऑफ पिग्ज

 

surgical-strikes-marathipizza04
realcleardefense.com

१९६१ मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी सीआयएच्या नेतृत्वाखाली पिग्जच्या उपसागरामध्ये १४०० स्थलांतरित क्युबन नागरिकांच्या मदतीने क्युबा देशावर हल्ला करण्याचा आदेश दिला होता.

तत्कालीन फिडेल कास्ट्रोचे सरकार उलथवून टाकण्यासाठी ही सर्जिकल स्ट्राईक केली गेली होती, परंतु ती अपयशी ठरली.

यामध्ये अमेरिकेचे १०० हून अधिक सैनिक मारले गेले आणि १२०० पेक्षा जास्त क्युबन बंडखोरांना फिडेल कास्ट्रोने पकडले होते.

५) ऑपरेशन इगल क्ल्वो

 

surgical-strikes-marathipizza05
sofrep.com

१९७९ च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये काही इराणी विद्यार्थ्यांनी इराणची राजधानी तेहरानमध्ये असलेल्या अमेरिकेच्या दूतावासामध्ये घुसून ५३ अमेरिकन नागरिकांना ओलीस ठेवले होते. त्यांना सोडवण्यासाठी तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जिम कार्टर यांनी एक गुप्त मिशन राबवले.

स्पेशल फोर्सेसची एक तुकडी ऑपरेशनसाठी जात असताना वादळामध्ये अडकली. दरम्यान एक हेलीकोप्टर देखील कोसळले.

या सर्व अनपेक्षित घटनांमुळे ही सर्जिकल स्ट्राईक पूर्णत: अपयशी ठरली. यात ८ अमेरिकन सैनिक मारले गेले आणि ओलीस ठेवलेल्या एकाही अमेरिकन नागरिकाला सोडवण्यात त्यांना यश आले नाही.

या अपयशी सर्जिकल स्ट्राईकसाठी जिम कार्टर यांना जबाबदार धरण्यात आले आणि त्यांना राष्ट्रपतीपदावरून पायउतार व्हावे लागले.

६) ऑपरेशन निफ्टी पॅकेज

 

surgical-strikes-marathipizza06
wikipedia.org

१९८९ मध्ये अमेरिकेने पनामाचा हुकुमशहा मॅन्यूअल नारीयेगा याला पकडण्यासाठी एक स्पेशल मिशन राबवले होते.

अमेरिकन नेव्ही सीलच्या कमांडोनी त्याला पकडण्यासाठी एका रोमन कॅथेलिक फॅसिलीटीला घेरले होते. दरम्यान मॅन्यूअल नारीयेगा आणि कमांडोजमध्ये मोठ्या प्रमाणावर चकमक झाली.

तो समर्पण करत नाही हे पाहून कमांडोनी गन्स अॅण्ड रोझेस या बँडची गाणी मोठ्या आवाजात वाजवली.

या आवाजाला कंटाळून पनामाचा हुकुमशहा मॅन्यूअल नारीयेगा याने आत्मसमर्पण केले होते.

७) ऑपरेशन ब्लॅक हॉक

 

surgical-strikes-marathipizza07
moddb.com

१९९३ मध्ये अमेरिकेने सोमालियाचा आतंकवादी मोहमद फरह अहदीद याला पकडण्यासाठी एक स्पेशल ऑपरेशन राबवले होते. परंतु ही सर्जिकल स्ट्राईक अपयशी ठरली.

मोहमद फरह अहदीदच्या सैन्याने दोन अमेरिकन हेलिकॉप्टरवर प्रतिहल्ला केला होता. या हल्ल्यात १८ अमेरिकन सैनिक मारले गेले आणि ७० पेक्षा जास्त सैनिक जखमी झाले होते. याचाच फायदा घेऊन मोहमद फरह अहदीदने पळ काढला.

पुढे याच ऑपरेशन वर ‘ब्लॅक हॉक डाऊन’ नामक पुस्तक आणि चित्रपट देखील आला होता.

८) ऑपरेशन जेसिका लिंच रेस्क्यू

 

surgical-strikes-marathipizza08
ydailynews.com

एप्रिल २००३ मध्ये अमेरिकन सैन्याची अधिकारी जेसिका लिंच हिला इराकी सैन्याने बंदी बनवले होते. ९ दिवसांनंतर अमेरिकन स्पेशल फोर्सेसनी एका हॉस्पिटलवर आक्रमण केले जेथे जेसिका लिंच हिला नजरकैदेत ठेवले होते.

तेथून जेसिका लिंच यांना सुखरूपपाने मायदेशी आणत अमेरिकेने ही सर्जिक स्ट्राईक यशस्वी करून दाखवली.

९) ऑपरेशन खालिद शेख मोहम्मद कॅप्चर

 

surgical-strikes-marathipizza09
ynet.co.il

मार्च २००३ मध्ये अमेरिकेने सीआयएच्या नेतृत्वाखाली ३ संशयित दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पाकिस्तान मध्ये सर्जिकल स्ट्राईक केली होती. रावळपिंडी मध्ये केलेल्या या ऑपरेशन मध्ये ९/११ च्या हल्ल्यातील मुख्य आरोपी खालिद शेख मोहम्मद अमेरिकेच्या हाती लागला.

१०) ऑपरेशन अबू मुसाब अल्झरकावी

 

surgical-strikes-marathipizza10
dawn.com

जून २००६ मध्ये अमेरिकेने अल कायदाचा नेता अबू मुसाब अल्झरकावीच्या सेफ हाउसवर लढाऊ विमानांच्या सहाय्याने सर्जिकल स्ट्राईक केला होता. या हल्ल्यामधून कसाबसा पळून जात असताना अबू मुसाब कमांडोच्या हाती लागला आणि जागेवरच त्याला यमसदनी पाठवण्यात आले.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?