ही आहेत २०१७ मध्ये गुगलवर सर्वात जास्त सर्च करण्यात आलेली गाणी

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

बॉलीवूडमध्ये आजकाल खूप वेगवेगळ्या प्रकारची गाणी आलेली आपल्याला पाहायला मिळतात. पार्टी साँग्सपासून सॅड साँग्सपर्यंत सर्व प्रकारची गाणी आपल्या यामध्ये मिळतात. पण या चित्रपटांमधील काही निवडक गाणीच आपल्याला पसंत पडतात. जी आपल्याला मनापासून आवडतात आणि ज्यांना आपण आपल्या प्ले – लिस्टमध्ये समाविष्ट करून घेतो. गाण्यांच्या बाबतीत प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते, त्यामुळे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आपल्याला सारखीच गाणी पाहायला मिळतील असे नाही. असो, तो प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न आहे. गाणी ही आता लोकांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण भाग बनला आहे. एकातांमध्ये असो किंवा मित्रांसोबत आपण सर्व ठिकाणी या गाण्यांचा मनसोक्त आनंद उचलत असतो.

InMarathi Android App

पण अशी देखील काही गाणी असतात, जी देशातील बहुतेक लोकांना आवडतात. ज्यांना आपण त्या वर्षातील हिट गाणी म्हणून ओळखतो. गुगलने २०१७ या वर्षामध्ये सर्वात ट्रेडिंग असणाऱ्या गाण्यांची एक यादी जाहीर केली आहे. यामध्ये कदाचित तुम्हाला तुमचे आवडते गाणे देखील मिळू शकते, जे तुम्ही दिवस – रात्र ऐकले असेल आणि ते ऐकताना तुम्ही सर्व काही विसरून जात असाल. चला तर जाणून घ्या, या गुगलवर सर्वात जास्त सर्च झालेल्या ट्रेडिंग गाण्यांविषयी..

१०. मिले हो तुम हमको

 

या गाण्याने तरुणाईला जणू भुरळच घातली होती. या गाण्याचे बोल एवढे सुंदर आहेत की, ऐकणारा त्यात स्वतःला विसरून जातो. त्याचबरोबर, नेहा कक्करचा आवाज या गाण्यामध्ये एक वेगळाच जीव टाकतो. या गाण्याला गुगल सर्च ट्रेंडमध्ये दहावे स्थान मिळाले आहे.

९. मुबारकां

 

मुबारकां या जुलैमध्ये आलेल्या चित्रपटाचे टायटल ट्रॅक ‘मुबारकां’ या गाण्याला गुगल सर्च ट्रेंडमध्ये नववे स्थान मिळाले आहे. या चित्रपटात अर्जुन कपूर आणि अनिल कपूर हे मुख्य भूमिकेत होते.

८. शेप ऑफ यू

 

भारतातील बॉलीवूड गाण्यांसोबतच हॉलीवूडची गाणी देखील भारतीय प्रेक्षकांना चांगलीच पसंत पडलेली यावरून दिसत आहे. या शेप ऑफ यू गाण्याला गुगल सर्च ट्रेंडमध्ये आठवे स्थान मिळाले आहे.

७. काबिल

 

२०१७ च्या जानेवारीमध्ये आलेल्या काबिल चित्रपटाचे टायटल ट्रॅक ‘में तेरे काबिल हूँ’ हे गाणे खूपच रोमँटिक आहे. ही गाणे बहुतेक लोकांच्या प्ले – लिस्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, खासकरून प्रेमात पडलेल्या लोकांच्या मोबाईल प्ले – लिस्टमध्ये मिळू शकते. या गाण्याला गुगल सर्च ट्रेंडमध्ये सातवे स्थान मिळाले आहे.

६. डिंग डँग

 

२०१७ च्या जुलै महिन्यात आलेल्या मुन्ना मायकल या चित्रपटामध्ये टायगर श्रॉफ हा मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटातील डिंग डँग या गाण्याला गुगल सर्च ट्रेंडमध्ये सहावे स्थान मिळाले आहे.

५. कुछ तो है तुझसे राब्ता

 

जून महिन्यात आलेल्या राब्ता या चित्रपटामध्ये सुशांत सिंग राजपूत आणि कृती सनॉन यांनी प्रमुख भूमिका बजावल्या होत्या. या चित्रपटातील कुछ तो है तुझसे राब्ता हे गाणे लोकांच्या चांगलेच पसंतीस आले. या गाण्याला गुगल सर्च ट्रेंडमध्ये पाचवे स्थान मिळाले आहे.

४. दिल दियां गल्लां

 

सलमान खान आणि कॅटरीना कैफ यांचा येणाऱ्या आगामी चित्रपट टाइगर जिंदा है, या चित्रपटातील ‘दिल दियां गल्लां’ हे गाणे खूपच गाजले आहे. खूप कमी वेळामध्ये लोकांना हे गाणे आवडले. या गाण्याला गुगल सर्च ट्रेंडमध्ये चौथे स्थान मिळाले आहे.

३. डेस्पासितो

 

डेस्पासितो या स्पॅनिश गाण्याला आपल्या भारतामध्ये खूपच प्रशंसा मिळाली. या गाण्याची अप्रतिम संगीत प्रत्येकाला एक वेगळी उर्जा देत आहे. या गाण्याचे बोल जरी कुणाला समजत नसले, तरीदेखील लोकांना हे गाणे खूप आवडले. या गाण्याला गुगल सर्च ट्रेंडमध्ये तिसरे स्थान मिळाले आहे.

२. मेरे रश्के कमर

 

मेरे रश्के कमर हे गाणे कुणी ऐकले नसेल, असे सहसा कुणीही नसेल. नुसरत फतेह आली खान यांची आठवण जागवणारे हे गाणे सर्वांच्याच आवडीचे बनले आहे. बादशाहो या सप्टेंबरमध्ये आलेल्या चित्रपटामध्ये या गाण्याचे एक वेगळे वर्जन आले होते. हे गाणे ऑल टाईम फेव्हरेट गाण्यांपैकी एक गाणे आहे. या गाण्याला गुगल सर्च ट्रेंडमध्ये दुसरे स्थान मिळाले आहे.

१. हवा – हवा

 

या यादीतील पहिल्या गाण्याचे नाव ऐकून तुम्हाला नक्कीच थोडे आश्चर्य वाटले असेल. पण खरचं, या यादीमध्ये मिका सिंगच्या हवा – हवा या मुबारकां चित्रपटातील गाण्याला गुगल सर्च ट्रेंडमध्ये पहिले स्थान मिळाले आहे.

अशी ही २०१७ मधील ट्रेंडमधील गाणी बहुतेक लोकांच्या प्ले – लिस्टमध्ये आपले स्थान पक्के करून आहेत आणि त्यांचे योग्यप्रकारे मनोरंजन करत आहेत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *