ह्या कुत्र्यांपासून जरा ‘बचके’ रहना : अत्यंत धोकादायक कुत्र्यांच्या १० जाती

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

पाळीव प्राणी हे सर्वांनाच आवडतात आणि त्यातही कुत्रा म्हंटल तर तो सर्वांच्याच आवडीचा, हा आता याला काही लोक अपवाद ठरतात खरे. पण तरी या जगात ‘dogs lovers’ची आणि त्यांना पाळणाऱ्यांची कमी नाही. कारण कुत्रा हा प्राणी मुळातच मनुष्याच्या मित्रासारखा आहे, तसेच तो तेवढाच प्रामाणिकही आहे.

पण हा प्राणी तेवढाच भयानकही आहे. जर त्याला धोक्याचा संशय आला तर तो तुम्हाला आपलं रौद्र रूप दाखवतो.

कुत्र्यांच्या काही जाती स्वभावाने अजिबातच मैत्रीप्रीय नसतात. आज आपण अशाच काही breeds बद्दल जाणून घेणार आहोत…

१. अमेरिकन पिट बुल टेरियर…

 

Dangerous dogs.marathipizza
i.ytimg.com

आपल्या कोणत्याही शत्रूला जवळजवळ मारून टाकण्याची क्षमता या कुत्र्यांच्या जातीमध्ये असते. ही कुत्र्याची जात खूप रागीट आहे. मालकांद्वारे यांचे चुकीच्या पद्धतीने संगोपन करण्यात आल्यास, हे आपल्या मालकासाठी देखील आत्मघाती ठरतात. म्हणून यांना पाळताना काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

२. रॉट वैइलर…

 

Dangerous dogs.marathipizza1
en.working-dog.com

रॉट वैइलर कुत्र्याची जात ही सर्वात धोकादायक जात म्हणून ओळखली जाते. आपल्या मालकाला समर्पित आणि आज्ञाधारक असणारी ही जात आहे. उत्तमरित्या यांना पाळल्यास ते खूप चांगले वागतात. रॉट वैइलरद्वारे आक्रमण झाल्यास तो समोरच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतो.

३. जर्मन शेफर्ड…

 

Dangerous dogs.marathipizza2
cloudfront.net

जर्मन शेफर्ड कुत्र्याची एक बुद्धिमान जात आहे. त्यांना गुन्हेगारांना शोधून काढण्यासाठी आणि पकडण्यासाठी प्रशिक्षित केले जाते. जर जर्मन शेफर्ड हा कुत्रा वेळेवर थांबला नाही किंवा गुन्हेगार प्रतिकार करत राहिल्यास जर्मन शेफर्ड हा कायद्याचे उल्लंघन करून एका क्रूर मारेकऱ्याचे स्वरूप धारण करतो.

४. जर्मन बॉक्सर…

 

Dangerous dogs.marathipizza3
cmeimg-a.akamaihd.net

जर्मन बॉक्सर या जातीच्या कुत्र्यांना तुम्ही रिंग मास्टरसारखे प्रशिक्षण देऊन आपल्या पाहिजे तसे वागवू शकत नाही, कारण हा खूप शांत आणि आळसावलेल्या सारखा असतो. पण त्याचा आकार अस्वला एवढा मोठा असतो.

५. डॉबरमन…

 

Dangerous dogs.marathipizza4
iheartdogs.com

डॉबरमन हा एखाद्या मित्रासारखा असतो. पण जर त्यांचा मालक संकटात असेल किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने त्यांच्या मालकाला इजा पोहचवण्याचा प्रयत्न करत असेल, तर डॉबरमन आपले नैसर्गिक आक्रमण प्रदर्शित करतो.

६. डेलमॅटियन…

 

Dangerous dogs.marathipizza5
akc.org

डेलमॅटियन ही अजून एक वेगळी कुत्र्याची जात आहे. डेलमॅटियनला प्रशिक्षण देणे खूप कठीण असते, कारण तो जन्मतःच बहिरा असतो.

त्यामुळे डेलमॅटियनवर नियंत्रण ठेवणे खूप कठीण असते. कधी-कधी तो आवाक्याच्या बाहेर होऊन आपल्या मालकावर देखील हल्ला चढवू शकतो.

७. सायबेरियन व्हायकी…

 

dangerousdogs.marathipizza6
jules-photographer.com

सायबेरियन व्हायकी हे आपल्या मालकासोबत मैत्रीपुर्वक राहतात. या जातीचे कुत्रे हे लांडग्यांसारखे दिसतात. या जातीच्या कुत्र्यांना पाहून कधी-कधी लोकांच्या मनामध्ये भीती देखील निर्माण होऊ शकते.

याच भीतीमुळे यांच्या मनामध्ये राग निर्माण होतो आणि ते हल्ला करण्याची शक्यता असते, असे बहुतेक कुत्र्यांच्या बाबतीत घडते, असे आपल्याला दिसून येते.

८. चाउ चाउ…

 

Dangerous dogs.marathipizza7
vetstreet.brightspotcdn.com

चाउ चाउ ही कुत्र्याची जात केसाळ आणि लहान आकाराची असते. त्याच्या मालकाला या कुत्र्याच्या समोर काही वाईट बोलल्यास किंवा त्याच्या मालकाच्या घरामध्ये मालकाच्या परवानगी न घेता गेल्यास हा हल्ला करण्याची शक्यता असते.

त्याच्या सुंदर आणि शांत दिसण्यावर जाऊन या भ्रमात राहू नका की, तो तुम्हाला काही करणार नाही. वेळ पडल्यास तो तुम्हाला मोठी दुखापत करू शकतो.

या आणि यांच्यासारख्या अनेक कुत्र्यांच्या जाती आहेत, ज्या नकळत तुमच्यावर हल्ला करून तुम्हाला दुखापत करू शकतात. त्यामुळे कुत्र्यांना पाळावे पण सावध राहून…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?