अजब देशाची गजब गोष्ट : इथे प्रवाश्यांना चक्क धक्के मारून ट्रेनमध्ये भरलं जातं!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

 

असं म्हणतात की गर्दी काय असते हे मुंबईला आल्याशिवाय आणि मुंबई लोकलमधून प्रवास केल्याशिवाय कळत नाही. काही प्रमाणात ते खरं देखील आहे कारण मुंबई लोकल मधली गर्दी म्हणणे श्वास कोंडून टाकणारी, अंगाची चांगलीच धुलाई करणारी, मनात धडकी भरवणारी अशीच असते. मुंबईला पहिल्यांदा येणारे अनेक जण तर केवळ हि गर्दी पाहूनच आल्या पावली परत जातात. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की मुंबई लोकलची ही गर्दी जगातील एका देशाच्या गर्दीसमोर काहीही नाही, कारण या देशात लोकांना चक्क आत ढकलून ट्रेनमध्ये भरलं जातं. तो देश म्हणजे जपान आणि ही भयंकर गर्दी दिसते टोकियो रेल्वे मध्ये! चला तर जाणून घेऊया या अजब देशातील गजब गोष्ट!

tokyo-train-marathipizza01
farfesh.com

जपान रेल्वे व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाबाबत जगात सगळ्यात भारी आहे. पण येथील लोकसंख्या इतकी जास्त आहे की त्या गर्दीचा परिणाम रेल्वे यंत्रणेवर पडतोच पडतो. जपानची राजधानी टोकियोत रोज चार कोटी लोक ट्रेनने प्रवास करतात. यातील सुमारे ८० लाख लोक सबवे ट्रेनचा वापर करतात.


tokyo-train-marathipizza02
pinterest.com

टोकियोतील सबवे ट्रेनला असलेली हि गर्दी पाहता तेथे ट्रेनमध्ये लोकांना चढवायला पुशअर्स ठेवले गेले आहेत. लोकांना रेल्वेत चढवणा-या स्टाफला ‘सब वे पुशर्स’ म्हणतात. हे पुशर्स रेल्वेच्या दारावर उभे असतात व लोकांना रेल्वेत ढकलतात.

tokyo-train-marathipizza03
mkshft.org

प्रत्येक दिशेला एका तासाला २४ ट्रेन धावत असतात. एवढ्या गाड्या असूनही तेथे कायमच तोबा गर्दी असते. या दरम्यान लोकांची वाईट अवस्था होते.


tokyo-train-marathipizza04
pinterest.com

टोकियो सबवे वर प्रत्येक ५ मिनिटाला ट्रेन येते. तर पीक टाईमला २-३ मिनिटाला येते. प्रत्येक ट्रेन खचाखच भरलेली असते. काही ट्रेनमध्ये क्षमतेपेक्षा दुप्पटीने लोक प्रवास करतात. त्यामुळे जपान रेल्वे व्यवस्थापनाने ही गर्दी संभाळण्यासाठी अधिकृत स्टाफ ठेवला आहे. हा स्टाफ यूनिफॉर्ममध्ये असतो आणि लोकांना ट्रेनमध्ये ढकलत असतो.

tokyo-train-marathipizza05
magazine.nationalgeographic.nl

त्याचे कारण म्हणजे ट्रेनचा दरवाजा योग्य पद्धतीने बंद व्हावा व रेल्वे गाडी वेळेत व सुरळित चालावी म्हणून. आत गेल्यावर रेल्वेत एवढी गर्दी असते की प्रवाशांना श्वास घेणेही मुश्किल होते. या गर्दीमध्ये महिलांशी गैरवर्तन होण्याच्या अनेक घटना घडतात. महिला याबाबत जागरूक व्हाव्यात यासाठी टोकियो रेल्वे ऑपरेटर कॉर्पोरेशनने व्हिडिओ आणि पोस्टर जारी केले आहे.


tokyo-train-marathipizza06
amusingplanet.com

ही गर्दी आणि प्रवाश्यांची अवस्था बघून असचं म्हणावं लागेल की, गड्या आपली मुंबईचं बरी!!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi





Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?