' Titanic : परत एकदा समुद्रावर अधिराज्य गाजवणार…! – InMarathi

Titanic : परत एकदा समुद्रावर अधिराज्य गाजवणार…!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

मानवाच्या इतिहासातील सगळ्यात भव्य असं जहाज म्हणुन ज्या जहाजाची अख्या जगाने नोंद घेतली ते Titanic जहाज 1912 मध्ये एका विशाल हिमनगाला धडकुन बुडाले होते. त्यात वित्तहानी आणि जीवितहानी (1500 मृत ) सुद्धा खुप झाली.

 

Titanic001

Source

ह्याच घटनेवर आधारित movie चं आपण सगळ्यांनी तोंडभरून कौतुक सुद्धा केलं.

पण ऑस्ट्रेलियाच्या अब्जाधीश Clive Palmer ह्यांना ह्या घटनेने इतकं झपाटलं की त्यांनी नव्या जोमानं पुन्हा Titanic च्या बांधणीचा घाट घातला. Titanic ची सुधारित बांधणी करायची, ह्यात मूळ जहाजात मध्ये राहून गेलेल्या त्रुटींवर काम करून ह्या जहाजाला perfect बनवायचं असं Palmer आणि त्यांच्या Blue-Star कंपनी ने ठरवलंय. त्यांच्या plan नुसार – नवीन Titanic-2 प्रवासासाठी 2018 मध्ये सज्ज असेल…!

नव्या जहाजाचं 3-D मॉडेल :

titanic 2 marathipizza

Source

First Class, Second Class, Third Class अश्या तीन श्रेणीत विभागलेल्या ह्या विशाल जहाजात 2400 प्रवासी आणि 900 कर्मचाऱ्यांना समावणाऱ्या 840 कॅबिन्स असतील.

जहाजाची काही ठळक वैशिष्ट्ये :

1. आकारमान – 270 मीटर लांब, 53 मीटर उंच आणि वजन 40 हजार टन.
2. आधीच्या Titanic पेक्षा हे Titanic-2, 4 मीटर जास्त रुंद असणार आहे.
3. आधीच्या जहाजात असलेली Life-boats ची कमतरता भरून काढण्यात आलेली आहे.
4. जहाज उपग्रहाच्या मदतीने नियंत्रित होणार असून त्यात RADAR system आणि Digital Navigation सुद्धा असणार आहे.
5. अत्याधुनिक Emergency Measures सुद्धा Titanic-2 ला अजून सुरक्षित बनवतात.

पुढील video ने Titanic -2 वर अधिक प्रकाश पडेल :

 

ह्या जहाजाचा प्रवास चीनच्या जियांगसू येथून दुबई पर्यंत असणार आहे.

तर मग आहात तयार? नव्या जोमानं सागरी सफरीचा थरार अनुभवायला?

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Abhidnya Adwant

Author @ मराठी pizza

abhidnya has 47 posts and counting.See all posts by abhidnya

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?