तिरुपती मंदिरात भक्तांनी अर्पण केलेल्या केसांचं काय करतात: जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

तिरुपती बालाजी मंदिर जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे.

देवळाच्या श्रीमंतीची झलक केवळ मंदिराच्या परिसरात दिसत नाही – तिरुपती शहराची भरभराट बघून ह्या ऐश्वर्याची, मंदिराला येणाऱ्या भक्तांच्या संख्येची चुणूक दिसते. एवढंच कशाला, दरवर्षी मंदिरात भक्तांनी केलेलं दान सर्वत्र चर्चेत येत असतं.

कुणी नोटांची बंडलं टाकतं तर कुणी सोन्याच्या विटा-दागिने इत्यादी.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, भक्त हे निनावी टाकतात. तिरुपती संस्थानच्या प्रसिद्ध “हुंडी” मध्ये अश्या अनेक सामग्रीचं दान अर्पण होत असतं.

 

tirupati balaji hundi inmarathi

 

तिरुपती संस्थानच्या ह्या हुंडीबद्दल अनेक कथा आहेत. त्या हुंडीतील नोटा मोजण्यासाठीची यंत्रणा अचाट करणारी आहे. कित्येक लोक वेगवेगळ्या चाळण्या घेऊन नोटा मोजत असतात…!


 

tirupati balaji hundi collection counting inmarathi

 

असो – आपला विषय मात्र जरा वेगळा आहे.

तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की तिरुपती बालाजी मंदिरात भगवान बालाजीला आपल्या डोक्याचं मुंडण करून केस अर्पण करण्याची प्रथा आहे.

अनेक भाविक आवर्जून भक्तीभावाने आपले केस येथे अर्पण करतात. अर्पण केलेल्या केसांचा खच मंदिरात पडलेला असतो.

मंदिर प्रशासन ह्या सर्व केसांचं काय करतं हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.

 

tirupati-balaji-hair-auction-marathipizza02

स्रोत

या अर्पण करण्यात येणाऱ्या केसांचा पुढे लिलाव केला जातो…!

गेल्या दोन महिन्यात भक्तांनी अर्पण केलेल्या केसांचा नुकताच लिलाव करण्यात आला.

Guess करा, लिलावात या केसांना किती किंमत मिळाली असेल?

तब्बल १.८२ करोड रुपये…!

tirupati-balaji-hair-auction-marathipizza01

 

स्रोत

क्षुल्लक केस विकून एवढी रक्कम मिळवणार तिरुपती बालाजी मंदिर हे एकमेव ठिकाण भूतलावर असावं असं म्हटलं तर वावग ठरू नये!

हा लिलाव जुलै आणि ऑगस्टमध्ये भक्तांनी अर्पण केलेल्या केसांचा आहे. याआधी जुलैमध्ये करण्यात आलेल्या लिलावामध्ये देवस्थानाला ११.८८ करोड रुपये प्राप्त झाले होते.

बरं या विकत घेतलेल्या केसांचं पुढे काय होतं? उत्तर आहे – कृत्रिम केस बनवले जातात 😀

विदेशात सुट्ट्या केसांना प्रचंड प्रमाणात मागणी आहे. Wigs बनवण्यासाठी आणि सेलिब्रिटी फॅडच्या Hair Extensions साठी या केसांचा वापर केला जातो.

 

tirupati-balaji-hair-auction-marathipizza03

स्रोत

तिरुमाला तिरुपती देवस्थानचे चेअरमन चांदालवाडा कृष्णमूर्ती यांनी सांगितले:

ह्या पैश्यांचा वापर करून, ३९.३२ लाख लिटर दुध खरेदी करण्याचा निर्णय, आम्ही यावर्षी घेतला आहे. इतक्या दुधाची किंमत ११.२८ करोड रुपये आहे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसोबत लहान मुलांना देखील हे दुध देण्यात येईल.

सोबतच २.२५ लाख किलो गाईचे तूप देखील खरेदी करण्यात येणार असून एक किलो तुपाची किंमत ३७६ रुपये इतकी आहे.

त्या हिशोबाने सुमारे ८.४६ करोड रुपयांचे तूप खरेदी केल जाणार असून येणाऱ्या ६ महिन्यात प्रसाद बनवताना या तुपाचा उपयोग केला जाईल.

 

tirupati-balaji-hair-auction-marathipizza04

स्रोत

२००० वर्षे जुन्या या मंदिरात, दर वर्षी जवळपास १ कोटी भाविक आपले केस अर्पण करतात हे विशेष!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “तिरुपती मंदिरात भक्तांनी अर्पण केलेल्या केसांचं काय करतात: जाणून घ्या

  • November 20, 2018 at 11:33 pm
    Permalink

    nice

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *