गळणाऱ्या केसांमुळे त्रस्त आहात? या घरगुती उपायांनी तुमचे केस नक्कीच दाट आणि काळेभोर होतील…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

प्रत्येक मुलीला आपले केस हे शॅम्पूच्या जाहीरातीत असलेल्या मॉडेल प्रमाणे नीटनेटके आणि लांबसडक हवे असतात, वास्तवात ते शक्य असतच असं नाही कारण जाहीरात आणि खरं आयुष्य यात जमीन आसमानाचा फरक असतो!

केस हा माणसाच्या शरीराचा असा एक घटक आहे. ज्यावर माणसाचं व्यक्तिमत्व, त्याचा रुबाब अवलंबून असतो, मग ती व्यक्ती स्त्री असो किंवा पुरुष. प्रत्येक पुरुषाला आपले केस काळेभोर, छान असावेत असं वाटतं.

 

alia bhatt 2 inmarathi

 

प्रत्येकालाच चांगल्या दाट केसांची देणगी मिळतेच असं नाही किंवा ज्यांना ती देणगी मिळाली आहे त्यांचे केस टिकतीलच याचीही शाश्वती कुणी देऊ शकत नाही. त्यामागे लोकं अनुवांशिक कारण, किंवा वाढतं प्रदूषण अशी कारण देतात.

काहीअंशी ती योग्य सुद्धा असतात जसं की, जेनेटिक किंवा हार्मोनल बदल, तसंच शरीरात एखाद्या पोषक तत्वांचा किंवा व्हिटॅमिनचा अभाव किंवा जास्त तणाव, मधुमेह अशा परिस्थिती मध्ये केस गळणं हे स्वाभाविक आहे.

अर्थात, आजच्या जमान्यात सायन्स हे खूप पुढे गेलंय त्यामुळे हेयर स्पेशालिस्ट डॉक्टर, हेयर ट्रान्सप्लांन्ट अशा आधुनिक सेवा सुद्धा उपलब्ध आहेत आणि त्या तशा खर्चिक देखील आहेत! पण नॉर्मल केसेस मध्ये आपण स्वतः केसांची निगा राखणं हाच एकमेव उत्तम पर्याय आहे!

केस हा जसा बायकांचा जिव्हाळ्याचा विषय असतो तसाच पुरुषांचा सुद्धा तो विक पॉईंट असतो हे आपण सगळ्यांनी नुकत्याच आलेल्या आयुषमान खुरानाच्या ‘बाला’ या हिंदी चित्रपटातून पाहिलं आहे. कमी वयात केस गळल्यावर पडणारं टक्कल, त्याची उडवली जाणारी खिल्ली आणि त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनावर होणारा परीणाम हा आत्मविश्वास कमी  करतो.

 

ujda chaman inmarathi

 

ही गोष्ट स्त्री-पुरुष या दोघांच्या बाबतीत सारखीच लागू असते. साधारणपणे १० पैकी ६ व्यक्ती तरी या सगळ्या त्रासाला सामोरे जातात..!  शरीर किंवा अवयव मिळणं हे आपल्या हातात नसतं पण आपल्याला त्या विधात्याकडून जे मिळालं आहे त्याची काळजी घेणं, निगा राखणं हे आपल्याच हातात असतं!

बहुतेक लोकं इथेच मार खातात आणि जे हातात असतं ते सुद्धा निसटून जातं आणि उरतो तो फक्त पश्चात्ताप. जर ती वेळ तुमच्यावर येऊ नये असं वाटत असेल तर खाली दिलेले घरगुती उपाय तुम्ही नक्की करून बघू शकता.. 

 

१. व्हिटॅमिन्सची कमतरता भरून काढणे

 

vitamin-supplements-inmarathi
faze.ca

 

व्हिटॅमिन H, D आणि E मुख्यत्वे या तिघांच्या कमतरतेमुळे केस गळतात आणि याच व्हिटॅमिन्सचा योग्य पुरवठा झाल्यास ही केस गळती थांबवता येऊ शकते.

पण या व्हिटॅमिन्स च्या जास्त सेवनामुळे त्याचे साईड इफेक्ट्स सुद्धा होऊ शकतात त्यामुळे याची दक्षता घ्यावी!

 

२. खोबरेल तेलाचं योग्य पोषण

 

Coconut oil inmarathi
Ubud Botany Interactive

 

लहानपणी आपल्याला आई तेल लावून भांग पाडून शाळेत पाठवायची, पण जसजसे आपण मोठे होतो तसतसं त्या तेलाची जागा स्टायलिश क्रीम आणि जेल किंवा हेयर सिरम अशा गोष्टी घेऊ लागतात.  आणि तिथंच आपल्या केसाला आवश्यक असणार पोषण मिळणं बंद होतं, खरंतर खोबरेल तेलाचा छानसा मसाज आपल्या केसांच्या मुळापर्यंत जाऊन केसांना योग्य ते पोषण देतं.

त्यामुळे आपण कितीही कृत्रिम गोष्टींच्या मागे धावलो तरी खोबरेल तेलाची जागा कोणतंच प्रॉडक्ट घेऊ शकणार नाही!

 

३. आवळ्याचा रस

 

amla and hair inmarathi
hindi ava360

 

सध्या टीव्हीवर येणाऱ्या शॅम्पू आणि तेलाच्या जाहिरातीत याच गोष्टीचा भडीमार असतो की यात आवळ्याचे गुण आहेत वगैरे वगैरे, पण आवळ्याचा रस  त्या शॅम्पूपेक्षा दसपट गुणकारी असतो, ज्यामुळे खरंच केस वाढायला खूप मदत होते!

 

४. कांद्याच्या रसाचा वापर

 

onion oil inmarathi
youtube

 

त्वचाविज्ञानाच्या अभ्यासानुसार, कांद्याच्या रसाचा लेप डोक्याच्या त्वचेवर थेट लावल्यास तो सुद्धा केस गळती वर खूप गुणकारी असतो, हा उपाय जरा करणं कठीण आहे कारण सगळ्यांनाच कांद्याचा वास सहन होतोच असं नाही, पण ३० मिनिटं जरी तुम्ही याचा वास सहन करू शकला तर त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे एवढं नक्की!

 

५. जास्वंदाच्या फुलांच्या पाकळ्यांचा रस

 

jaswanda andd hair inmarathi
youtube

 

जास्वंदीच्या फुलाच्या ५ ते ६ पाकळ्याचा लेप खोबरेल तेलाबरोबर डोक्यावर लावल्यास डोक्याला एक वेगळाच थंडावा सुद्धा मिळतो आणि जास्वंद हे केस गळती थांबवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असं औषध आहे जे आपल्या आयुर्वेदात सुद्धा सांगितलेलं आहे!

 

६.ग्रीन टी

 

green tea inmarathi
Medical News Today

 

सध्याच्या तरुण पिढीचं पेय म्हणून ओळखला जाणारा ग्रीन टी सुद्धा केस गळती थांबण्यासाठी मदत करतो! चवीला इतका काही खास नसला तरी यात सुद्धा बरेच गुणकारी घटक आहेत जे आपल्या शरीराला सुद्धा फायदेशीर ठरतात, पण दिवसातून एक किंवा दोन कप पेक्षा जास्त याचे सेवन सुद्धा योग्य नाही!

 

७. अंड्यातला पिवळा भाग (Egg Yolk)

 

-Eggs-on-Hair inmarathi
fashionbuzzer

 

अंड्यातला हा पिवळा भाग काढून नीट फेटून त्याचा लेप डोक्याच्या त्वचेवर लावल्याने सुद्धा हेयर लॉसच प्रमाण बरंच कमी होऊ शकत, पण कांद्याच्या रसाप्रमाणेच हा उपाय सुद्धा प्रत्येकालाच करता येईल असं नाही, शिवाय त्याचा वास जाण्यासाठी नंतर शाम्पूचा वापर करावाच लागतो!

 

८. इतर काही सोपे उपाय

केस गळती थांबवण्याचे आणखीनही काही सोपे उपाय आहेत जसे की, केस जास्त घट्ट न बांधणे किंवा जास्त न ताणणे, अंघोळ झाल्यावर केस अलगद पुसणे आणि कंगवा फिरवणे, कोणतेही अपायकारक उपचार घेणे बंद करणे, धूम्रपान न करणे, थेट सूर्यप्रकाशापासून केसांची काळजी घेणे. कॅन्सरची किमोथेरपी घेत असताना डॉक्टर च्या सल्ल्याने कुलकॅप चा वापर करणे इत्यादी…

 

alia bhatt 1 inmarathi

 

हे असे काही उपाय जर तुम्ही केलेत तर नक्कीच तुमची केस गळती थांबण्यास मदत होईल आणि तुमचा गेलेला आत्मविश्वास तुम्हाला परत मिळवता येईल. केस गळती थांबण्यासाठी हे नैसर्गिक उपाय फायदेशीर आहेत. सध्याचा तंत्रज्ञानाच्या जमान्यात उपलब्ध असलेले कृत्रिम उपाय हानीकारक सुद्धा आहेत.

हेयर डाय किंवा मेहेंदीमध्ये असणारे अमोनिया सारखे घटक हे तात्पुरतं समाधान देतात पण नंतर हेच घटक अनेक प्रॉब्लम्स निर्माण करतात, तसेच कृत्रिम केस बसवण्याचे ऑपरेशन हे खर्चिक तर आहेच पण जर ते ऑपरेशन नीट पार पडले नाही तर त्याचे अत्यंत भयानक परीणाम सुद्धा होतात.  जसं की, डोक्यावर जखम होऊन त्यातून रक्त येणे वगैरे वगैरे..

तर या अशा रिस्की उपायांवर अवलंबून न राहता आजपासूनच आपण आपल्या केसांची निगा राखली आणि वर दिलेले घरगुती उपाय अवलंबले तरी सुद्धा आपण आपल्या केसांची आणि पर्यायाने आपल्या शरीराची सुद्धा उत्तम काळजी घेऊ शकतो!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?