उंची वाढवायचीय? या सात गोष्टी नियमित पाळल्या तर तुम्हाला नक्की मदत होईल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===


उंची ही आयुष्यातील एक महत्वपूर्ण घटक आहे. जरी उंची कमी असल्याने माणसाच्या एकूण व्यक्तिमत्वावर व प्रगतीवर त्याचा फारसा फरक पडत नसला तरी उंची हा एक आकर्षणाचा बिंदू आहे. उंच माणूस लोकांत उठून दिसतो.

कमी उंचीच्या लोकांना बऱ्याचदा कमी उंची मुळे एका न्यूनगंडाचा सामाना करावा लागतो. त्यामुळे उंची वाढवण्यावर लोकांचा भर असतो. पण ही उंची वाढवायची कशी हा प्रश्न उरतोच?

तर चिंता नसावी ह्या पोस्ट मधून आम्ही तुम्हाला उंची वाढवण्याचे काही सोपे उपाय सांगू, ते केल्यावर तुम्हाला बदल जाणवेल..

 

tall-inmarathi
chitramala.in

आपल्या शरीराची उंची २०% तरी पर्यावरणावर, कसरती आणि आपल्या खानपानावर अवलंबून असते. त्यामुळे आपण आपली उंची नैसर्गिकरित्या वाढवू शकतो.

त्यासाठी आयुष्यातील काही बेसिक गोष्टी समजून घेत त्यांना योग्यतर्हेने फॉलो केल्यास तुम्हाला बदल जाणवेल.

उंची वाढवण्यासाठीचे ७ उपाय :

१) भरपूर, पुरेशी झोप घ्या

 

sleep-main-inmarathi.jpg
indianexpress.com

आपल्या शरीरातील मांसपेशींची वाढ जेव्हा आपण आराम करत असतो तेव्हा होत असते. भरपूर आणि पुरेशी झोप ही वाढत्या शरीरासाठी गरजेची आहे.

ह्युमन ग्रोथ हार्मोनचं आपल्या शरीरातील उत्सर्जन आपण जेव्हा गाढ निद्रेत असतो तेव्हा होत असतं. वाढत्या वयातील मुलांना ११ तासाची झोप अत्यावश्यक असते.

आपल्या भोवतीच वातावरण झोपेसाठी अनुकूल असेल याची पूर्ण दक्षता घेतली पाहिजे. कुठलाही गोंगाट, आवाज अथवा प्रकाश तेथे नसला पाहिजे. झोपण्या आधी गरम पाण्याने अंघोळ करा, ज्याने दिवसभरातला थकवा नाहीसा होतो आणि शांत झोप लागत असते.

२) नियमित कसरत आणि व्यायाम करा

 

Gym training workout

नैसर्गिकरित्या उंची वाढवण्यासाठी शारीरिक दृष्ट्या सक्षम असलं पाहिजे. नियमीत व्यायाम आणि खेळ खेळल्याने उंचीत वाढ होऊ शकते. जेव्हा तुम्ही शारीरिक दृष्ट्या क्रियाशील असतात, तुमचं शरीर अधिक हेल्दी न्यूट्रिएन्ट्स ची मागणी करते व त्या न्यूट्रिएट्सच्या सेवनाने वाढ होते.

स्विमिंग, ऐरॉबिक्स, टेनिस , क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल आणि स्ट्रेचिंगचे व्यायाम केल्यावर आपल्या बॉडीच्या वाढीला चालना भेटत असते.

एका अभ्यासानुसार शारीरिक वाढि मध्ये हाडांचा वाढीचा खूप मोठा वाटा असतो. त्यामुळे नियमित व्यायाम आणि खेळ हे आपल्या दैनंदिन व्यवहाराचे महत्वपूर्ण घटक असतात.

३) योगासने

 

Woman-doing-yoga-Shutterstock-800x430
youtube.com

योगा ही कमी त्रासदायक आणि कमी तणावपूर्ण असणारा प्रकार आहे. योगा शरीराची क्षमता वाढवते. काही योगप्रकार शरीरातील ग्रोथ हार्मोन्सचा उत्सर्जनाला कारणीभूत ठरतात.

ह्यातून शरीराला योग्य आकार येतो. वेगवेगळ्या मुद्रा केल्यावर उंची वाढते. सूर्य नमस्कार यासाठी जास्त उपयोगी ठरतो.

४) शरीराची ठेवण व्यवस्थित असली पाहिजे

 

Handsome powerful athletic man performing push ups at the gym. Strong bodybuilder with perfect back, shoulders, biceps, triceps and chest.
4men.pt

लहानपणापासून शरीराची ठेवण योग्य राहील याची काळजी घेतली पाहिजे. सरळ बसल्याने, खांदे सरळ ठेवल्याने, हनुवटी उंचवल्याने, स्ट्रेट उभं राहिल्याने , सरळ चालल्याने, न वाकल्याने तुम्ही तुमच्या शरीराची ठेवण टिकवून ठेवू शकतात.

पाठीचा कणा ताठ असल्याने शरीर वाढीसाठी अनुकूलता येते. मान पाठ एका रेषेत असली तर शरीराचा एकूण बांधा व्यवस्थित दिसतो. चांगल्या प्रकारचा बिछाना असणं यासाठी गरजेचं आहे.

५) संतुलित आहार

 

food-inmarathi
reynolds.com

संतुलित अन्न सेवन केल्यास शरीराला न्यूट्रिशन मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतात. जंक फूड पासून लांब राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कार्बोनेटेड ड्रिंक्स, फॅट्स चं सेवन टाळलं पाहिजे.

व्हिटॅमिन आणि मिनरल्स शरीराच्या वाढी साठी उपयुक्त असतात. अनेक प्रकारचे अन्नपदार्थ आहेत जे संतुलित आहारासाठी फायदेशीर ठरतात. त्यांचं सेवन केले पाहिजे.

झिंक, ड जीवनसत्व, प्रथिने, प्रोटिन्सचा साठा असलेल्या अन्नाचं सेवन मोठ्याप्रमाणावर केलं गेलं पाहिजे. हिरव्या पालेभाज्या, चॉकलेट, अंडी, वाटाणे ह्यांचा सेवनाने वाढीला चालना मिळते. दुधातून कॅल्शियमचा चांगला स्रोत उपलब्ध होत असतो.


सहा वेळा दिवसातून संतुलित आहाराचे सेवन केल्यास शरीराचा वाढीसाठी अनुकूलता येते. परिणामी उंची वाढण्यास मदत होते.

६) वाढीच्या खुंटीला कारणीभूत असणाऱ्या बाह्य आणि अंतर्गत बाबी पासून सावध रहा. ह्यासाठी खालील गोष्टी लक्षात असू द्या

 

gym-marathipizza00
musclesteroids.uk

स्ट्रेरॉईडच अधिक सेवन करू नका, जास्त प्रमाणावर बाहेरील खाद्य पदार्थांचे सेवन करू नका. कॉफीच शरीरातील प्रमाण कमी करा, खासकरून लहान मुलांना यापासून लांब ठेवा.

८ तासांंची अत्यावश्यक झोप घ्या. दारू आणि अमली पदार्थांचे सेवन तुमच्या शारीरिक विकासाला मारक ठरतात.

वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचे अधिक सेवन सुद्धा तुमच्या एकूण शारीरिक वाढीवर परिणाम करत असतात. त्या सर्व गोष्टी टाळा ज्या तुमच्या शरीराला नुकसानकारक ठरतात.

७) वैद्यकीय मदत घ्या

 

doctors-coat-inmarathi
adigaskell.org

जर तुमच्या वयासोबत तुमची उंची वाढत नसेल तर तुम्ही योग्य तो वैद्यकीय सल्ला ह्यात घेऊ शकतात. विविध टेस्ट करून तुमची उंची न वाढण्याची कारण जाणून घ्या, त्यानुरुप उपलब्ध औषधोपचार डॉक्टरांच्या सल्ल्याने घेत रहा. त्याने निश्चितच फरक पडेल.

ह्या सर्व गोष्टीचा योग्यप्रकारे अवलंब केल्यास शरीराच्या वाढी साठी अनुकूलता निर्माण होते. तूमची उंची वाढण्यास मदत ह्यामुळे होत असते.


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
2 thoughts on “उंची वाढवायचीय? या सात गोष्टी नियमित पाळल्या तर तुम्हाला नक्की मदत होईल

 • December 21, 2018 at 4:22 pm
  Permalink

  super

  Reply
 • May 29, 2019 at 4:26 pm
  Permalink

  Maje age 27 ahe.ata maji unchi vadhel ka ya tips ne..maji hight 4.5 ahe

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?