हॉस्टेल लाईफ सुरू करणाऱ्या तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाच्या टिप्स!

===

===

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

एखादा मुलगा जेव्हा स्वतःच घर सोडून एखाद्या दुसऱ्या शहरात हॉस्टेलला वास्तव्यास जातो तेव्हा त्याच्या समोर अनंत अडचणी असतात. सर्वात प्रमुख अडचण असते ती खाण्या पिण्याची !

InMarathi Android App

घरी असल्यावर दिवसातून तीन ते चार वेळा आईच्या हातचं गरमा गरम खायला मिळणाऱ्या मुलाला जेव्हा हॉस्टेलला गेल्यावर एकवेळच्या चांगल्या जेवणाची भ्रांत निर्माण होते, तेव्हा त्या मुलाला होणारा त्रास तो मुलगाच जाणतो.

मेस मध्यल्या जेवणाने समाधानी होणारा मुलगा शोधून सापडणार नाही, मेसच्या जेवणाचा कंटाळा काही दिवसांतच येऊ लागतो.

अश्यावेळी त्या मुलाला सहारा उरतो तो इंस्टट मिक्स फूडचा, घरी असल्यावर किचन मध्ये न जाणाऱ्या मुलाला ज्यावेळी स्वतच्या हाताने जेवण बनवावे लागते, त्यावेळी त्या मुलाला खऱ्या अग्निदिव्याचा सामना करावा लागतो, मग भले ते काम मॅगी बनवण्याचं का असेना !

 

hostel life inmarathi
Guys World
===
===

अनेकांना हॉस्टेलला गेल्यावर स्वतचे कपडे धुणे तसे इस्तरी करणे देखील जमत नसते. अनेकांना होम सिकनेसचा त्रास पण उद्भवतो, अनेकांना सर्वच अडचणी उद्भवतात!

अर्थातच याला देखील काही अपवाद असतात, पण ह्या अडचणीचा सामना  बहुतांश मुलां- मुलींना करावा लागत असतो. अश्याच नव्याने हॉस्टेलला गेलेल्यांना मार्गदर्शन करणारी अजिंक्य रहाळकर यांची फेसबुक पोस्ट ..

===

आत्ताच मॅगीची जाहिरात पाहिली, आई मुलाला फोनवरून मॅगी करायला शिकवते, घराखाली असूनसुद्धा. काय तर म्हणे हॉस्टेलची तयारी. मॅगी आली आणि तो पोरगा झाला तयार हॉस्टेलला रहाण्यासाठी!

हा मार्केटींगचा फंडा जबरदस्त आणि उपयोगी असला तरी फक्त मॅगी आली म्हणजे सगळं झालं असा गैरसमज अजिबात करून घेऊ नका.

मॅगी ही फक्त वेळ मारून नेण्यासाठी म्हणून खायची असते. हॉस्टेलला असताना आणि महिनाअखेरीस अगदीच कमी पैसे असताना पोटभरीचा ऑप्शन म्हणून आहेच.

हॉस्टेलला रहात असताना पोट बिघडवण्यापासून स्वतःला वाचवायचं असेल तर किमान खिचडी, पोहे, उपमा हे तीन पदार्थ आणि साध्या फोडणीच्या भाज्या जसं की बटाटा, कोबी, फ्लॉवर या आल्याच पाहिजे नंतर तुमची expertise लेव्हल वाढली की वेगवेगळे पदार्थ तुम्हाला आरामात करता येतील.

 

kota factory inmarathi
youtube.com

पोळ्या बनवायचा उरक आणि ईच्छा असेल तरच शिका नाहीतर हल्ली बऱ्याच ठिकाणी पोळ्या चांगल्या मिळतात. याला हलक्यात घेऊ नका नाहीतर मग खिसा हलका होतो आणि नंतर पोट नको तेंव्हा हलकं व्हायला लागतं.

उबर इट्स, स्वीगी, झोमॅटो ह्या जेवण मागवण्याच्या ऍप्सच्या जंजाळात आणि शेकडो हॉटेल्सच्या महासागरात आपल्या खिशाला परवडतील आणि जिभेला रुचतील अशी हॉटेल्स शोधायची प्रॅक्टिस चांगली करून ठेवावी.

कारण अचानक जेवण मागवायला लागलं आणि अर्ध्या पाऊण तासाच्या प्रतीक्षेनंतर आलेलं जेवण जर अत्यंत बकवास असेल तर संताप होतो.

सतत मिळणारे discounts, ऑफर्स यांचा लाभ घ्यायला अजिबात काचकूच करू नका, नंतर त्याचा उपयोग होतो.

चांगले चांगले डायनिंग हॉल कुठे आहेत हे शोधून ठेवा. जेंव्हा घरचं आणि चारीठाव खायची प्रचंड ईच्छा होते तेंव्हा हे डायनिंग हॉल मदतीला येतात.

 

hostel boys food inmarathi
Twenty1

स्वीट असलंच पाहिजे असा आग्रह धरून स्वीट नसलेले डायनिंग हॉल reject करू नका, बाकीचं जेवण अत्यंत रुचकर असू शकतं.

मेसचं जेवण शक्यतो टाळा. मेसच्या जेवणात भरपूर सोडा वापरतात त्यामुळे आपण कितीही खाल्लं तरी पोट जड पडतं नंतर पचनाच्या तक्रारी सुरू होऊन भयानक acidity चा त्रास सुरू होऊ शकतो.

भलेही बाकीच्या अवाजवी आणि फालतू खर्चांना फाटा द्यायला लागला तरी चालेल पण चांगलं आणि स्वतःला आवडेल ते अन्न पोटात जाईल याची काळजी घ्या.

फक्त मेसच परवडत असेल तर मग घरी बनवून खा साधारण तितकेच पैसे लागतात, यासाठी पुन्हा तिसरा परिच्छेद वाचा.

 

hostel mess inmarathi
meetsayantan.wordpress.com

अगदी गरजेच्या वस्तू जसं की कपड्याचे-भांड्याचे, अंघोळीचे साबण, टूथ ब्रश, टूथ पेस्ट, Inner wears, कॉलेजचं साहित्य, गाडी असेल पेट्रोल सोडून शॉपिंग करण्याचा मोहं शक्यतो टाळा ते पैसे चांगलं खायला आणि इमर्जन्सीत वापरता येऊ शकतात.

शक्यतो सगळे कायदे पाळा, हेल्मेटचा होणारा दंड खिशाला फार मोठं भोक पाडू शकतो.

कुणाशीही नडण्याआधी आपल्या किती ओळखी आहेत आणि आपण किती पैसे देऊ शकतो याचा विचार करून नडा नाहीतर ही नडानडी महागात पडू शकते.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांच्या नादी लागून सट्टे लावणं, कुठेही पैसे गुंतवणं, माहिती नसताना शेयर्स विकत घेण्याचे मोहं टाळा. नको तिथे पैसे गुंतवल्याने शिक्षण अर्धवट सोडावं लागलेली मुलं मी स्वतः पाहिलेली आहेत.

 

satta inmarathi
India Today

हॉस्टेलला कसं रहायचं हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. आपला attitudeच उदास आणि रडका असेल तर हॉस्टेल म्हणजे फक्त स्ट्रगल एवढीच आठवण तुमच्या मनात राहू शकते. त्यामुळे हॉस्टेल डेज एन्जॉय करा, भरपूर-चांगलं खा आणि स्वस्थ रहा.

कारण हॉस्टेल ला राहिलं म्हणजे वजन कमी झालंच पाहिजे हा काही नियम नाही आपण असल्या नियमांचे गुलामही नाही…!

-अजिंक्य रहाळकर

===
===

===

 

hostel life inmarathi
The Himalayan Times

अश्या प्रकारे अजिंक्य राहाळकर यांनी आपल्या पोस्टच्या माध्यामातून हॉस्टेलला जाणाऱ्या आणि हॉस्टेलवासी असलेल्या मुलांना खाण्या पिण्याच्या चॉईस बद्दल योग्य ते मार्गदर्शन केले असून, पाळायच्या अश्या काही निवडक महत्वपूर्ण सूचना देखील दिल्या आहेत.

जर तुम्ही हॉस्टेलला राहत असाल अथवा आधी हॉस्टेलला राहिले असाल, तर अजिंक्य यांच्या पोस्टमध्ये अंतर्भूत नसलेल्या, पण तुम्ही जाणता अश्या सूचना नक्की कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा !

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “हॉस्टेल लाईफ सुरू करणाऱ्या तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाच्या टिप्स!

  • May 21, 2019 at 11:00 am
    Permalink

    very nice lecture I am thanks

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *