' आता जिथे-जिथे तुम्ही जाणार, तुमचे ‘टायनी हाउस’ तुमच्या सोबत येईल – InMarathi

आता जिथे-जिथे तुम्ही जाणार, तुमचे ‘टायनी हाउस’ तुमच्या सोबत येईल

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

घर… जिथे आपण आपल्या कुटुंबासोबत राहतो. तुम्ही जगात कुठेही जा पण जे सुख तुम्हाला आपल्या घरात आपल्या लोकांमध्ये मिळत तसे अजून कुठेही नाही. पण आजच्या आधुनिक युगात जिथे सर्वच यशस्वी होण्यासाठी स्पर्धा करत आहेत, त्यांना कधी कधी आपल्या घरापासून दूर देखील व्हावे लागते जे खरच खूप त्रासदायक असत.

पण आता काळ बदलत चालला आहे. नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहेत. लोकं आपल्या सोयीप्रमाणे नवनवीन प्रयोग करायला लागले आहेत. मग आपण आपल्या घराला कसे विसरणार. जिथे आज आपण आपली गाडी, आपलं इतर समान एका ठिकाणाहून दुसरीकडे नेऊ शकतो, मग घर का नाही? हे ऐकायला जरा विचित्र वाटत, कारण घर हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे कसं बरं शक्य आहे? तुम्हाला असेच वाटत असणार. पण आजच्या जगात काहीही शक्य आहे.

 

tiny house-inmarathi

आज आम्ही तुम्हाला एका अश्या घराबद्दल सांगणार आहोत जे तुम्ही तुमच्यासोबत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकता, म्हणजेच तुम्ही जिथे जिथे जाणार तिथे तिथे तुमचे घर देखील तुमच्यासोबत येणार.

हे एक छोटसं घर आहे, ज्याला टायनी हाउस म्हणतात…

 

tiny house-inmarathi08

हे टायनी हाउस केवळ ५०० चौरसफुटाच्या जागेत बनले आहे.

हे घर एवढे लहान असल्याने जर कधी तुम्ही कुठे फिरायला जात असाल तर तुम्ही तिथे हे घर देखील घेऊन जाऊ शकता. त्यामुळे आपण घरी नसताना आपल्याला घराची चिंता सतावणार नाही.

 

tiny house-inmarathi06

हे घर बनविण्यासाठी २३,००० डॉलर्स म्हणजेच १४,८३,१५१ रुपयांचा खर्च लागतो.

 

tiny house-inmarathi03
या घरांची कॉन्सेप्ट इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एका कलाकाराच्या डोक्यात आली, त्यांचे नाव Allan Wexler असून १९७० साली त्यांना ही कल्पना सुचली.

 

tiny house-inmarathi02

यानंतर Lester waker यांनी यावर एक पुस्तक एखील लिहिले. ज्याचं नाव “Tiny Houses:Or How to Get Away From It All” असे आहे.

 

tiny house-inmarathi04

भलेही हे घर दिसायला लहान दिसत असले तरी या घरात तुम्हाला गरजेच्या सर्व वस्तू मिळतील.

 

tiny house-inmarathi05

ही आहे एक टायनी हाउस कम्युनिटी…

Colorado येथे ४-१० डिसेंबर२०१७ ला येथे एक फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. जेथे सर्वांना हे टायनी हाउस बघायला मिळाले.

२०१५ साली ‘small is beautiful’ नावाची एक डॉक्यूमेंट्री बनविण्यात आली. ही डॉक्यूमेंट्री बघितल्यावर तुम्हाला देखील अश्या कुठल्या घरात जाऊन राहावसं वाटेल.

 

tiny house-inmarathi01

Carbondale च्या तुरुंगात १५ वर्ष राहिल्यानंतर या व्यक्तीला तुरुंगाची एवढी आठवण यालला लागली की, त्याने तुरुंगाच्या आकाराचे टायनी हाउस बनवले, जेणेकरून त्याला तुरुंगाची आठवण येऊ नये.

 

तर असे हे टायनी हाउस, याला बघितल्यावर तुमच्यापैकी अनेकांची या छोट्याश्या घरात राहायची इच्छा नक्कीच झाली असेल…

स्त्रोत : wittyfeed

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?