२०१६ वर्षात ७६ वाघांची शिकार; Save Tigers अभियान ठरले फेल

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

भारतामधून वाघांची कमी होत असलेली संख्या हा सर्वच प्राणी आणि पर्यावरणप्रेमींसाठी चिंतेचा विषय बनला होता. त्याला पर्याय म्हणून सेव्ह टायगर्स अभियान सुरु करण्यात आले. सुरुवातीला या अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळाला, जनजागृतीपर कार्यक्रमांचे सत्र सुरु झाले, पण ‘टायगरनेट’ या संकेतस्थळाने नुकाही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या अहवालाचा विचार करता सेव्ह टायगर्स अभियान या घडीला मात्र पूर्णत: निष्क्रिय झाल्याचे लक्षात येते.

InMarathi Android App

tigers-poaching-marathipizza01

स्रोत

अहवालानुसार जानेवारी ते ऑक्टोबर २०१६ या काळात सुमारे ७६ वाघांची शिकार करण्यात आली. ही गेल्या सहा वर्षातील सर्वात मोठी आकडेवारी आहे. शिकार करण्यात आलेल्या एकूण वाघांपैकी ४१ वाघांच्या शिकारीची तपासणी सुरु आहे. तर ज्या वाघांच्या शिकारीची तपासणी पूर्ण झाली आहे त्यामध्ये सरळ सरळ मानवी कृतीचा हात असल्याचे आढळून आले आहे. वाघांच्या सर्वाधिक शिकारीमध्ये मध्यप्रदेश अव्वल स्थानावर आहे. तर ज्या कर्नाटक राज्यात सर्वाधिक वाघ आढळून येतात त्या राज्याचा या क्रमवारीत दुसरा क्रमांक लागतो. कर्नाटकात २०१६ वर्षी सुमारे १३ वाघांची शिकार झाल्याचे आढळून आले.

२०१० पासून वाघांच्या मृत्युच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या वर्षी म्हणजे २०१५ साली ६९ वाघ मृत झाल्याची नोंद करण्यात आली.

ट्रॅफिक इंडिया या संस्थेचे प्रमुख ‘शेखर कुमार नीरज’ यांच्या म्हणण्यानुसार,

“ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात वाघांच्या शिकारी मोठ्या प्रमाणावर केल्या जातात. शिकारी हाच काळ का निवडतात याचे ठोस उत्तर मात्र अजूनही मिळू शकलेले नाही. २०१६ मध्ये वाघांच्या मृत्यचे प्रमाण १०% ने वाढलेले आहे आणि या गोष्टीकडे अतिशय गंभीर दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. महाराष्ट्रामध्ये देखील ताडोबा आणि मेळघाट या जंगल प्रदेशांमध्ये वाघांची संख्या जास्त असल्याने तेथे देखील शिकारीची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.”

tigers-poaching-marathipizza02

स्रोत

गेल्या काही काळामध्ये शिकाऱ्यांवर धाड घालण्याचे सत्र सुरु करण्यात आले होते. ज्यामुळे प्राण्यांच्या शिकारीला काही प्रमाणात आळा बसल्याचे शासनाचे म्हणणे आहे. परंतु सदर आकडेवारी पाहता शासनाचा दावा फोल ठरण्याचीच जास्त चिन्हे आहेत.

वाघांच्या शिकारी आणि त्यांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी सर्वप्रथम फोरेस्ट डिपार्टमेंट मधील
सुरक्षारक्षकांच्या जागा भरण्याची नितांत गरज आहे. वाघांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांची सुरक्षा करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळच उपलब्ध नसल्याने शिकाऱ्यांना आयते खाद्य मिळते. त्यामुळे फोरेस्ट डिपार्टमेंमधील सुरक्षा रक्षकांच्या रिक्त असणाऱ्या जागांवर सक्षम व्यक्तींची नेमणूक केल्यास आपसूकच शिकारीच्या प्रमाणात कमालीची घट होण्यास मदत होईल असे काही जाणकारांचे देखील मत आहे.

आपल्या देशातील वन्यजीव संपत्ती सध्या अत्यंत हलाखीच्या स्थितीत आहे. त्यांच्या संवार्धानाकरिता केवळ अभियाने राबवणे पुरेसे नाही, तर त्यापुढेही एक पाउल जाऊन वन्यजीव संपत्तीला धोका पोचवणाऱ्या प्रवृत्तींना कठोर शिक्षा देऊन त्यांच्यावर जरब बसवणे देखील तितकेच गरजेचे आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *