ती सध्या काय करते? – विनोद पुरे, आता हे वाचा!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

“ती सध्या काय करते?” ह्या चित्रपटाच्या टायटलवरून सध्या सोशल मीडियावर मेसेजस ची धूम सुरू होती. सतीश राजवाडे सारखे दिग्दर्शक, अंकुश चौधरी आणि तेजश्री प्रधान – ह्यां सारखे लोकप्रिय कलाकार आणि जोडीला – मराठी मनाच्या लाडक्या “लक्ष्या”चा मुलगा – अभिनव बेर्डे आणि गोड गळ्यासाठी प्रसिद्ध असलेली आर्या आंबेकर — असं वजनदार समीकरण असलेला हा चित्रपट वलय प्राप्त करणार होताच. परंतु नावीन्यपूर्ण नावामुळे त्याला अजून जास्त “व्हायरल” प्रसिद्धी मिळाली होती.

“ती सध्या काय करते?” – ह्या एका मथळ्याखाली कुणी आपल्या शाळेतील प्रेयसीचे किस्से शेअर करत होते तर कुणी बायकोचा अप्रत्यक्ष उल्लेख करून विनोद करत होते. ह्याच पार्श्वभूमीवर, ॲडवोकेट महेश भोसले – ह्यांनी मात्र वेगळाच हळुवार पदर उलगडला.

caged-woman-marathipizza

मूळचे बीडचे असणारे ॲडवोकेट भोसले आता औरंगाबादमधे अनेक सामाजिक प्रश्नांवर झोकून देऊन कार्य करीत आहेत. भोसलेंनी “ती सध्या काय करते?” ह्या वाक्याचा धागा पकडून एक सुरेख कविता लिहिली आहे. ह्या कवितेतून, त्यांचा सामाजिक जाणिवेने संपन्न असलेला मनाचा हळुवार कोपरा उजळ होतोच, शिवाय आजच्या समाजाचं चित्र देखील स्पष्ट होतं.

नक्की वाचा ही कविता –

===

ती सध्या काय करते…?

ती गर्भात असतानाच तपासली जाते..
एखादीच ती अनेक यातनातुन जन्म घेते…

ती हसते, बागडते आईच्या कुशीत…
पण ते तीचे हसणे बागडणे कुशीतच संपते…
आणि वयाबरोबर बनत जाते ती आस्मीता, खानदान की ईज्जत वगैरे…

मग ती जीवंतपणी बनते गुलाम पुरुष नावाच्या प्राण्याची…
तो कधी बाप असतो, कधी भाऊ असतो, कधी प्रीयकर असतो तर कधी नवरा…
हे सर्व तीला वापरतात आपले पुरुषी नाते अबाधित करण्यासाठी…

human-trafficking-marathipizza

स्रोत

आणि हेच पुरुषी षंढ पुन्हा दुसऱ्या घरातील “ती हल्ली काय करते” विचारत रहातात…!

हो पण ती थांबली नाहीये…ती लढलीय आणि लढतेय देखील…!

विनाकारण होणाऱ्या स्पर्षासोबत, ती लढतेय – छाताडावर टपलेल्या वासनांध नजरेसोबत…
ती लढतेय खानदान की ईज्जत नावाखाली लाउन दिलेल्या लग्न नावाच्या टाकाऊ परंपरेसोबत…

हल्ली ती काय करतेय…

ती सुनीता विल्यम्स झालीय…
ती कल्पना चावला झालीय…
ती सायना, सानीया झालीय…

तरीही आपण तीच्यात सनीच शोधत विचारतो…
हल्ली ती काय करते…

हल्ली ती फक्त गर्भातच नाही मारली जात
तर ती रोज मारली जातीये परंपरेने…

तीच्यावर कुठला एक नराधम नाही करत बलत्कार…

तर त्या नराधमाने केलेल्या बलत्काराची पायरी करुन चढतात तीच्यावर हजारो राजकीय ईमले…

rape-girl-woman-molestation-marathipizza

स्रोत

हल्ली ती काय करते…

ती पल्लेदार, अस्मीतावाचक भाषनाचा ती विषय बनलीये…
मेलेल्या चीतेवर पोळ्या भाजण्यासाठी ती एक साधन बनलीये…
हो तीच आई, बहीण, मैत्रीण, प्रेयसी आणि बायको…

रोज रात्री समाजमान्य बलत्कार स्वीकारुन
जन्म देते जाती, धर्म, फालतु आस्मीता, देव, दंगे यात गुरफटलेल्या क्रियाशुन्य भावनीक समाजाला…

हल्ली ती विनाकारण हसण्याचा प्रयत्न करते…

बापाच्या ईज्जतीसाठी नवऱ्याच्या छळाला सहन करत…

कारण तीचं अस्तीत्व दोन घराच्या बाहेरसुध्दा आहे –
याचा तीला कुणी विश्वासच देत नाहीये…

तीने काहीही केले तरी तीला विचारलेच जाते…

हल्ली ती काय करते….?

===

मूळ पोस्ट इथे क्लिक करून वाचू शकता.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?