' घड्याळाच्या काट्यावर चालणारे मुंबईकर, पण पूर्वी त्यांचं घडयाळच चुकीची वेळ दाखवायचं… – InMarathi

घड्याळाच्या काट्यावर चालणारे मुंबईकर, पण पूर्वी त्यांचं घडयाळच चुकीची वेळ दाखवायचं…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मुंबई हे स्वप्नांचे शहर म्हणून ओळखले जाते. देशातील कित्येक तरुण आपल्या उराशी बाळगलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी या स्वप्ननगरी असलेल्या मुंबईत येतात. या मुंबईत प्रत्येकजण धावत असतो.

कुणी गाडीच्या मागे, तर कुणी पैश्याच्या मागे आणि कुणी यशाच्या मागे धावताना आपल्याला या मुंबई शहरात दिसून येतो. पोट भरण्यासाठी दररोज येथील माणसांना बाहेर पडावेच लागते.

प्रत्येकजण आपल्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी नेहमीच वेळेवर निघतो आणि वेळेवर पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो, पण तरीही त्याला काही न काही कारणावरून थोडा उशीर होतोच.

आजकाल १०-१५ मिनिटे उशीर होणे साहजिक आहे. मुंबईमधील ही अवस्था जवळजवळ सर्वच लोकांची आहे. मिटिंगला उशीर होणे हे पण तितकेच या मुंबईमध्ये होते आणि अश्यावेळी प्रत्येकाची कारणे वेगळी असतात. पूर्वी मात्र एक वेगळाच गोंधळ असायचा.

कदाचित अनेकांना ह्या एकाच कारणामुळे “उशीर” ही होत असावा…कारण…मुंबईत  वेळेचे मानक एकच नव्हते – तब्ब्ल ३ मानके होती!

एक काळ असा होता जेव्हा मुंबई तीन वेगवेगळे टाईम झोन फॉलो करायची. हे थोडं विचित्र वाटतंय ना ! पण हे खरं आहे. मुंबईचे लोक १९ व्या शतकापासून या गोंधळात फसलेले होते. चला तर मग जाणून घेऊया, या मुंबईच्या बदलत्या टाईम झोनबद्दल…

 

Mumbai's clock.Inmarathi
depositphotos.com

१९६० मध्ये ऑस्ट्रेलियन विद्वान जेम्स कॉस्मोस मॅसेलोस हा मुंबईमध्ये शहरी इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी आला होता. त्याच्या संशोधनाच्या दरम्यान शहराच्या एका विशिष्ट पैलूमध्ये त्याचा रस वाढत गेला.

त्याने याला ‘बॅटल ऑफ द क्लॉक’ असे संबोधले. अपॉईंटमेंट्स लवकर निघून देखील पोहोचायला उशीर का होतो, हेच त्यांना समजत नव्हते. त्यावेळी ते १८७० मधील ‘बॉम्बे टाईम’ वर दोष देत असत. त्याने अजून काही कार्यालयीन अभिलेख जमा करायला सुरुवात केली.

त्याने मुंबईतील काळा घोडा येथे असलेल्या महाराष्ट्राच्या टाईम झोनचे आणि लंडनमधील भारतच्या कार्यालयामध्ये असलेल्या अभिलेखांमधील फरक समजून घेण्यास सुरुवात केली.

‘बॉम्बे टाईम’ या शोधण्यात आलेल्या टाईम झोनला मुंबई शहरातील काही भागच फॉलो करत असत. हा टाईम झोन ग्रीनविच मीन टाइम (जीएमटी) च्या ४ तास ५१ मिनिटे पुढे होते आणि सूर्याच्या हालचालीवर आधारीत होते.

हे केवळ सायन ते माहीमपर्यंत फॉलो करत होते. भारताचा उर्वरित प्रदेश इतर मानकांनुसार, म्हणजेच रेल्वे टाईम (ज्याला मद्रास टाइम/इंडियन मीन टाइम असेही म्हटले जाते) नुसार चालत होते. जे ग्रीनविच मीन टाईम (जीएमटी) च्या ५ तास २१ मिनिटे पुढे होते.

 

Mumbai's clock.Inmarathi1
Pinterest

या दोन टाईम झोनमध्ये ३० मिनिटांचा फरक होता. म्हणजे जर तुमचे घड्याळ सकाळचे ११ वाजले आहेत असे दाखवत आहे आणि ट्रेन सकाळची ११.३० आहे. तर ती ट्रेन तुम्हाला मिळू शकत नाही, कारण जेव्हा ११ वाजता तुम्ही निघाल त्यावेळी ती ट्रेन तुमच्या स्थानकावर पोहोचली असेल आणि तुम्ही जाण्याच्या आधी त्या स्थानकावरून गेलेली असेल…!

त्यामुळे रेल्वेच्या टाईम झोननुसार जर तुम्हाला ट्रेन पकडायची असेल, तर तुम्हाला बॉम्बे टाईम झोननुसार ३० मिनिटे लवकर निघावे लागेल. त्यामुळे काहीवेळा यामध्ये गोंधळ होत असे. यावर तोडगा म्हणून सर जेम्स फॉर्ग्युसन यांनी यावर काही प्रमाणात तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.

पण दोन झोनचा हा गोंधळ संपला नाही, कारण मुंबई हे देशाचे सर्वात महत्त्वाच्या बंदरांपैकी एक होते. शहराच्या पूर्वेकडील समुद्रावरील समुद्रमार्गाचे पोर्ट मानक म्हणून ओळखले जाणारे एक मानक होते.

जे कुलाबा वेधशाळेने आणि नानाभाऊ अरदिशर फ्रामजी मोस यांनी पोर्टचा मानक वेळ जीएमटीच्या ५ तास पुढे नेली.

 

Mumbai's clock.Inmarathi2
parsikhabar.net

त्यामुळेच असं म्हणता येईल की ह्या काळात मुंबईकरांचं घड्याळ “अचूक” वेळ दाखवू शकत नसे…करणं “अचूक” वेळ ठरवणार कशी?!

आपण शहरात फिरत असताना आपल्याला वेगवेगळ्या टाईम झोनची घड्याळे दिसत असत. घड्याळ टॉवर्स, चर्च घंटा, सिग्नल टाईम आणि रेल्वे ह्या वेगवेगळ्या टाईम झोनने चालायचे. पण त्या शतकाच्या समाप्तीनंतर या वेळेतील फरकाचा काही जास्त फरक पडला नाही.

३० इकडे – तिकडे झाली, तरी देखील काही फरक पडत नव्हता. टेलीग्राफच्या शोधानंतरच, अचूकतेची आवश्यकता उदयास आली.

शेवटी हे सर्व संपले, जेव्हा मुंबईसह सर्व देशाने एकच मानक वेळ स्वीकारला.

अलाहाबादमधील वेधशाळेने भारतीय मानक वेळ (आयएसटी) म्हणून ओळखले जाणारे एकाच मानक भारताला दिले. पण पुन्हा एकदा मुंबईने आभार मानले पाहिजेत, कारण आपल्या गरजांची पूर्तता करण्यासाठी वसाहतवादी मालकांनी जेव्हा आयएसटीची वेळ सकाळी ५: ३० पासून ६ :०९ पर्यंत वाढवली त्यावेळी जॅकब ससून मिलमधील कामगारांनी स्ट्राइक चालू केला आणि आयएसटीची वेळ  बदलण्यास नकार दिला.

१९५० मध्ये मुंबई शहर आणि उपनगरीय शहर यांचे एकीकरण करण्यात आले आणि त्यांनी आयएसटीला स्वीकारले.

आजच्या मुंबईत हा टाईम झोनचा गोंधळ कायम असता तर? लोकांचे अजून हाल झाले असते का? की त्यावरही तोडगा काढला असता?

कुणास ठाऊक?!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?