हे हॉटेल हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबियांकडून पैसे घेत नाही.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===


भारताच्या रक्षणार्थ सीमेवर तैनात असणारा प्रत्येक सैनिक हा स्वत:च्या स्वार्थासाठी नाही तर देशाच्या नागरिकांसाठी अहोरात्र झटत असतो.

एक नागरिक म्हणून या सैनिकांच्या प्रति आपली काही कर्तव्ये आहेत हे प्रत्येकाला समजायला हवं. सैनिकांना उचित मान देणे, जागरूक राहुन देशाच्या सुरक्षिततेत हातभार लावणे अशी आपली अनेक कर्तव्ये आहेत. आपल्यातील बहुतांश ह्या कर्तव्यांचे पालन करतच असतात.

परंतु काही लोक ह्या ‘कर्तव्यांच्या’ चौकटीपलीकडे जातात. सैनिकांसाठी विशेष काहीतरी करतात. रायपूरमध्ये असंच एक हॉटेल आहे जेथे एखाद्या हुतात्मा सैनिकाच्या कुटुंबाने भेट दिली तर खानपानाचे पैसे त्यांच्याकडून पैसे घेत नाही…!

 

neelkannth-hotel-marathipizza01


स्रोत

रायपुर रेल्वे स्टेशनच्या बाहेरच वसलेल्या या हॉटेलचे नाव आहे नीलकंठ.

भारतीय सैनिकांच्या त्यागाचा खऱ्या मनाने सन्मान करणारं हॉटेल म्हणून हे हॉटेल पंचक्रोशीत प्रसिध्द आहे. या हॉटेलमध्ये भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ डिस्काउंट ऑफर चालवली जाते. ज्यानुसार हॉटेलमध्ये खाण्यासाठी येणाऱ्या कोणत्याही सैनिकाला बिलामध्ये भरघोस सूट दिली जाते.

त्याही पुढे, देशसेवा करताना हुतात्मा  झालेल्या सैनिकाच्या कुटुंबियांकडून बिलाचा एक रुपयाही घेतला जात नाही.


 

neelkannth-hotel-marathipizza02

 

वरील फलक हॉटेल बाहेर लावण्यात आला आहे.

सैनिकांनी ID दाखवल्यास त्यांना २५% सूट मिळते. तसेच, ID दाखवणारी व्यक्ती सैनिकी गणवेशात असेल तर त्यांना ५०% सूट मिळते. आणि पुढे – फलकावर लिहिल्याप्रमाणे –

ज्या सैनिकाने आमच्या आणि आपल्या राष्ट्राच्या रक्षणार्थ आपल्या जीवनाचे बलिदान दिले आहे, आम्ही त्यांच्या माता-पित्यांकडून कुठलाही शुल्क घेणार नाही.

तुम्ही देशाच्या रक्षणकर्त्याचा सन्मान कसा करता हे महत्वाचे नाही. या सन्मानामागे तुमची भावना किती खरी आहे ते महत्वाचे आहे.

नीलकंठ हॉटेलच्या या कार्याला टीम इनमराठीचा सलाम!


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.




Vishal Dalvi

Anything, Everything, Whatever I like, I don't wait..I Just write......

vishal has 68 posts and counting.See all posts by vishal

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?