' एका भारतीय एअरफोर्स मार्शलचा मृत्यू – ज्यावर संपूर्ण भारत हळहळला होता… – InMarathi

एका भारतीय एअरफोर्स मार्शलचा मृत्यू – ज्यावर संपूर्ण भारत हळहळला होता…

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

१६ सप्टेंबर २०१७ रोजी एक दु:खद बातमी टीव्हीवर झळकू लागली आणि संपूर्ण भारत दु:खात बुडाला.

ही दु:खद घटना म्हणजे अर्जन सिंग यांच्या मृत्यूची बातमी. अर्जन सिंग यांचा जन्म १५ एप्रिल १९१९ पाकिस्तानच्या फैसलाबाद येथे झाला होता. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांचा हृदय विकाराच्या झटक्याने अर्जन सिंग याचा मृत्यू झाला.

अर्जन सिंग हे स्वत: एक इतिहास होते असे म्हटले तर वावगे ठरू नये. असा इतिहास ज्यामध्ये शौर्याची एक अतुलनीय कहाणी लिहिली गेली आहे.

आज आपण याच शूर मार्शल अर्जन सिंग यांच्याविषयी काही गोष्टी जाणून घेऊया, ज्या प्रत्येक भारतीयाला ठावूक असणे गरजेचे आहे.

 

arjan singh.marathipizza
ibnlive.in

अर्जन सिंग यांचा जन्म जाट शीख कुटुंबामध्ये झाला होता. अर्जन सिंग यांचे आजोबा रिसालदार मेजर हुकुम सिंग हे १८८३ ते १९१७ या दरम्यान कॅव्हलरीचे रिसालदार होते. अर्जन सिंग यांचे कुटुंबीय हे पहिल्यापासूनच देशाची सेवा करण्यासाठी तत्पर होते. त्यांच्या जुन्या पिढींनी आपल्या देशासाठी खुप काही केले.

अर्जन सिंग यांचा विवाह १९४८ मध्ये तेजी सिंग या त्यांचाच शीख समाजातील मुलीशी झाला होता. २०११ मध्ये त्यांच्या पत्नीचा मृत्यु झाला होता. अर्जन सिंग आणि त्यांची पत्नी यांनी ६३ वर्ष एकत्र संसार केला. अर्जन सिंग यांना दोन मुले आहेत. त्यांच्या मुलीचे नाव आशा आणि मुलाचे नाव अरविंद आहे.

अर्जन सिंग हे एकच असे ऑफिसर होते, जे चीफ ऑफ एअर स्टाफ बनल्यानंतर देखील विमान उडवत असत. त्यांच्या विमान उडवण्याच्या कौशल्यामध्ये कधीही कमी आली नाही हे विशेष!

 

arjan singh.marathipizza2
i.ndtvimg.com

पानगढ़च्या एअर फ़ोर्स स्टेशनचे नाव अर्जन सिंग यांच्याच नावावर ठेवण्यात आलेले आहे. हे एकमेव असे एअर फोर्स स्टेशन आहे, ज्याचे नाव कोणत्यातरी माजी ऑफिसरला समर्पित केले आहे.

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी अर्जन सिंग हे ब्रिटेनकडून म्यानमारमध्ये जपानी सैन्याविरुद्ध लढले होते. अर्जन सिंगना सर्वात जास्त वेळेपर्यंत दोनदा एखाद्या ऑपरेशनचे कमांडचे एओसी (एअर ऑफिसर कमांडिंग) बनवले गेले होते.

१९४९ ते १९५२ पर्यंत इंडियन एअर फोर्सची धुरा सांभाळल्यानंतर १९५७ ते १९६१ पर्यंत ते एओसी पदावर होते.

 

arjan singh.marathipizza3
firstpost.in

अर्जन सिंग हे एअर फ़ोर्सचे एकमेव असे ऑफिसर आहेत, ज्यांना फाईव्ह स्टार रँक देण्यात आला होता. १९६५ मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धामध्ये दिलेले मोलाचे योगदान पाहून भारत सरकारने अर्जन सिंग यांना पद्म विभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.

असे हे एअर फोर्सचे मार्शल आज आपल्यात नाहीत, पण त्यांनी केलेल्या कार्याला संपूर्ण भारत कधीही विसरणार नाही..

===

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?