प्रणयाबद्दलची ही गुपितं पुरुषाला माहित नसल्याचं प्रत्येक स्त्रीला दुःख होतं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===


लैंगिक संबंध आणि त्या अनुषंगाने येणारे इतर विषय आजही आपल्याकडे अस्पृश्य मानले जातात. लैंगिक शिक्षण देण्याच्या बाबतीत तर उघड विरोध सामाजिक पातळीवर दिसून येतो. त्यामुळे तरुण आणि प्रौढ या दोन्ही पिढ्यांमध्ये लैंगिक गोष्टींबाबतचे अज्ञान प्रकर्षाने जाणवते.

स्त्रियांच्या लैंगिक भावनांशी संबंधित असणाऱ्या अनेक गोष्टींबद्दल अजूनही आपल्या समाजात भरपूर गैरसमज आहेत. मुळात एखादी गोष्ट पहायची/ वाचायची/ बोलायची नाही अशी जेव्हा सक्ती केली जाते तेव्हा त्या गोष्टीबद्दल जास्त चर्चा होते असे म्हणतात. म्हणजे सक्ती अतिरेकाला कारणीभूत ठरते. कारण झाकलेल्या गोष्टीचे जास्त कुतूहल असते. स्त्रियांच्या लैंगिक भावनांच्या बाबतीतही हेच झाले आहे.

 

social-taboos-inmarathi
responsibleanarchist.files.wordpress.com

आज आपण प्रणायाबद्दल अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या पुरुषांना माहित असायला हव्यात असं नेहमी स्त्रीयांना वाटत असतं

१ . जोडीदारासोबत गप्पा मारणे

अनेक महिलांना गप्पा मारल्याने सेक्स करण्याची इच्छा जागृत होत असते आणि त्यामुळे जास्त प्रेम देखील महिलांच्या मनात दाटून येत असतं. खासकरून त्या महिला ज्या घरी घरगुती कामं करतात. त्यांच्यासोबत मारलेल्या वैचारिक गप्पा त्यांना तुमच्याकडे आकर्षित करतात.

 

photo-inmarathi
jkcpbajk.com

सायंकाळी मारलेल्या गप्पा तिला तुमच्याकडे आकर्षित तर करताच शिवाय या नंतर होणाऱ्या समागमाच्या वेळी अत्यंत प्रेमळ शब्दांचा उल्लेख महिला करतात व उत्साहाने प्रणयात सहभागी होतात. या गप्पामध्ये नवऱ्याने बायकोला सांगितलं पाहिजे की त्याचं तिच्यावर किती प्रेम आहे. तिचं नाव पुन्हा पुन्हा घेत राहिलं पाहिजे. जे समागमवेळी खूप फायदेशीर ठरते.

२ . महिलांना स्वतःच्या शारीरिक आकर्षकतेबद्दल न्यूनगंड असतो

बायका बऱ्याचदा बोलताना तुम्हाला सांगत असतात की लग्न झाल्यापासून त्यांच्या वजनात वाढ झाली आहे. त्या आता पूर्वीसारख्या आकर्षक दिसत नाहीत. त्या आता सुंदर दिसत नाही म्हणून तुमचं तिच्याकडे लक्ष राहत नाही. तुम्ही पाहिल्यासारखं प्रेम करत नाही.

अश्यावेळी नवऱ्याने समंजस होऊन महिलेला सांगितलं पाहिजे की ती आधी सारखीच सुंदर व आकर्षक दिसते आणि तुमचं तिच्यावर प्रेम आहे.

 

sex-problems-inmarathi
host.co.uk

नेहमी तिच्या सुंदरतेची वाह वाह करत राहा. यामुळे ती महिला तुमच्याकडे आकर्षित होते व तुमच्या सोबत तेवढ्याच तीव्रतेने एकरूप होते व यामुळे एक वेगळाच आनंद होत असतो.

३. प्रणयाला स्त्रीच्या आयुष्यातून वेगळं काढता येत नाही 

स्त्रिला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्त्रीसोबत कसे वागता, बोलता, तिला किती वेळ देता यावर तुमची सेक्स लाईफ अवलंबून आहे. तुम्ही तिची काळजीने विचारपूस करायला हवी. तिला काय हवं नाही ते विचारायला हवं. तिला वेळोवेळी गिफ्ट सरप्राईज द्यायला हवेत. यामुळे ती तुमच्याकडे आकर्षित होईल.

 

Sex-inmarathi
greatist.com

ती तुमच्यासाठी केवळ प्रणयातील साथीदार अथवा कुटुंब चालवणारी स्त्री नसून त्यापेक्षा जास्त तुमची एक मैत्रीण आहे. अश्या भावनेने तिच्याकडे बघा. निस्सीम प्रेम तिच्यावर करत रहा.

४ . Orgasm ही गरज नाही

स्त्रीबाबत पुरुषाला नेहमी वाटत राहतं की क्लायमॅक्स झाल्याशिवाय महिलांना सेक्स दरम्यान समाधान भेटत नाही. बऱ्याचदा वेळेआधीच वीर्यपतन होतं. अश्यावेळी पुरुष निराश होतात की ते साथीदाराला परमोच्च आनंद देऊ शकले नाहीत. महिला देखील पुरुषांसोबत तो क्षण अनुभवण्यासाठी आतुर असतात.

 

women-sexual-desire-inmarathi
m0.her.ie

पण जर हे साध्य होत नसेल तर हरकत नाही. ६० % पेक्षा जास्त वेळा कलायमॅक्स, orgasm घडत नाही त्यावेळी फक्त शरीर संबंध घडत असतो. यामुळे निराश व्हायचं कारण नाही. प्रणय म्हणजे केवळ orgasm नाही, हे कायम लक्षात ठेवा.


५ . सेक्स सिरीयसली करू नका

प्रणय ही एकप्रकारची कला आहे. एक प्रकारची क्रीडा आहे अर्थात खेळ आहे. प्रणय फक्त आनंद घेण्यासाठी करा. एक गरज म्हणून अथवा आवश्यकता म्हणून करू नका. यामुळे तो निरस होतो व त्याचा सरळ परिणाम स्त्रीच्या मनावर होतो. ती तेवढी साथ प्रणयाच्या वेळी देत नाही.

 

sexual-desire-inmarathi
criticalpages.com

सेक्स गरज म्हणून नाही तर मजा म्हणून कराल तर तो वृद्धिंगत होत जातो. त्यातून चरमानंद उपभोगता येतो. सेक्स सिरीयस पणे केला तर तो एकप्रकारे अनैच्छिक काम होऊन जातं. त्यामुळे सेक्स नेहमी आनंद उपभोगत केला पाहिजे. कुठल्याही प्रकारचा तणाव न बाळगता.

६ . सेक्सनंतरची क्रिया

प्रणयामध्ये नंतरच्या क्रियेला खूप जास्त महत्व आहे. झाल्यावर तुम्ही जर स्त्रीला एकटंं सोडुन झोपून जात असाल, तर हे योग्य नाही यामुळे स्त्रीच्या मनात नकारात्मक प्रतिमा तयार होते. तिला वाटतं की तिचं महत्व हे फक्त सेक्स पुरतं मर्यादित आहे.

या काही गोष्टी तुम्हाला माहित असतील तर तुमच्यासोबत वेळ घालवण्यात स्त्रीला जास्त रस वाटू लागेल.


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?