पंडित नेहरुंशी निगडीत ९ गोष्टी – ज्या तुम्हाला माहिती नसतील

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

१४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद शहरामध्ये जवाहर मोतीलाल नेहरूंचा जन्म झाला. प्रतिभावंत व्यक्तिमत्वाचा वरदहस्त लाभलेल्या नेहरूंचा पंतप्रधान पदापर्यंतचा प्रवास लक्षवेधी आहे.

नेहरूंचे लहान मुलांवर जीवापाड प्रेम होते. लहान मुले त्यांना ‘चाचा नेहरू’ म्हणून हाक मारीत. नेहरूंनी आपल्या कारकिर्दीत लहान मुलांच्या कल्याणासाठी खूप कार्य केले, म्हणूनच १९६४ साली नेहरूंच्या मृत्यूनंतर १४ नोव्हेंबर ही नेहरूंची जयंती ‘बालदिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला.

अश्या या थोर व्यक्तीबद्दल बहुतांश गोष्टी तश्या प्रत्येक भारतीयाला माहिती आहेतच, पण आजही आपण नेहरूंशी निगडीत असणाऱ्या काही गोष्टींबद्दल अनभिज्ञ आहोत. आज  अश्याच काही तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी आम्ही उलगडत आहोत:

 

  • नेहरूंचे आजोबा होते दिल्लेचे अंतिम ‘कोतवाल’

 

pandit-neharu-facts-marathipizza01

स्रोत

ही गोष्ट फारच कमी लोकांना ठाऊक असेल की नेहरूंचे आजोबा ‘गंगाधर पंडित’ हे दिल्ली प्रदेशाचे शेवटचे कोतवाल होते. १८५७ च्या युद्धापूर्वी त्यांनी ‘कोतवाल’ पदाचा कार्यभार सांभाळला, त्यानंतर १८६१ मध्ये आपल्या संपूर्ण कुटुंबासह ते आग्रा येथे स्थायिक झाले.

 

  • नेहरूंनी तुरुंगात लिहले आपले ‘आत्मचरित्र’

 

pandit-neharu-facts-marathipizza02

 स्रोत

स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या बहुतांश नेत्यांनी स्वत:ची आत्मचरित्रे तुरुंगात लिहली होती आणि नेहरू देखील त्यांपैकी एक.

१९३५ मध्ये तुरुंगवास भोगत असताना त्यांनी “Toward Freedom” नावाचे आत्मचरित्र लिहिले. हे पुस्तक १९३६ साली अमेरिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले.

 

  • ‘नेहरू जॅकेट’चे निर्माते

 

pandit-neharu-facts-marathipizza03

स्रोत

सध्या अनेक राजकारणी ‘नेहरू जॅकेट’ घालून फिरतात. पूर्वी व्यक्तीला राजकारणातलं किती कळतं ते राहिलं बाजूला, पण जर तो ‘नेहरू जॅकेट’ घालतो तर तो राजकारणी असा प्रचलित समज होता. याच ‘नेहरू जॅकेट’ची कल्पना पंडित नेहरूंच्या डोक्यात आली. स्वातंत्रपूर्वीच्या काळात सगळेच नेते केवळ पांढरा सदरा घालायचे, नेहरू हे पहिले नेते होते ज्यांनी या सदऱ्यावर ‘जॅकेट’ चढविले. हेच पुढे ‘नेहरू जॅकेट’ म्हणून प्रसिद्धीस पावले.

 

  • तब्बल ११ वेळा नोबेल पुरस्काराची नामांकनं !

 

pandit-neharu-facts-marathipizza04

स्रोत

शांततेचा पुरस्कार करणाऱ्या व्यक्तींमध्ये पंडित नेहरूंचे नाव जगभर प्रसिद्ध होते. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की नेहरुंना १९५०-१९५५ या काळात सुमारे ११ वेळा शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते, परंतु त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार कधीही मिळाला नाही.

 

  • नेहरुंना सिगारेटचे भारी व्यसन होते (चेन स्मोकर !)

 

pandit-neharu-facts-marathipizza05

स्रोत

सिगरेट पिताना नेहरूंचा फोटो तुम्ही अनेकवेळा पाहिला असेल. त्यांचा सिगरेटचा सर्वात आवडता ब्रॅंड होता ‘555 सिगारेट’.

एकदा भोपाल भेटीवर असताना त्यांच्या लक्षात आले की त्यांच्याजवळ सिगारेट नाही. त्यांनी कर्मचाऱ्यांना आपल्या आवडता ब्रॅंडची सिगारेट कुठूनही शोधून आणण्यास सांगितले. परंतु भोपाळ मार्केट मध्येही नेहरूंचा आवडता ब्रॅंड मिळत नव्हता. अखेर इरेला पेटलेल्या नेहरूंनी केवळ आवडत्या ब्रॅंडची सिगारेट आणण्यासाठी आपले एयरजेट भोपाळवरून इंदोरला पाठवले. एयरजेट सिगारेट घेऊन परतल्यावर नेहरूंचे मन शांत झाले…!

 

  • भारतीय इतिहासाचे गाढा अभ्यासक

 

pandit-neharu-facts-marathipizza06

स्रोत

नेहरू हे कश्मीरी पंडित होते. त्यामुळे आपसूकच पंडिती अभ्यासाचे संस्कार त्यांच्यावर झाले होते. प्राचीन  भारत, वेद, संस्कृत आणि अश्या प्रकारच्या साहित्यांचे त्यांनी अनेक वर्षे अध्ययन केले, आणि त्यातून नेहरूंनी भारतीय संस्कृतीची आणि इतिहासाची उकल करणारे “Discovery of India” हे पुस्तक लिहिले.

 

  • भारताच्या फाळणीस अप्रत्यक्षरित्या जबाबदार…?

 

97b/11/huty/6669/42

स्रोत

अखंड भारताचे विभाजन हा भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमयी क्षणाला लागलेला काळा डाग होता. अनेक अभ्यासकांच्या मते फाळणी होण्याचे अप्रत्यक्ष श्रेय गांधीजी आणि पंडित नेहरुंना जाते.

मोहम्मद जीनांना स्वतंत्र भारताचे पंतप्रधान व्हायचे होते. परंतु गांधीजी आणि पंडित नेहरूंचा याला विरोध होता. गांधीजींनी पंडित नेहरूंना पंतप्रधान करण्याचे मनोमन निश्चित केले होते. शिवाय गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून परतल्यापासून जीनांचे कॉंग्रेसमधील वर्चस्व देखील संपुष्टात आले होते.

त्यामुळे संतापलेल्या जीनांनी मुस्लीम धर्माच्या आधारावर नव्या राष्टाची मागणी केली आणि पाकिस्तानचा जन्म झाला.

थोडक्यात – मोहम्मद आली जीना – हे फाळणीचे प्रत्यक्ष कारण आणि गांधीजी व नेहरू, अप्रत्यक्ष कारण ठरवले जातात.

 

  • नेहरूंचे मुस्लीम नेत्यांशी असलेले संबंध

 

pandit-neharu-facts-marathipizza09

स्रोत

कारकीर्दीच्या सुरुवातीपासूनच नेहरू मुस्लीम नेत्यांच्या संपर्कात आले होते. शेख अब्दुला १९३७ मध्ये कॉंग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांची मुस्लीम नेत्यांशी जवळीक अधिक वाढली. त्यांच्या राजकीय प्रवासात मुस्लीम नेत्यांचीच त्यांना अधिक मदत झाली.

 

  • नेहरूंच्या अंत्यसंस्कारावेळी सुमारे १५ लाख लोक उपस्थित होते

 

pandit-neharu-facts-marathipizza10

स्रोत

२७ मे १९६४ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने पंडित नेहरूंचा मृत्यू झाला. त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी १५ लाख लोक जमले होते. महात्मा गांधींच्या अंतिम संस्कारानंतर दुसऱ्यांदा एखाद्या नेत्याला निरोप देण्यासाठी भारतीय जनता एवढ्या मोठ्या संख्येने जमली होती.

“चाचा” नेहरूंना इन मराठी तर्फे विनम्र अभिवादन!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?