' पॅनकार्ड नाहीये? तर लवकर काढा, नाही तर ह्या “१० महत्वाच्या” गोष्टी करताना तुम्ही अडचणीत येणार! – InMarathi

पॅनकार्ड नाहीये? तर लवकर काढा, नाही तर ह्या “१० महत्वाच्या” गोष्टी करताना तुम्ही अडचणीत येणार!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आपण भारत देशाचे राहवासी आहोत. आपल्या देशात लोकशाही आहे. लोकशाही म्हणजे लोकांनी निवडून दिलेले लोक देशाची सेवा करतात. आपल्या देशाची लोकसंख्या १२५कोटी इतकी प्रचंड आहे. आपला देश शेतीप्रधान असल्यामुळे शेती हा जास्तीत जास्त लोकांचा व्यवसाय आहे.

आपला देश स्वतंत्र झाल्यापासून लोकशाही राज्य म्हणून आपल्या देशाची ओळख जगामध्ये आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण आपल्या पद्धतीने स्वतंत्रपणे नोकरी, व्यवसाय निवडून अतिशय कष्टाने देशाची प्रगती करायचा प्रयत्न करत आहोत.

दुष्काळ, कमी पाऊस, तर कुठे जास्त पाऊस, तर कधी गारपीट, भूकंप, महापूर, रोगराई अशा भीषण संकटांचा सामना आपल्या देशाला करावा लागला.

त्यामुळे शेती व्यवसाय हा जिकिरीचा होऊन बसला. अनेक संकटे शेतकऱ्यांवर आली. त्यामुळे प्रगती खुंटली.

 

kerala-flood-inmarathi
cricketaddictor.com

 

आता अशी मोठमोठी संकटे झेलायची तर राज्यकर्त्यांना आर्थिक पाठबळ हवे. शेतकऱ्यांना संकटात मदत करणे, अखंड आणि कमी दारात वीज पुरवठा करणे, चांगले बी बियाणे पुरवणे, शेतीमालाला चांगला भाव मिळवून देणे, दुष्काळ निवारण करणे, पाणी पुरवठा, रस्ते, ह्यासाठी आर्थिक पाठबळ हवे.

आता हे पाठबळ देशाच्या राज्यकर्त्यांना कसे आणि कुठून मिळणार. तर जनतेने राष्ट्राला दिलेल्या करांमधून (Taxes).

म्हणून सरकारने विविध प्रकारे सगळ्यांकडून करांची वसुली करायला सुरुवात केली. आपले वार्षिक उत्पन्न किती असते त्यावर मिळकत कर लागू होतो.

म्हणजे वेगवेगळ्या उत्पन्न गटांमधून वेगवेगळे कर वसूल केले जाऊ लागले. त्यात मिळकत कर, सेवा कर, जकात कर, विक्री कर, स्थावर मालमत्ता कर, रस्ते बांधल्यावर त्यावर कर, वगैरे अनेक प्रकारे कर वसुली सरकार करते. ह्या करवसुलीतून होणाऱ्या रकमेची सरकारी खर्च केला जातो.

 

income tax return.marathipizza2
indianexpress.com

हा खर्च कोणत्या गोष्टींवर किती करायचा ह्याचा अंदाज घेऊन दरवर्षी अंदाज पत्रक तयार करून जनतेसमोर मांडले जाते, पण जर सरकारी खर्च जर मिळकती पेक्षा जास्त होत असेल तर अंदाज पत्रक चुकायचे आणि काही मोठे खर्च सरकारला वेळेत करणे शक्य होत नाही.

मग हे खर्च भागवायचे कसे? गेली अनेक वर्षे ह्यावर काही उपाय होत नव्हते.

सरकारला देणे असलेली टॅक्सची रक्कम सगळेच प्रामाणिकपणे भरत नव्हते. मिळकत कमी दाखवून कर वाचवला जायचा, मोठे मोठे आर्थिक व्यवहार होत होते.

पण सरकारला त्यातील सगळे व्यवहार माहिती न पडू देता रोख रकमेने काही आणि बँकेतून काही व्यवहार केले जात होते.

सरकारची काही लोक लबाडी करून फसवणूक करायचे, म्हणजे प्रामाणिक लोक नियमित कर भरायचे पण खोटे व्यवहार करणारे लोक सरकारला फसवून गब्बर होत होते.

ह्या सगळ्या खोट्या लोकांना सरळ व्यवहार करायला लावून कोणा वरही कराचा जास्त बोजा पडू नये म्हणून आणि सगळ्यांच्या ठराविक उत्पन्नापेक्षा जास्त होणाऱ्या उत्पन्नावर कर मिळावा म्हणून सरकारने पॅन कार्ड ची सक्ती केली. त्यामुळे कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार पॅन कार्ड नंबर असल्याशिवाय करू नये असा नियम तयार केला गेला.

 

moneycontrol.com

तरी सुद्धा ह्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी सगळीकडेच होताना दिसत नव्हती. काळा पैसा निर्माण होतच होता, म्हणून सरकारने सगळे महत्वाचे आर्थिक व्यवहार रु.५००००/- वरील व्यवहार पॅन कार्ड नोंद असल्याशिवाय करू नये म्हणून सगळीकडे नियम लागू केला.

ह्या नियमामुळे कर बुडावणारे आता कर बुडवू शकणार नाही म्हणूनच हा नियम सक्तीचा केला गेला.

त्यामुळे मोठे रोखीने व्यवहार होऊ शकणार नाहीत.आणि केले गेले तरी पॅन नंबर असल्याशिवाय केले जाणार नाहीत. त्यामुळे पूर्वी मोठ्या प्रमाणात तयार होणारा काळा पैसा ह्यामुळे तयार होणार नाही. प्रत्त्येक मोठया आर्थिक व्यवहाराची नोंद राहील.

आता ह्यामुळे खोटे जमाखर्च दाखवून कर चुकवणारे आता नियमितपणे कर भरतील आणि सरकारचे उत्पन्न आपोआप वाढेल आणि सरकार आपल्या राष्ट्रासाठी नागरिकांना चांगल्या सुविधा देऊ शकेल, शेतकऱ्याला मदतीचा हात मिळेल आणि शेतीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होईल ही दूर दृष्टी ठेऊन सरकार पॅन कार्ड ची सक्ती सगळ्यांनाच करते आहे.

त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि काळ्या पैशाला आळा बसेल. म्हणून आपण देशाचे सुजाण नागरिक म्हणून प्रत्येकाने पॅन कार्ड तयार करून घेणे जरुरीचे आहे.

जर आपल्याकडे पॅन कार्ड नसेल तर यापुढे आपल्याला-

१. कोणत्याही बँकेत खाते उघडता येणार नाही. त्यामुळे बँकेचे कोणतेही व्यवहार आपल्याला करता येणार नाहीत. पैसे भरता येणार नाहीत.

 

pan card-inmarathi01
mensxp.com

२. एका दिवसात जर रु.५००००/-पेक्षा जास्त रक्कम भरायची असल्यास त्यासाठी पॅन कार्ड दाखवावेच लागेल.

 

money-doctor-inmarathi
NewIndianExpress

३. जमीन,घर अशी स्थावर मालमत्ता खरेदी करायची असेल तर पॅन कार्ड आवश्यक असणार आहे. त्याशिवाय कोणतीही मालमत्ता खरेदी करता येणार नाही.

 

rent-inmarathi
marathi.webdunia.com

 

४. कोणतेही वाहन खरेदी करायचे असल्यास पॅन कार्ड दाखवावे लागेल. त्याशिवाय ही खरेदी करता येणार नाही.

 

hero-bike-marathipizza
auto.ndtv.com

 

५. विदेश यात्रा करायची असल्यास त्यासाठी तिकीट बुकिंग करतानाच पॅन कार्ड आवश्यक असणारी आहे.

 

india.com

 

६. कोणत्याही हॉटेलमध्ये तुम्ही राहायला गेलात तर त्याचे बिल पेमेंट पॅन कार्ड शिवाय होणार नाही.

 

Hotels don't Share this Secrets.Inmarathi00
time.com

 

७. शेअर्स, बॉण्ड्स, डिबेंचर्स अथवा म्युच्युअल फंड या साठी गुंतवणूक करणार असाल तर पॅन कार्ड शिवाय ही गुंतवणूक करता येणार नाही.

 

share-market-marathipizza03
hangthebankers.com

 

८. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, डी मॅट अकाउंट उघडण्यासाठी अर्ज करणार असाल तर पॅन कार्ड शिवाय तुमचे हे काम होणार नाही.

 

Credit-cards-inmarathi02
upgradedpoints.com

९. तुम्ही कोणाला सेवा (सर्विस) दिलीत आणि त्याबद्दल फी आकारलीत तर त्यासाठी सुद्धा पॅन कार्ड जरुरी असेल आणि तुमच्या बिलातून २%टीडीएस कापला जाईल.

 

interview-marthipizza
avservices.co.in

 

१०. जर तुम्ही प्रीपेड मनी वॉलेट किंवा गिफ्ट कार्ड वापरत असाल आणि जर ₹ ५००००/- च्या वर रकमेचा व्यवहार करणार असल्यास पॅन कार्ड जरुरीचे असेल.

 

youtube.com

म्हणून पॅन कार्ड फार महत्वाचे आहे. त्यामुळे आपली महत्वाची कामे अडणार नाहीत. जर कार्ड तयार करून घेतले नसेल तर ताबडतोब तयार करून घ्या आणि निसचिंत व्हा. कारण ह्यापुढे सगळ्या चांगल्या कामांसाठी पॅन कार्ड आपल्याकडे असलेच पाहिजे.

पॅन कार्ड तयार करा आणि निश्चिन्त व्हा.ह्यामुळे जास्तीत जास्त लोकांकडून करांचा भरणा सरकारकडे होईल आणि सरकार आवश्यक त्या सगळ्या नागरी सुविधा पुरविण्यास सक्षम होईल .

एका मोठ्या अर्थव्यवस्थेकडे आपण वाटचाल करतो आहोत ह्याची जाणीव ठेवून देशाच्या उन्नतीला हातभर लावणे हे आद्य कर्तव्य समजून समृद्धीकडे वाटचाल करु.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?