सेक्सनंतर स्त्रियांना या गोष्टी हव्या असतात पण पुरुषांना त्याची कल्पनाही नसते

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===


स्त्रीचं मन जिंकणे हे प्रत्येक पुरुषाचं स्वप्न असतं, जर पुरुष स्त्रीला सुखी ठेवण्यात यशस्वी झाला तर पुरुषाचा पुरुषार्थ सिद्ध होत असतो. प्रणय करतांना आपल्या पार्टनरला आपल्या जास्तीत जास्त शरीरसुख देण्यासाठी आणि आनंदी ठेवण्यासाठी पुरुष नेहमी प्रयत्नशील असतात.

पुरुषांना बेडरूम मध्ये आणि आपल्या मनावर फक्त स्वतःच नाव कोरायचं असतं.

पण बऱ्याचदा पुरुष अश्या काही चुका करतात ज्यामुळे त्यांचा पार्टनरला आनंद मिळू शकत नाही. ज्यामुळे त्यांच्या नात्यात स्नेह उरत नाही आणि प्रणय हा देखील निरस होऊन जातो.

 

sex-foreplay-inmarathi
lifecrust.com

अशीच एक खरंतर प्रत्येकाच्या बाबतीत होणारी चूक म्हणजे सेक्स केल्यानंतर सोबत घालवण्याचा वेळ कसा घालवावा हे पुरुषांना माहित नसते. नात्यातला ओलावा वाढवा असं वाटत असेल तर हे माहित असणं आवश्यक आहे.

प्रणय केल्यानंतर स्त्रीला समाधान भेटतं असा बऱ्याच पुरुषांचा गैरसमज आहे. प्रणय केल्यानंतर पुरुष हा अत्यंत थकलेला असतो अर्थातच सर्वात जास्त शक्ती पणाला त्यालाच लावायची असते. परंतु स्त्री मात्र प्रणयानंतर थकत नसते.

तिला नेहमी तिच्या जोडीदाराकडून काही अपेक्षा असतात, ज्या त्याने प्रणय झाल्यानंतर देखील पूर्ण कराव्यात असं तिला हवं असतं.

पण प्रणयात आलेल्या प्रचंड थकव्यामुळे पुरुष सरळ झोपी जाण्याच्या मनस्थितीत असतो. परंतू याचा वाईट परिणाम स्त्रीच्या मानसिकतेवर होतो. तिची इच्छा अपूर्ण राहत असते.

तिला असं वाटू लागतं की, ती फक्त पुरुषांची वासना भागवण्याचं एक माध्यम आहे, त्याव्यतिरिक्त तिला काहीच महत्व नाही. त्यामुळे बऱ्याचदा नातेसंबंधात दुरावा येतो आणि लैंगिक संबंधांवर देखील याचा परिणाम होत असतो.


 

romance-inmarathi

 

मग अश्यावेळी प्रश्न पडतो की, पुरुषाने नेमकं काय केल्यावर त्याला अश्या परिस्थितीला सामोरं जावं लागणार नाही आणि तो त्याच्या जोडीदाराला आनंदी ठेवू शकेल? तर ह्या प्रश्नाचं उत्तर जास्त शोधायची गरज नाही.

कारण आम्ही तुमच्यासाठी त्या १३ अपेक्षांची यादीच घेऊन आलो आहोत, ज्या स्त्रिया प्रणयापूर्वी स्त्रिया पुरुषांकडून बाळगत असतात. चला तर मग जाणून घेऊयात स्त्रीला प्रणयानंतर जोडीदाराकडून काय हवं असतं.

१. प्रणय झाल्यावर झोपण्याचा वेळी तुम्ही तिला स्वतःचा कुशीत घेऊन झोपावं. तिला कवेत घ्यावं. तिला गोंजारावं.

 

what women wants after sex-inmarathi
in.news.yahoo.com

२. डोळे, कपाळ आणि ओठांवर तिला किस करावं. यामुळे प्रणयानंतर देखील तुमच्या मनात तिच्याविषयी प्रेमभावना आहे असं सूचित होतं. ज्यामुळे ती आनंदी होते.

 

what women wants after sex-inmarathi01
freepik.com

३. “माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे” , “I Love You” असे प्रेमाचे शब्द तिच्यासाठी प्रणयानंतर वापरावे, तिला दाखवा की तिच्यासारखं दुसरं कोणीच नाही.

 

what women wants after sex-inmarathi02
india.com

४. जर तुम्हाला प्रणयातून संतान प्राप्तीची अपेक्षा असेल तर तिच्या गर्भावर हात फिरवा, जेणेकरून तिला धीर येईल

 

what women wants after sex-inmarathi03
ourmomentoftruth.com

५. तिच्यासाठी प्रार्थना करा, तुम्ही एकमेकांप्रति प्रामाणिक आहात, शुद्ध आहात, हे दाखवा, तुमचं नातं दैवी आहे असं वातावरण निर्माण करा.

 

what women wants after sex-inmarathi04
thenational.ae

६. तिला गोंजारा, तिला म्हणा ती खूप सुंदर आहे, तिच्या मनाच्या सौंदर्याची आणि शारीरिक सौंदर्याचं पण कौतुक करा. तिच्या मनातील निगेटिव्ह विचार आणि न्यूनगंड दूर करा.

 

what-women-wants-after-sex-inmarathi05.jpg
masterfile.com

७. तिच्या डोळ्यात एकटक बघत राहा, तिच्या मनातलं गुपित समजून घ्या , तिच्या भावना जाणून घ्या, तिच्या चेहऱ्यावरील ग्लो ला बघून तिच्यासारखी दुसरी नाही, असं वातावरण निर्माण करा, तिच्या हृदयावर कब्जा करा.

 

what women wants after sex-inmarathi06
srkuniverse.com

८. तिला सांगा ती किती खास आहे, किती अमेझिंग आहे. अश्याने तिच्या मनावरील प्रणयानंतरच दडपण हलकं होईल.

 

 

what women wants after sex-inmarathi07
shutterstock.com

तिच्या मनातील भयाचा सामना करण्यासाठी तिला मौलिक साथ द्या, ती प्रणयात एक उत्तम जोडीदार आहे, अशी भावना तिच्या मनात निर्माण करा. जेवढी तुम्ही तिची काळजी घ्याल, तेवढी ती तुमची काळजी घेईल.

९. तिच्या सर्वांगाला स्पर्श करा, तिच्या प्रत्येक अवयवाचा आस्वाद घ्या. बरेच पुरुष फक्त जननेंद्रिय आणि उत्तेजक अवयांवर वर लक्ष देतात. परंतु स्त्रीचं सर्वांग तिला आकर्षक बनवत असतं त्यामुळे तिच्या सर्वांगाला गोंजारा, ज्याने ती तुमच्याप्रति अधिक सकारात्मक होईल.

 

what women wants after sex-inmarathi08
pinterest.co.kr

१०. तुमच्या नात्याचं प्रतीक असलेल्या तिच्या हातातील अंगठीच्या बोटाला पकडा, तो हात घट्ट पकडा, यामुळे तिच्या मनात एक सुरक्षिततेची भावना निर्माण होईल आणि तुम्ही आयुष्यभर तिला साथ द्याल अशी भावना तिच्या मनात निर्माण होईल.

 

what-women-wants-after-sex-inmarathi09.jpg
masterfile.com

११. जर तुमचा प्रणय हा खूप तणावानंतर झाला असेल, तर तुम्ही तिची माफी मागण्याची अथवा तिला माफ करण्याची संधी दवडू नका. तुमच्यातील तणाव तसाच ठेवून झोपू नका.

 

what women wants after sex-inmarathi10
newsweek.pl

कारण प्रणयानंतरचा काळ तणाव दूर करण्यासाठी आणि नव्या नात्याचा सुरवातीसाठी एक नामी संधी आहे. प्रणयाचा वापर नात्यातील तणाव लपवण्यासाठी करू नका तर तो नातं टिकवण्यासाठी करा. ही एक नवी सुरवात आहे अशी परिस्थिती निर्माण करा.

१२. तुम्ही त्या क्षणी देखील तिचं रक्षण करत आहात असं भासवा, तिला सुरक्षित वाटेल, अशी वागणूक तिला द्या. जेणेकरून तुम्ही तिच्या मनावर कायम अधिराज्य गाजवाल.

 


what women wants after sex-inmarathi11
desiblitz.com

१३. जर तुम्ही सकाळच्या प्रहरी प्रणय केला असेल आणि तुम्हाला तयार होऊन बाहेर जायचं असेल तर अश्यावेळी तुमच्या जोडीदाराला सोबत घेऊन एकत्रित स्नान करा, एकमेकांच्या अवयवांना गोंजारा, साफ करा, यामुळे आजूनच घट्ट बंध निर्माण होतील.

 

what women wants after sex-inmarathi12
the-conscious-mind.com

थोडक्यात, पुरूषांनो – सेक्स ही केवळ एक गरज नसून आनंद उपभोगण्याचं माध्यम आहे, असं समजा. त्यानुरूप जोडीदाराला वागणूक द्या.

तिचा कायमचा साथी म्हणून स्वतःला तिच्या पुढ्यात न्या, तिच्या मनातला राजकुमार व्हा, कारण जेवढं जास्त तुम्ही तिला आनंदी ठेवाल त्याहून जास्त आनंदी ती तुम्हाला ठेवेल.

वरील गोष्टींचे तंतोतंत पालन करा, बघा तुमच्या लैंगिक तसेच वैयक्तिक आयुष्यात काही बदल घडतो का नाही. एक मात्र नक्कीच, प्रेम बहरत राहणार आणि तुम्ही उपभोगत राहणार.


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.
2 thoughts on “सेक्सनंतर स्त्रियांना या गोष्टी हव्या असतात पण पुरुषांना त्याची कल्पनाही नसते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?