UPSE, MPSC, स्पर्धा परीक्षांना सामोरं जाण्याचा विचार करताय? आधी हे वाचाच!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आधी काही नाही जमलं तर पत्रकारिता करायचे असं म्हणतात. तीच परिस्थिती सध्या दुर्देवाने युपीएससी एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांची झाली आहे. काही ठोस करिअर जमलं नाही की या परीक्षा द्यायच्या असं एक फॅ़ड सध्या आलं आहे. (याला अपवाद आहेत हे मला पक्कं माहिती आहे). गावाकडून पुण्यात यायचं, खोली करायची आणि या परीक्षांच्या नावावर दिवस काढून घरी आई बापांना खोटं स्वप्न दाखवणाऱ्यांचे प्रमाण वाढीला लागले आहे जे खचितच योग्य नाही.

upsc-mpsc-marathipizza01
ypatil.edu

मुळातच एमपीएससी युपीएससी म्हणजे खायचं काम नाही. ती एक तपश्चर्या आहे. त्याला नुसती अक्कल, नुसती जि्द्द, पैसा असून चालत नाही. त्यासाठी एक वृत्ती लागते. समाजात बदल घडवून आणण्यासाठी, एक भली मोठी शासनपद्धती चालवण्याची ती व्यवस्था आहे. या व्यवस्थेत आपण कसे फिट आहोत, समाजात बदल घडवून आणण्याची क्षमता, सर्व स्तरांतील सामाजिक घटकांसाठीची कणव लागते, त्यासाठी आपला भारत काय आहे? त्याच्या सामाजिक राजकीय आर्थिक सांस्कृतिक बाजू काय आहेत? याची थोडीफार माहिती हवी. जी मुलं अजिबात घेत नाही.

काही मुलांना सहा सहा महिने अभ्यास करून मुंबईचा पोलीस आयुक्त माहिती नसतो. साधे पाच आयएएस आयपीएस अधिकाऱ्यांची नावे माहीत नसतात. पेपर तर अजिबात वाचत नाहीत. अवांतर वाचन तर फारच दूरची गोष्ट आहे. याबाबत छेडले असता त्याची त्यांना खंत ना खेद. नुसत्या क्लासेस च्या भरमसाठ फी भरतात आणि समाजाला दाखवायला टाईमपास करतात आणि मग दोन तीन वर्ष काही हातात लागलं नाही, की मग आयोगाच्या नावाने खडे फोडतात. ज्या मुलींना पदं मिळत नाही त्या लग्न करून मोकळ्या होतात, मुलांची मात्र फरफट होते.


upsc-mpsc-marathipizza02
youtube.com

हे सगळं मी या साठी लिहिलं आहे की, आता पदवी परीक्षा संपल्या आहेत तेव्हा अनेक मुलं या वाटेवर जाऊ इच्छित असतील. त्यांनी कोणताही निर्णय घेण्याच्या आधी स्वतःला नीट ओळखा, उगाच आमच्या गावचे ४० अधिकारी झाले म्हणून वाहवत जाऊ नका. त्यांची परिस्थिती आणि आपली परिस्थिती, इच्छा, आकांक्षा, दृष्टिकोन यात खूप फरक असतो हे लक्षात घ्या. युट्यूब वरच्या लेक्चर्सने हुरळून जाऊ नका. स्पर्धा परीक्षांचं जग फार निर्दयी असतं. तिथे पद नाही मिळाले तर बाहेरच्या जगात नोकरी मिळवायला त्रास होतो. तेव्हा विशेषतः मुलांनी जास्तीत जास्त २ attempt द्या. नसेल जमत तर सोडून द्या किंवा नोकरी करत अभ्यास करा.

याउलट अनेक मुलं मान मोडून जबरदस्त अभ्यास करत असतात याची मला १००% टक्के खात्री आहे. मी सुद्धा भरपूर अभ्यास केला होता मी अभ्यासू लोकांना खूप जवळून बघितलं आहे. दरवर्षी त्यांच्यापैकी काही मुला मुलींची नावं फायनल लिस्ट मध्ये बघून अपयशाच्या खपल्या निघतात आणि त्या वेदना कधीकधी असह्य होतात. त्या वेदना कोणाच्या वाट्याला विनाकारण येऊ नये हीच प्रामाणिक इच्छा.

तेव्हा उद्दिष्ट ठरवूनच पंख पसरा, लेक्चर्स बघून नाही…!

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

5 thoughts on “UPSE, MPSC, स्पर्धा परीक्षांना सामोरं जाण्याचा विचार करताय? आधी हे वाचाच!

  • May 21, 2017 at 5:00 pm
    Permalink

    But he ahet kon?

    Reply
  • October 2, 2017 at 11:24 am
    Permalink

    My friend you give two years but u prepared by heart? you suggest take two chance and then what do ? I think u failure in this carrier and u select journalist carrier.if an aspirant qualif for interview and then he can’t select In final list then how he skip this field .u talk about some fact but all baout not.U don’t misguid and miss use your profession

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *