उन्हाळ्यात फळांचा रस पिताय ? मग या गोष्टी जाणून घेतल्याच पाहिजेत !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

फळांचा रस आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला असतो. त्यामुळे आजकाल लोक वेगवेगळ्या प्रकारच्या फळांचा ज्यूस पितात. पण जर तुम्ही फळांचा रस पीत आहात तर तो तुमच्यासाठी तेव्हाच फायद्याचा ठरेल जेव्हा तुम्ही त्याबाबत काही महत्वाच्या बाबी जाणून घ्याल. तेव्हाचं तुम्हाला त्या फळाच्या रसाची पूर्ण पोषकता मिळेल.

 

fruit juice-inmarathi01
looklocalmagazine.com

फळांत असलेले फायबर हे पोटासाठी खूप चांगले असतात. त्यामुळे फळांचा रस घेण्यापेक्षा फळं खाणे जास्त चांगले आहे. पण फळांचा रस घेतल्याने आपल्याला लगेचच एनर्जेटिक वाटायला लागते. फळाच्या रसात देखील तेवढेच पोषक तत्व असतात जेवढे फळात असतात.

फळांच्या रसात फाइटोन्यूट्रिएंट्स आढळतात, जे आरोग्यासाठी खूप चांगले असतात. फळांच्या रसामुळे शरीरात इंटरफेरान आणि अॅण्टीबॉडीज लेवल वाढतो आणि ह्यात आढळणारी नैसर्गिक साखर ही हृदयाला मजबूत बनवते.

 

fruit juice-inmarathi
deccanchronicle.com

आपण नेहमी बघतो की, बाजारात अशी अनेक फळांच्या रसाची दुकाने असतात जिथे स्वच्छता नसते. एवढचं नाही, त्या रसात भेसळ देखील केल्या जाते. नाहीतर फ्लेवर्ड ज्यूस दिल्या जाते. अश्यात बाहेरचे ज्यूस पिण्या ऐवजी घरी बनविलेला फ्रेश फळांचा रस प्या. ह्यामुळे तुम्हाला टेस्ट आणि पोषकतत्व दोन्ही मिळतील आणि ते हायजेनिक देखील असेलं.

 

fruit juice-inmarathi03
naturalsociety.com

पॅक्ड ज्यूसमध्ये हाय कॅलोरीज असतात, ज्याने तुमचं वजन वाढू शकतं. ह्यात एनर्जी लेव्हल खूप हाय असतो. ह्याचे सेवन केल्याने भूक वाढते त्यासोबतच वजन वाढण्याची शक्यताही वाढते. अश्यात मग वजन कमी करण्याच्या प्रयत्नात घेतलेला फळांचा रस फोल ठरतो. चेरी, नाशपती, सफरचंद ह्यांसारख्या फळांत सार्बिटॉल शुगर आढळते. शरीराला फळे आणि भाज्या पचवायला जेवढा वेळ लागतो त्याहून कमी वेळात ज्यूस पचतो. अश्यात ब्लड शुगर खूप लवकर वाढते.

 

fruit juice-inmarathi05
breakingmuscle.com

काही लोकांना मिक्स्ड ज्यूस खूप आवडतात. पण दोन किंवा त्याहून जास्त फळांनी बनलेला रस हा आपल्यासाठी चांगलाच असेलं असे कश्यावरून. जसे की अंगूर, सफरचंद आणि संत्री ह्या फळांपासून बनलेला रस हार्ट पेशंटसाठी नुकसानदायक ठरू शकतो. हे फळ औषधांचा असर कमी करतात. जर तुम्ही मिक्स्ड ज्यूस घेत आहात, तर सुरवातीला फक्त १०० एमएल घ्या. ह्यानंतर रोज ५० एमएलच्या हिशोबानी तुम्ही ज्यूसची मात्रा वाढवू शकता. पण ४०० एमहून जास्त ज्यूस पिणे टाळावे.

 

fruit juice-inmarathi02
oliviajuice.com.ng

जर तुम्हाला नेहमी ज्यूस प्यायची सवय असेल तर प्रयत्न करा की प्रत्येक वेळी वेगवेगळ्या फळांचा ज्यूस प्याल. म्हणजे एकदा ह्या फळाचा रस घेतला असेल, तर नेक्स्ट वेळी दुसऱ्या फळाचा रस घ्या. ह्याने तुमचे फॅट वाढणार नाही. आणि तुम्हाला प्रत्येक प्रकारची पोषणतत्वे मिळतील.

फळांच्या रसात विटॅमिन, प्रोटीन, फॅट्स, मिनरल्स आणि विटॅमिन सी चे प्रमाण तेवढे नसते जेवढी त्यात साखर आढळते. म्हणूनच फळांचा रस घेतल्यावर लूज मोशन किंवा पोट दुखी सारख्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्ही अतिप्रमाणात ज्यूस पीत असाल तर तुम्ही मोठ्या प्रमाणत कॅलरीज घेत आहात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?