तुम्ही तंबाखू खात नसाल तरी दैनंदिन वापरातील या गोष्टींमुळे तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

कॅन्सर हा एक भयानक आजार आहे, एकदा जर तो आजार जडला की त्यातून वाचणे खूप कठीण असते. त्यामुळे जगभरात अनेक माध्यमांतून कॅन्सर संबंधी जागरूकता पसरविली जाते, कारण त्यापासून वाचण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे कॅन्सर न होणे. पण आजही या आजाराबद्दल हवी तेवढी जागरूकता नाहीये.

InMarathi Android App

‘तंबाखुचे सेवन आपल्या आरोग्यासाठी अपायकारक आहे, त्याने कॅन्सर होऊ शकतो’, हे वाक्य आपण आपल्याला बिडी-सिगरेटच्या प्रत्येक पाकिटावर लिहिलेलं आढळते.

पण फक्त तंबाखुनेच कॅन्सर होतो काय? तर नाही.

याशिवाय देखील अनेक अश्या गोष्टी आहेत ज्या कॅन्सर होण्याला कारणीभूत ठरतात. त्यातल्या काही आपल्या जीवनातील दैनंदिन गोष्टी आहेत आणि या गोष्टींमुळे देखील कॅन्सर होऊ शकतो.

वाईन :

 

wine-inmarathi
tallypress.com

एकीकडे वाईनला आपल्या आरोग्यासाठी चांगले मानल्या गेले आहे, तर दुसरीकडे एका थेअरीनुसार वाईनचे सेवन केल्याने कॅन्सर होण्याचा धोका दुप्पट असतो. या शोधानुसार दररोज अर्धा ग्लास वाईनचे सेवन केल्याने कॅन्सर होण्याचा धोका १६० टक्क्यांनी वाढतो.

डियोड्रंट :

 

deo-inmarathi
greatist.com

डियोड्रंटमध्ये असणारे अॅल्युमिनियम तत्वांमुळे ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका असतो. कारण डियोड्रंट हा तुमच्या त्वचेवर तसेच लावण्यात येणाऱ्या अंगांवर सरळ प्रभाव टाकतो.

चिप्स : 

 

potato chips02-marathipizza
foodandwine.com

चिप्स वेफर्स हे तर सर्वांचेच फेवरेट टाईमपास आहेत. पण काय तुम्हला हे माहित आहे का की, यामुळे देखील तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो.

याच्या अति सेवनाने तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. रिसर्च नुसार ५ पेक्षा जास्त वेळा चिप्स खाल्ल्याने ब्रेस्ट कॅन्सरचा धोका २७ टक्क्यांनी वाढतो.

ओरल सेक्स :

 

sexooral-inmarathi
theowlcampus.com

आजकालच्या तरुणांमध्ये ओरल सेक्सचं प्रमाण वाढलं आहे.

पण सेक्सवर झालेल्या एका स्टडीमध्ये असे दिसून आले की, पुरुष आणि महिला दोघांतही ओरल सेक्समुळे घश्याचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे याकरिता आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

हेयर कलर :

 

hair-dying-inmarathi
today.com

हेअर कलर म्हणजेच केसांना रंगवणे. आधी केवळ वय लपविण्यासाठी या हेअर कलर्सचा वापर करण्यात येत होता. पण आता तर केस रंगवणे म्हणजे ट्रेंड झाला आहे.

पण तुम्हाला माहित आहे का – की, १५ वर्षांहून जास्त काळ हेअर कलर्सचा वापर केल्याने गॉल ब्लॅडरचा कॅन्सर होण्याची शक्यता असते.

सन स्क्रीन :

 

sunsscreen-inmarathi
verywell.com

सन स्क्रीन, सूर्याच्या किरणांपासून वाचण्याकरिता अनेक लोकं सन स्क्रीनचा वापर करतात. पण हे सन स्क्रीन तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. याने त्वचेचा कॅन्सर होण्याची शक्यता असते.

मोबाईल फोन :

 

mobile-marathipizza
हे वाचून प्रत्येक मोबाईल वेड्याला धक्का लागेल पण, १० मिनिटांपेक्षा जास्त काळ मोबाईल वापरल्याने डोक्याच्या सेल्सवर वाईट परिणाम होतो. याने डोक्याच्या कॅन्सरचा धोका वाढतो. तर अनेक वेळा यामुळे ब्रेन ट्युमर होण्याचा धोका देखील वाढतो.

रेड मीट :

 

red meat-inmarathi
sciencedaily.com

एका रिसर्चनुसार असे कळाले की, जे लोकं मिट, बीफ, चिकन याचे अति प्रमाणात सेवन करतात त्यांना लंग कॅन्सर म्हणजेच फुफ्फुसाच्या कॅन्सर लवकर होतो.

विटामिन ई :

 

vit-E-inmarathi
livestrong.com

७७ हजार लोकांवर करण्यात आलेल्या एका रिसर्च नुसार असे दिसून आले की, अति प्रमाणात विटामिन-E चे अवशोषण केल्याने कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.

कारण, अति प्रमाणातील विटामिन-ई शरीरातील ब्रिटॉनला दर १५ मिनिटांत संपवते. ज्यामुळे फुफ्फुसांचा कॅन्सर होण्याची शक्यता संभावते.

कुकीज किंवा बेकरी प्रोडक्ट्स :

 

cookies-inmarathi
eatthis.com

कुकीज किंवा बेकरी प्रोडक्ट्स मध्ये अनेक प्रकारचे रसायन मिसळले जाते. जेणेकरून या वस्तू जास्त काळ टिकतील, खराब होणार नाहीत.

पण हे रसायन आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक असतात. यांमुळे देखील कॅन्सर होण्याची शक्यता असते.

माऊथवॉश :

 

mouthwash-inmarathi
wmsmile.com

माऊथवॉश हे आपले आतील तोंड स्वच्छ ठेवून दुर्गंधी येण्यापासून वाचवते. पण हेच माऊथवॉश आपल्या शरीरासाठी धोकादायक आहे. वैज्ञानिकांनुसार माऊथवॉश मध्ये अल्कोहोल असते ज्यामुळे तोंडाचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.

थोडक्यात सांगायचं झालं कुठल्याही गोष्टीचे अति सेवन अथवा वापर हे अपायकारकच…

स्त्रोत : thedailydust

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “तुम्ही तंबाखू खात नसाल तरी दैनंदिन वापरातील या गोष्टींमुळे तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *