रोजच्या वापरातील ह्या वस्तू भविष्यात लुप्त होऊ शकतात

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

आज आपण २१ व्या शतकात जगत आहोत. आज आपल्या दैनंदिन वापरातल्या अनेक गोष्टी उच्च तंत्रज्ञान वापरून बनवण्यात आल्या आहेत. ज्या आपल्या आजी आजोबांना काय, तर आपल्या आई-वडिलांनाही फारश्या काही कळत नाहीत. कारण त्यांच्या काळात हे असलं काहीही नव्हतं. जसे की मोबाईल, ईमेल, रोबॉट्स वगैरे. जसे त्यांच्या जमान्यातल्या काही गोष्टी ह्या आता इतिहासजमा झाल्या आहेत तश्याच आपल्याही वर्तमानातील काही गोष्टी भविष्यात नाहीश्या होतील. जसा जसा काळ बदलेलं माणूस बदलेल, त्याच्या गरजा बदलतील तश्यात आपल्या आजूबाजूच्या आपल्या गरजेच्या वस्तूंमध्येही बदल होत राहिल.

जसे की,

सोनं :

 

gold_inmarathi
financesonline.com

आपल्या पृथ्वीतलावर जी नैसर्गिक संसाधने आहेत ती मर्यादित आहेत. एकावेळे नंतर तो मर्यादित साठा संपेल आणि ते धातू हे इतिहासजमा होतील. जसे की सोनं. सोनं ही एक नैसर्गिक साधन संपत्ती आहे. त्यामुळे भविष्यात एक वेळ अशी येईल जेव्हा पृथ्वीवरील सर्व सोनं हे संपलेलं असेल.

पैसा :

notes-marathipizza1
thehansindia.com

मोदी ह्यांनी पंतप्रधान पदाचा कार्यभार हाती घेताच भारताला कॅशलेस बनविण्याचे आपले ध्येय असल्याचे सांगितले होते. त्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्नही करण्यात आले. आणि आज भारतात आधीच्या तुलनेत अधिक प्रमाणात लोक हे प्लास्टिक मनी वापरताना दिसून येत आहेत. पण भविष्यात ह्या ऑनलाईन ट्रॅन्झॅक्शनमुळे कॅश किंवा नगदी पैसा हा कदाचित आपल्याला बघायला मिळणार नाही.

स्वाक्षरी :

 

Signature-inmarathi
safelayer.com

एक वेळ होती जेव्हा जोपर्यंत एखाद्या कागदपत्रावर अधिकाऱ्याची किंवा एखाद्या विश्वासूची स्वाक्षरी नसेल तोपर्यंत ती कागदपत्रे ग्राह्य धरल्या जात नव्हती. स्वकःरी ही व्यक्तीची ओळख होती. पण काळ बदलत गेला आणि ह्या स्वाक्षरीची नक्कल करण्याऱ्यांमुळे अनेक समस्या उद्भवू लागल्या. म्हणून आता स्वाक्षरी पेक्षा इतर वस्तूंना जास्त प्राधान्य दिल्या जाते. पण येणाऱ्या काळात ही स्वाक्षरी पूर्णपणे विलुप्त होऊन त्याची जागा IRIS, फिंगरप्रिंट आणि वॉइस रिकग्निशन सारख्या टेक्निक घेतील.

रिमोट :

 

tv remote-inmarathi
play.google.com

ज्या टीव्हीच्या रिमोट करिताआपल्या भावंडांशी भांडण्यात आपलं अख्ख बालपण गेलं तो रिमोट देखील येणाऱ्या काळात नाहीसा होणार. त्या ठिकाणी वॉइस कमांडनी टीव्ही ऑपरेट केला जाईल.

ट्राफिक:

 

china-traffic-jam-marathipizza

 

आज ट्राफिक हा सर्वच देशांच्या समस्या यादीतील महत्वाचा मुद्दा आहे. वाढती लोकसंख्या आणि गाड्यांचा वापर ह्यामुळे ट्राफिक कंट्रोलमध्ये ठेवणे खूपच कठीण होत आणि, आणि त्यामुळे होणाऱ्या वायू आणि ध्वनी प्रदूषणाची समस्या देखील वाढत चालली आहे. पण येणाऱ्या काळात ट्राफिक ची समस्या कदाचित होणार नाही कारण तेव्हा ड्रायव्हरलेस कार्स असतील, ज्यांना चालविण्यासाठी ड्रायव्हर नसेल.

मेडिकल सर्जन :

 

robotic-surgery-inmarathi
zdnet.com

आजकाल प्रत्येक फिल्ड साठी रोबॉट्स तयार करण्याचा प्रयत्न होतो आहे. ह्यातून मेडिकल क्षेत्र देखील सुटलेलं नाही. येणाऱ्या काळात ह्या मेडिकल सर्जन्सची जागा ही आर्टिफीशियल इंटेलिजेन्स मशीन्स घेऊ शकतात.

मधुमेह :

 

diabetes-inmarathi02
jadipani.com

आज जगातील सर्वच देशातील एक खूप मोठा वर्ग हा हा मधुमेह ह्या रोगाने त्रस्त आहे. पण भविष्यात कदाचित हा आजाराच राहणार नाही. कारण आता वैज्ञानिक एक अश्या प्रकारची सारख बनविण्याच्या प्रयत्नात आहेत जी दिसायला आणि कॅह्विला साखरेसारखीच असेलं पण त्यामुळे आरोग्याला कुठलेही नुकसान होणार नाही. त्यामुळे लोक आनंदाने गोड खाऊ शकतील.

प्रायव्हसी :

 

privacy-inmarathi
disclose.tv

काही काळाने तुमचं घर सोडून इतर कुठेही तुम्हाला हवा तो एकांत किंवा प्रायव्हसी मिळणार नाही. कारण भविष्यात जवळपास सर्वच ठिकाणी तुम्हाला सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले दिसू शकतात.

कुलूप-चावी :

 

lock-key-inmarathi
c2.staticflickr.com

आज जी नवीन घरे बांधली जात आहेत तिथल्या दरवाज्यांना जास्तकरू मोडर्न आणि अधिक सुरक्षित असे टाळे बसविले जातात. त्यामुळे आता आपले कुलूप आणि चावी हे इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?