ह्या लोकांना कुठल्याच माध्यमातून एड्सचा संसर्ग होऊ शकत नाही !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

एचआयव्ही म्हणजेच एड्स हा एक गंभीर आजार आहे. हा आजार असाध्य आहे, तो कधीही बरा होऊ शकत नाही हे तर आपल्या सर्वांनाच माहित आहे. हा एचआयव्ही वायरस रक्तात असणाऱ्या CD४+ T पांढऱ्या रक्त पेशींच्याच्या पृष्ठभागावर असणाऱ्या CCR5 प्रोटीनवर हल्ला करून पेशींच्या आत प्रवेश घेतात. ज्यानंतर तो रक्ताच्या सहाय्याने संपूर्ण शरीरात पसरतो. जेव्हा हा एचआयव्ही वायरस संपूर्ण शरीरात पसरतो आणि त्याची लक्षणं दिसायला लागतात तेव्हा त्याला एड्सचा आजार झाला असे म्हटले जाते.

 

HIV-AIDS-Inmarathi
rand.org

आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशी ह्या शरीराला रोगांशी लढण्यात मदत करतात. तेव्हा ह्या एचआयव्ही वायरसमुळे ह्या पांढऱ्या पेशी कमी होत असतात. तेव्हा व्यक्तीला इतर रोगांची लागण खूप लवकर होते आणि आपलं शरीर अशक्त होत जाते. ह्या अशक्तपणातून शरीर सावरू शकत नाही आणि त्याच्या अखेर मृत्यू होतो.

पण जगात असे देखील काही लोक आहेत ज्यांना ह्या रोगाची लागणच होऊ शकत नाही. २००५ साली वैज्ञानिकांनी एक शोध लावला ज्यात असे दिसून आले की, उत्तरी युरोप आणि आफ्रिका, आशिया आणि मूळ अमेरिकन असलेल्या काही लोकांच्या रक्तात CCR५- Delta३२ नावाचं एक आश्चर्यकारक जीन म्युटेशन आढळून आलं. असे लोक जगातील एकूण लोकसंख्येच्या १% पेक्षा कमी आहेत. आज आपल्या पृथ्वीवरील लोकांची लोकसंख्या ही ७६० कोटींच्या घरात आहे, त्यापैकी असे जीन्स असलेल्या लोकांची संख्या ही ५-६ कोटी एवढी आहे. हे लोक एड्स प्रतीरोधक आहेत.

 

HIV-AIDS-Inmarathi01
onhealth.com

CCR५-Delta३ जीन म्युटेशन ज्याच्या शरीरात आढळतात, त्याच्या शरीरात पांढऱ्या रक्त पेशींवर CCR५ प्रोटीन राहतच नाही. ह्याचं कारणामुळे एचआयव्ही वायरस हा रक्तपेशीत शिरू शकत नाही. त्यामुळे त्यांना हा आजार होऊ शकत नाही.

CCR५-Delta३२ जीन म्युटेशन हा आई-वडील ह्या दोघांपासून मिळतो. जर आई किंवा वडील ह्या दोघांपैकी एकाच्या जीन्स मध्ये देखील CCR५-Delta३२ जीन म्युटेशन हा जीन असेलं तर पुढील पिढीला देखील तो जीन ट्रान्सफर होत असतो आणि अश्याप्रकारे हे लोक एड्स ह्या आजारापासून वाचलेले असतात.

 

HIV-AIDS-Inmarathi04
ucatolica.edu.co

झालेल्या रिसर्चमध्ये हे समोर आलं की, CCR५-Delta३२ जीन म्युटेशन हे १५ व्या शतकाच्या जवळपास पहिल्यांदा काही मानवांच्या शरीरात उत्पन्न व्हायला सुरवात झाली.

 

HIV-AIDS-Inmarathi02
defendernetwork.com

२००८ साली University of Manitoba येथे झालेल्या एका अध्ययनात असे दिसून आले की, काही महिला सेक्स वर्कर्स ह्यांना एड्सची लागणच झाली नाही. जेव्हाकी त्या स्त्रिया ३ वर्षांपासून अश्या अनेक पुरुषांच्या संपर्कात होत्या जे एड्सह्या आजाराने ग्रासलेले होते.

आणि अश्याच एका एड्स प्रतिरोधक व्यक्तीच्या मदतीने जर्मनीच्या बर्लिन येथील टिमोथी रे ब्राऊन ह्यांना असलेला एड्स हा रोग बरा झाला. टिमोथी रे ब्राऊन हे जगातील एकमेव असे व्यक्ती आहेत ज्यांना एड्स हा रोग असूनही ते बरे झाले.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?