' ह्या साध्या चुकांमुळे तुमचा व्हिसा रिजेक्ट होऊ शकतो – InMarathi

ह्या साध्या चुकांमुळे तुमचा व्हिसा रिजेक्ट होऊ शकतो

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

ह्या जगात प्रत्येक माणसाचे ध्येय वेगळे असते. इच्छा वेगवेगळ्या असतात किंवा स्वप्नं सुद्धा वेगवेगळी असतात.

पण एक स्वप्न मात्र बहुतांश भारतीय बघतात ते म्हणजे आयुष्यात एकदा तरी फॉरेन टूर करणे आणि वेगवेगळे देश बघणे.

फिरण्याची आवड असलेल्या प्रत्येकालाच एक तरी देश बघून यावा असे वाटते. काहींना तर विदेशात जाऊन करियर घडवण्याची इच्छा असते.

पण त्यासाठी नुसता पासपोर्ट असून उपयोगाचे नाही. विदेशात एका दिवसासाठी जायचे म्हटले तरी व्हिसा आवश्यक असतो.

म्हणूनच व्हिसा मिळाला नाही तर अनेकांच्या स्वप्नांवर विरजण पडते. पासपोर्ट मिळवणे सोपे आहे, पण व्हिसा मिळणे अतिशय किचकट आहे.

 

visa-rejected-marathipizza01
visaplace.com

काही काही लोक तर एम्बसी मधून नेहमी नेहमी रिजेक्शन ऐकल्यावर धीर सोडून फॉरेनला जायचा प्लानच रहित करून मोकळे होतात.

कधीतरी काही देशांच्या अत्यंत किचकट नियमांमुळे व्हिसा रिजेक्ट होतो तर कधीतरी आपल्याच लहान सहन चुकांमुळे ज्या खरं तर अगदी सिली मिस्टेक्स असतात त्यामुळे सुद्धा आपले व्हिसा अँप्लिकेशन रिजेक्ट होऊ शकते.

आज आपण बघणार आहोत की फॉर्म भरताना कुठल्या कुठल्या चुकांमुळे आपले व्हिसा ऍप्लिकेशन रिजेक्ट होते.

 

तिकीटाची तारीख आणि फॉर्मवरची तारीख वेगळी असणे

 

visa-rejected-marathipizza02
immivisas.com

हे एम्बसीवाले लोक आपले ऍप्लिकेशन अतिशय काटेकोरपणे चेक करतात. त्यांची नजर अगदी बारीक असते. म्हणूनच छोट्यातली छोटी चूक ते अगदी सहज पकडू शकतात. म्हणूनच फॉर्म भरताना त्यावर तारीख तुमच्या तिकीटाप्रमाणेच लिहा.

 

पोस्ट बॉक्स नंबर योग्य नसणे

 

visa-rejected-marathipizza03
y-axis.com

खरं तर पत्त्यावर पोस्ट बॉक्स नंबर बरोबर असणे ही अतिशय छोटी गोष्ट आहे. पूर्ण पत्ता बरोबर लिहून तुम्ही तुमचा पोस्ट बॉक्स नंबर किंवा पिन कोड चुकीचा लिहिलात तर तुमचे व्हिसा ऍप्लिकेशन रिजेक्ट होऊ शकते.

म्हणूनच फॉर्मवर पिन कोड सकट तुमचा पत्ता अगदी अचूक लिहा.

 

फोटो बरोबर नसणे

 

visa-rejected-marathipizza04
blsindia-canada.com

काही देशातील सुरक्षेसाठी कायदे अतिशय कडक असतात. म्हणूनच कधी कधी फोटोमुळे तुमचा व्हिसा रिजेक्ट होण्याची शक्यता असते.

म्हणूनच तुमच्या व्हिसा ऍप्लिकेशनवर फोटो लावताना हे पक्क ध्यानात ठेवा की तुमचा फोटो त्यांनी दिलेल्या नियमात बसणारा हवा आणि ९० दिवसांपेक्षा जास्त जुना नसावा.

शिवाय ह्याआधी दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी वापरलेला नसावा.

 

बँक स्टेटमेंट वर बँकेचा शिक्का नसणे

 

visa-rejected-marathipizza05
online-banking-help.blogspot.in

व्हिसा ऍप्लिकेशन सोबत जी काही महत्वाची कागदपत्रे सादर करावी लागतात त्यातला महत्वाचा दस्तऐवज म्हणजे तुमचे बँक स्टेटमेंट होय.

पण घाई घाईमध्ये किंवा टेन्शनमध्ये आपण एक अतिशय गंभीर चूक करतो ती म्हणजे आपल्या बँक स्टेटमेंटवर बँकेचा शिक्का नसणे आणि ते स्टेटमेंट तसेच सादर करणे.

ह्या एका चुकीमुळे तुमचे ऍप्लिकेशन हमखास रिजेक्ट होऊ शकते.

 

व्हिसामध्ये कॅटेगरी चुकीची भरणे

 

visa-rejected-marathipizza06
expatriates.stackexchange.com

व्हिसासाठी फॉर्म भरताना एक गोष्ट लक्षात ठेवणे अतिशय आवश्यक आहे ती म्हणजे हा फॉर्म डोळ्यात तेल घालून अगदी काळजीपूर्वक भरायला हवा.

हा कुठलाही साधा फॉर्म नसून तुमच्या विषयीची मागितलेली माहिती असते ती तुम्ही संपूर्ण आणि अचूकच लिहायला हवी. म्हणूनच व्हिसासाठी जो कॅटेगरीचा प्रश्न विचारलेला असतो त्याचे योग्य उत्तर लिहिणे आवश्यक आहे.

तुमचा त्या देशात जाण्याचा उद्देश खरा आणि अचूकच लिहिणे आवश्यक आहे.

 

फॉर्ममधील प्रश्नांची पूर्ण उत्तरे न लिहिणे

 

visa-rejected-marathipizza07
travelvisabookings.com

काही लोक कधी कधी फॉर्म भरताना त्यात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अचूक लिहित नाहीत किंवा पूर्ण फॉर्मच नीट पूर्ण भरत नाहीत. ह्याने तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. म्हणूनच फॉर्ममध्ये विचारलेल्या सर्व प्रश्नांची संपूर्ण उत्तरे लिहा.

 

पासपोर्ट आणि व्हिसा ऍप्लिकेशनवर वेगवेगळी सही असणे

 

visa-rejected-marathipizza08
cs2guru.com

वेगवेगळ्या फॉर्मवर वेगवेगळ्या प्रकारच्या सह्या करणे ही आपली अतिशय चुकीची सवय आहे.

पण व्हिसासाठी फॉर्म भरताना मात्र ह्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की तुमच्या पासपोर्टवरची तुमची सही आणि व्हिसा ऍप्लिकेशन वर तुम्ही केलेली सही तंतोतंत जुळायला हवी.

नाहीतर ह्या कारणाने तुमचे विदेशात जायचे स्वप्न भंग होऊ शकते.

 

पासपोर्टची व्हॅलिडिटी न तपासणे

 

visa-rejected-marathipizza09
bemoneyaware.com

विदेशात जाण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे व्हिसा मिळणे आणि त्यासाठी अप्लाय करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा पासपोर्ट व्हॅलिड असणे.

तुमचा पासपोर्ट जर व्हॅलिडिटी मध्ये नसेल तर एका क्षणात तुमचा अर्ज रिजेक्ट झालाच म्हणून समजा!

आता पुढच्या वेळी व्हिसा साठी अर्ज करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला व्हिसा मिळण्याच्या शक्यता निश्चितच वाढतील.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?