ह्या बॉलीवूड कलाकारांनी एक रुपयाही न घेता चित्रपटात काम केले आहे!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

अभिनयाचे क्षेत्र हे सर्वात ग्लॅमरस क्षेत्र म्हणून ओळखले जाते. आपल्याकडे जितका पैसा आणि प्रसिद्धी ह्या क्षेत्रात मिळते तितकी इतर क्षेत्रामध्ये सहजासहजी मिळत नाही. अर्थात ह्या क्षेत्रात स्ट्रगल आणि मेहनत सुद्धा खूप आहे. आपण सामान्य लोक असा विचार करतो कि बॉलीवूडमधल्या अभिनेत्यांना आणि अभिनेत्रींना भरपूर पैसा मिळत असेल किंबहुना भरपूर पैसा मिळाल्याशिवाय ते सिनेमामध्ये काम करण्याची ऑफर स्वीकारत सुद्धा नसतील. काही वेळा असे होतेही. परंतु काही वेळा हेच मोठमोठे अभिनेते आणि अभिनेत्री त्यांच्या मैत्रीखातर किंवा सिनेमाचा विषय बघून त्यांच्या कामासाठी एक रुपयाही घेत नाहीत. आज आपण अशाच काही अभिनेत्यांबद्दल जाणून घेणार आहोत.

 

१.अक्षय कुमार

airlift-akshay-kumar-marathipizza
dnaindia.com

अक्षय कुमारने त्याच्या एयरलिफ्ट ह्या सिनेमासाठी चित्रपटाच्या निर्मात्यांकडून सिनेमामध्ये काम करण्यासाठी काहीही मानधन घेतले नाही. परंतू चित्रपट यशस्वी झाल्यास त्यातला मोठा वाटा त्याला मिळणार होता. चित्रपट यशस्वी झाला आणि त्या नफ्यामधील मोठा वाटा अक्षय कुमारला मिळाला.

 

२. सलमान खान

prem-ratan-dhan-payo-marathipizza
pinterest.com

खान त्रिकुटापैकी एक सलमान खान त्याच्या यशस्वी करियर साठी राजश्री प्रॉडक्शनला नेहमीच धन्यवाद देतो कारण त्यांच्या चित्रपटांमधून सलमानला वेगळी ओळख मिळाली आहे. सलमानच्या यशस्वी करियरमध्ये राजश्री प्रॉडक्शन्स चा मोठा वाटा आहे. म्हणूनच त्याने राजश्री प्रॉडक्शनच्या ‘प्रेम रतन धन पायो’ साठी मानधन घेतले नाही.

 

३. धर्मेंद्र

Dil Bhi Tera Hum Bhi Tere-marathipizza
cherrymusic.in

बॉलीवूड मधील वरिष्ठ अभिनेते धर्मेंद्र ह्यांनी त्यांच्या बॉलीवूडमधील पदार्पण केलेल्या सिनेमासाठी म्हणजेच ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ ह्या सिनेमासाठी काहीही मानधन घेतले नाही. त्या काळी त्यांना त्या सिनेमासाठी ५१ रुपये मिळणार होते,जी त्या काळची मोठी रक्कम होती. पण ह्या चित्रपटामुळे त्यांना चित्रपट विश्वात ओळख मिळणार असल्याने त्यांनी हा चित्रपट करण्यासाठी एकही पैसा घेतला नाही.

 

४. गोविंदा

partner-marathipizza
glamsham.com

डेव्हिड धवन ह्यांच्या सोबत अनेक यशस्वी सिनेमे केल्यानंतर गोविंदा ह्यांच्या करियर मध्ये बॅडपॅच आला होता. त्यांनी हिंदी सिनेमात काम करणे जवळजवळ बंद केले होते. अशा वेळी त्यांना कमबॅक साठी सलमान खान सोबत पार्टनर हा सिनेमा करण्याविषयी विचारणा झाली. त्यांनी आनंदाने सिनेमा करण्यास होकार दिला पण करियर मध्ये कमबॅक होणार असल्याने त्यांनी ह्या सिनेमासाठी मानधन घेतले नाही. निर्मात्यांनी सुद्धा ह्यावर खुश होऊन त्यांना पार्टनर च्या सिक्वेल ची साइनिंग अमाउंट दिली.

 

५.शाहीद कपूर

haider-marathipizza
koimoi.com

असं म्हणतात की शाहीद कपूरने त्याच्या हैदर ह्या चित्रपटासाठी निर्मात्यांकडून काहीही मानधन घेतले नाही.

 

६. कतरिना कैफ

chikani-chameli-marathipizza
santabanta.com

कतरिना कैफ ने करण जोहरच्या अग्निपथ मधील ‘चिकनी चमेली’ ह्या आयटम नंबर साठी काहीही मानधन घेतले नाही. तिने ह्या गाण्यासाठी भरपूर मेहनत घेतली म्हणून करण जोहरने खुश होऊन कतरिनाला फेरारी गाडी भेट म्हणून दिली.

 

७. राणी मुखर्जी

kabhi-khushi-kabhi-gam-marathipizza
coolspotters.com

करण जोहर आणि राणी मुखर्जी हे चांगले मित्र आहेत हे सर्वांनाच माहित आहे. म्हणूनच तिने करण जोहरच्या ‘कभी ख़ुशी कभी गम’ ह्या चित्रपटामधील तिच्या छोट्याश्या भूमिकेसाठी पैसे घेतले नाहीत.

 

८. अमिताभ बच्चन

black-marathipizza
pinterest.com

बॉलीवूड मधील सर्वात लोकप्रिय अभिनेते अमिताभ बच्चन ह्यांना आपल्या चित्रपटात घेणे हे प्रत्येक निर्मात्या/दिग्दर्शकाचे स्वप्न असते. जेव्हा अमिताभ बच्चन ह्यांच्या मेकअप आर्टिस्टने एक भोजपुरी सिनेमा दिग्दर्शित केला तेव्हा त्या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी बच्चन ह्यांनी मानधन घेतले नाही. तसेच संजय लीला भन्साळी ह्यांची ब्लॅक ह्या चित्रपटासाठी चाललेली मेहनत बघून त्यांनी ब्लॅक मधील त्यांच्या महत्वपूर्ण भूमिकेसाठी सुद्धा मानधन घेतले नाही.

 

९. फरहान अख्तर

Bhaag_Milkha_Bhaag-marathipizza
en.wikipedia.org

मिल्खा सिंग ह्यांच्या जीवनावर जो भाग मिल्खा भाग हा चित्रपट आला होता त्यात फरहान अख्तरने मिल्खा सिंग ह्यांची भूमिका केली होती. ह्या भूमिकेसाठी त्याने खूप मेहनत केली होती. महत्वाची बाब म्हणजे फरहान अख्तरने ह्या सिनेमासाठी शुभेच्छा व आशीर्वाद म्हणून फक्त ११ रुपये इतकीच रक्कम स्वीकारली होती.

 

१०. दीपिका पदुकोण

om-shanti-om-marathipizza
extratorrent.cc

दीपिकाने तिचा बॉलीवूडमधला पदार्पणाचा चित्रपट ‘ओम शांती ओम’ ह्या सिनेमासाठी नम्रपणे निर्मात्याने दिलेली मानधन स्वीकारण्यास नकार दिला होता. तिचे म्हणणे होते कि पहिल्याच चित्रपटामध्ये प्रत्यक्ष शाहरुख खान बरोबर काम करायला मिळणे हिच तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून ती मानधन स्वीकारू शकत नाही.

तसेच आजवर , प्रियांका चोप्रा व करीना कपूरने ‘बिल्लू’ ह्या चित्रपटामधील गाण्यासाठी पैसे घेण्यास नकार दिला होता. तसेच शाहरुख खानने सुद्धा ‘भूतनाथ रिटर्न्स’ ह्या चित्रपटामधील त्याच्या भूमिकेसाठी मानधन घेतले नाही. सोनाक्षी सिंहाने सुद्धा बॉस ह्या चित्रपटामधील गाण्यासाठी मानधन स्वीकारण्यास नकार दिला होता.

Films-marathipizza
saga.co.uk

बॉलीवूड अभिनेत्यांप्रमाणेच Tom Cruise , Jonah Hill, Mathew McConaughey, Bill Murray, Ethan Hawke , Brad Pitt, Hilary Swank ह्या हॉलीवूड कलाकारांनी सुद्धा फक्त कथा आवडली म्हणून काही चित्रपटांसाठी मानधन घेतले नाही.

कलाकार संवेदनशील असतात असे म्हणतात. म्हणूनच कधी मैत्रीखातर तर कधी कथा आवडली म्हणून ते प्रचंड मेहनत घेऊन सुद्धा त्याचे मानधन घेत नाहीत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?