' जगातल्या या सर्वोत्तम ऑफिसमध्ये काम करण्याचा तुम्हाला कधीच कंटाळा येणार नाही – InMarathi

जगातल्या या सर्वोत्तम ऑफिसमध्ये काम करण्याचा तुम्हाला कधीच कंटाळा येणार नाही

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

=== 

ऑफिसला जायचं नाव काढलं तरी आपल्याला कंटाळा येतो.  कधी एकदा कामाचे ८-९ तास संपून त्या रटाळवाण्या वातावरणातून बाहेर पडतोय असं होतं.

विकेंड एन्जॉय केल्यानंतर अनेकांना सोमवारची सकाळ मोठी कष्टाची वाटते. ऑफिसमध्ये जाऊन पुन्हा एकदा लॅपटॉपमध्ये डोकं खुपसणं अनेकांना आवडत नाही.

 

 

आपण जेंव्हा शाळेत असतो, तेंव्हा आपल्याला कॉलेजची ओढ असते. कधी एकदा मोठं होतोयं, आणि नोकरीला लागतोय हे तर प्रत्येक लहान मुलाचं स्वप्न असतं.

अभ्यास करण्यापेक्शा आई-बाबांसारखं खांद्याला बॅग अडकवून ऑफिसला जाण्याची कल्पना अनेक मुलं खेळातही रंगवितात. मात्र जेंव्हा ख-या आयुष्यात ऑफिसला जाण्याची वेळ येते, तेंव्हा मात्र पुन्हा लहान व्हावसं वाटतं.

करिअर करताना चांगली नोकरी मिळावी अशी प्रत्येकाची धडपड असते, किंबहुना याच कारणासाठी अभ्यास करत, अनेक डिग्री मिळविली जाते. मग जेंव्हा नोकरी मिळून आपलं स्वप्न पुर्ण होतं, तेंव्हाच नेमका ऑफिसचा कंटाळा का येतो? खरंतर हे सारं आपल्याला हवहवसं वाटतं, मग तरिही ऑफिसमधला वेळ बोअरिंग, रटाळ का असतो याचा कधी विचार केला आहे का?

 

aajtak

 

याचं खर उत्तर ऑफिसचं काम नसून ती जागा हे आहे.

आपल्या प्रत्येकाच्या कल्पनेतील ऑफिस असं आहे, जिथे वाटेल तेव्हा आराम करायला मिळाला पाहिजे, सारखी कॉफी प्यायला मिळावी, कंटाळा आला की गेम खेळायला, पुस्तक वाचायला मिळावं, खूपच बोर झालं तर म्युजिक आणि मुव्हीज बघायला मिळाव्यात.

हो की नाही? आपल्या प्रत्येकाच्या मनात ड्रीम ऑफिसचं चित्र असंच आहे. पण आपल्या नशिबी असं ड्रीम ऑफिस येणं दुरापास्तचं !

मात्र जगात काही भाग्यवान मंडळी आहेत , जी स्वत:हून, न चुकता, दांडी न मारता वेळेवर नियमित ऑफिसला जातात.

अहो असं खरंच घडतं कारण नशिबाने आपल्या मनातील ड्रीम ऑफिसेस त्यांच्या नशिबी आलीत.

ही ऑफिसेस म्हणजे काम पण करा आणि एन्जोय पण करा या आधारावरील आहेत. विश्वास बसतं नाही? मग जरा खालच्या छायाचित्रांकडे नजर टाकाचं !

सेल्गास्कानो आर्किटेक्चर, माद्रिद

 

best-offices-of-world-marathipizzao1

 

हे ऑफिस आहे, हे कुणाला सांगूनही खरं वाटणार नाही. या ऑफिसटा फोटो पाहिला की जंगलसफारीवर आलेल्यांचं हे मुक्कामस्थान असावं असं सहज वाटेल.

तुम्हालाही असचं वाटलं ना, मग अशा निसर्गरम्य ठिकाणी दररोज काम करता आलं तर मजा औरच.

या ऑफिसमध्ये नियमितपणे कामं केली जातात, मात्र त्यासाठी कोणत्याही आर्टिफिशिअल गोष्टी वापरण्यापेक्षा नैसर्गिक गोष्टींवर अधिक भर देण्यात आला आहे.

पालोत्ता टीमवर्क्स, लॉस एंजलीस

 

best-offices-of-world-marathipizza2

 

या ऑफिसची रचना मोठी गमतीशीर आहे. काहींना ही लहान मुलांची खेळण्याची जागा वाटु शकते.

रंगबेरंगी रचनांमध्ये कर्मचा-यांच्या बसण्याची सोय करण्यात आली असून ऑफिसमध्ये फिरण्यासाठी छोट्याशा गाड्यांचा वापर केला जातो.

 

पार्लमेंट डिजाईन, पोर्टलँड

 

best-offices-of-world-marathipizza03

 

एखादा कॅफे वाटावा अशी या ऑफिसची रचना आहे. ऑफिसमध्ये असलेली अनौपचारिकता दूर केल्याने मजा करत कर्मचा-यांना काम करता येतं.

यामध्ये वुडन अर्थात लाकडी सामानाचा वापर करण्यात आला आहे.

 

मायक्रोसॉफ्ट, व्हिएन्ना

 

best-offices-of-world-marathipizza05

 

मायक्रोसॉफ्ट ही कंपनी सर्वांनाच ठाऊक आहे. या कंपनीची जगभर ऑफिसेस आहेत. मात्र व्हिएन्ना येथिल ऑफिस निराळेच आहे.

इथली बैठकीची व्यवस्था, रंगसंगती इतकी आकर्षक आहे, की इतर कंपनीही याकडे आदर्श म्हणून बघतात.

पॅनडोरा मिडिया, ऑकलँड

 

best-offices-of-world-marathipizza06

 

या ऑफिसची रचना आणि तेथिल रोषणाई हे त्यांच वैशिष्ठ्य आहे.

कर्मचा-यांचा मुड कायम फ्रेश रहावा यासाठी ही रचना केली गेली आहे.

गुगल, झुरीच

 

 

फोटो पाहून धक्का बसला ना!

असं ऑफि, कसं असू शकतं हा तुमचा प्रश्न असेल तर हे ऑफिस बघाच.

अत्यंत नयनरम्य अशी या ऑफिसची रचना आहे. ऑफिसमध्ये केली जाणारी मिटींगही अत्यंत अनौपचारिकपणे सजविलेल्या मखमली हॉलमध्ये केली जाते.

गुगल, लंडन

 

best-offices-of-world-marathipizza08

 

एखाद्या मॉलमध्ये असलेल्या किड्स झोनचं हे चित्र आहे असं वाटत असेल तर तुम्ही चुकताय.

कारण या जागेत जगभरातील कोटींचे व्यवहार केले जातात.

वरकरणी मजेशीर दिसणारं हे ऑफिस अग्रगण्य कंपनींपैकी एक आहे. याची रचना पाहून आपण किमान एकदा तरी या ऑफिसमध्ये जावं असं तुम्हाला नक्कीच वाटत असणार.

गुगल, अॅमस्टरडॅम

 

best-offices-of-world-marathipizza09

 

याची रचना पाहून एखादी गाडी आहे, असं वाटतं, मात्र या गाडीसारख्या खुर्चीत कंपनीचे वरिष्ठ बसत असतील हे खरंही वाटणार नाही.

 

गुगल, तेल अवीव

 

best-offices-of-world-marathipizza10

 

शांतताप्रिय असलेल्या या ऑफिसमध्ये निसर्गाची हिरवाई देखील सापडते.

 

कॅम्पर, शांघा

 

dezeen

 

 

अॅस्ट्राझेनेका, कॅम्ब्रिज

 

best-offices-of-world-marathipizza12

 

अत्यंत देखणं अशा ऑफिसमध्ये तुम्हालाही काम करता आलं तर…

अर्बन आउटफिटर्स, फिलाडेल्फिया

 

best-offices-of-world-marathipizza13

 

एखाद्या प्रशस्त राजेशाही घराप्रमाणे असलेली ही रचना आपल्यालाही भुरळ घालते.

अॅण्टिक वस्तुंचा वापर करत हे ऑफिस सजविण्यात आलं आहेे.

पिअर वन, साउथम्पटन

 

best-offices-of-world-marathipizza14

 

पिक्सल बिल्डींग अॅलेग्रो, पोझनॅन’

 

best-offices-of-world-marathipizza15

 

कर्माराम कम्युनिकेश एजन्सी, लंडन

 

best-offices-of-world-marathipizza16

स्रोत

 

सध्या जगभारातील अनेक ऑफिसेसचा कायापालट होत आहे.

कर्मचा-यांना कामासह कम्फर्ट सह चांगलं वातावरण, सोईसुविधा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?