जगातील अशी ८ चक्रीवादळं ज्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

काही दिवसांपूर्वीच भारतामध्ये ओखी नावाच्या चक्रीवादळाने थैमान घातले होते. या वादळामुळे केरळ, तामिळनाडू, लक्षद्वीप आणि कोकण किनारपट्टीवर खूप नुकसान झाले. भारताप्रमाणेच इतर देशांना देखील या ओखी वादळाचा तडाखा बसला होता. बातम्यांनुसार, आता हे ओखी वादळ पाकिस्तानच्या दिशेने पुढे चालले आहे. ओखीच्या तडाख्यामुळे लोकं मारले गेले आणि यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झाले. ओखीप्रमाणेच जगभरात आतापर्यंत कितीतरी वादळांनी खूप मोठे नुकसान केले आहे. या वादळांनी जीवितहानी आणि वित्तहानी असे दुहेरी नुकसान केले. आज आम्ही तुम्हाला अशाच काही भयंकर वादळांविषयी सांगणार आहोत, ज्यांनी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केले होते. चला तर मग जाणून घेऊया, अशा या वादळांबद्दल..

नॅन्सी वादळ

 

Worst storms in the world.Inmarathi
nocookie.net

नॅन्सी वादळ हे १९६१ साली जपानच्या तटावर आले होते. हे वादळ ७ सप्टेंबर १९६१ पासून बनण्यास सुरुवात झाली, या वादळाने दहा दिवस थैमान घालते होते. या वादळाचा वेग सर्वात जास्त ३४५ किमी प्रती तास होता. जो इतिहासातील सर्वात जास्त वेग होता. नॅन्सी वादळामुळे जपानमध्ये १९१ लोकांचा मृत्यू झाला आणि हजारो लोक जखमी झाले.

वायलेट वादळ

 

Worst storms in the world.Inmarathi1
wikimedia.org

वायलेट वादळ १९६१ साली जपानच्या तटावर ३३० किमी प्रती तास या वेगाने धडकले होते. यामध्ये दोन माणसांचा मृत्यू झाला. हे एक उष्णकटिबंधीय वादळ होते.

आइडा वादळ

 

Worst storms in the world.Inmarathi2
kuchhnaya.com

आइडा वादळ हे सप्टेंबर १९५८ मध्ये १८५ किमी प्रती तास या वेगाने जपानच्या तटावर धडकले होते आणि त्यानंतर त्याचा वेग ताशी ३२५ किलोमीटर एवढा झाला. आइडा वादळामुळे जपानमध्ये एकूण १२६९ लोकांचा मृत्यू झाला, तसेच पाच कोटी अमेरिकी डॉलर्सचे म्हणजेच जवळपास ३२५ कोटींचे नुकसान झाले होते.

सॅली वादळ

 

Worst storms in the world.Inmarathi2
wikimedia.org

सॅली वादळ हे ३ सप्टेंबर १९६४ मध्ये पोनोपेच्या जवळ तयार झाले आणि पश्चिमेकडे चाल करू लागले. चार दिवसांनी या वादळाचा वेग ताशी ३१४ किमी एवढा झाला. हे वादळ ९ सप्टेंबरला फिलिपिन्सला पोहोचले आणि त्यानंतर १८५ किमी प्रती तास या वेगाने १० सप्टेंबरला चीनला पोहोचले. हे वादळ त्यावेळेच्या प्रचंड वादळांपैकी एक होते.

टीप वादळ

 

Worst storms in the world.Inmarathi3
yimg.com

टीप वादळ हे १२ ऑक्टोबर १९७९ मध्ये जपानला धडकले होते. या वादळाचा वेग ताशी ३०५ किमी एवढा होता. टीप वादळ हे मान्सूनमध्ये व्यत्ययामुळे ४ ऑक्टोबरला पोहनपेईच्या जवळ तयार झाले आणि १९ ऑक्टोबरला शांत झाले. या वादळामुळे जवळपास १०० लोकांचा मृत्यू झाला. तसेच, कृषी आणि मासेमारीचा उद्योगाचे करोडोंचे नुकसान झाले.

मोरा वादळ

 

Worst storms in the world.Inmarathi4
compassion.ie

मोरा वादळ हे ३० ऑगस्ट १९६६ मध्ये तयार झाले होते आणि ५ सप्टेंबर १९६६ ला ओकिनावा बेटाच्या जवळ धडकले होते. या वादळाचा वेग २८० किमी प्रती तास एवढा होता. मोरामुळे इन्फ्रास्ट्रक्चरचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, पण या वादळामुळे कोणत्याही माणसाला आपला जीव गमवावा लागला नाही. ७ सप्टेंबर १९६६ ला हे वादळ उत्तर – पूर्व चीनला आणि ९ सप्टेंबरला १९६६ मध्ये कोरियाला पोहचले.

हरकेन कॅटरीना वादळ

 

Worst storms in the world.Inmarathi5
wikimedia.org

कॅटरीना वादळ हे ऑगस्ट २००५ मध्ये अमेरिकेच्या लुसियाना आणि मिसिसिपीमध्ये आले होते. याच्यामुळे तिथे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. २३ ऑगस्ट २००५ ला हे वादळ ताशी २८० किमी या वेगाने तयार झाले होते आणि आठ दिवसांपर्यंत तसेच टिकून राहिले. कॅटरीना वादळामुळे एकूण १८३३ लोकांचा मृत्यू झाला, तसेच एकूण १०८ अब्ज अमेरिकेन डॉलर्सच्या संपत्तीचे नुकसान झाले.

हरकेन अँड्रू वादळ

 

Worst storms in the world.Inmarathi6
pinimg.com

हरकेन अँड्रू वादळ हे १६ ऑगस्ट १९९२ ला तयार होण्यास सुरुवात झाली होती आणि २८ ऑगस्ट १९९२ ला फ्लोरिडा, दक्षिण – पश्चिम लुसियानामध्ये धडकले. या वादळाचा वेग ताशी २८० किमी एवढा होता. या वादळामुळे एकूण ६५ लोकांचा मृत्यू झाला, तसेच २६.५ अब्ज अमेरिकन डॉलर्स संपत्तीचे नुकसान झाले.

अशी ही काही वादळे खूपच भयंकर होती आणि त्यांच्यामुळे या देशांना खूप मोठे नुकसान सहन करावे लागले.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?