‘ह्या’ व्यक्तीला ३९ बायका, ९४ मुलं आणि ३३ नातवंड आहेत!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

एकच मुल सुंदर फुल, ही कुटुंब नियोजनासाठी असलेली ओळ तुम्ही अनेकदा ऐकली असेल. तर त्याआधी तुम्ही एक किंवा दोन बस्स.. ची जाहिरात ९० च्या दशकात दुरदर्शनवर पाहिली असेल. तसंच लग्न ही सर्वसामान्य लोकांच्या जिवनात एकदाच येणारी घटना आहे. भारतात एकापेक्षा जास्त पत्नी राजे महाराजांच्या काळात होत असे. तसंच सध्या ही प्रथा फक्त आखाती देशात पहायला मिळते. असा आपला सर्वसाधारण समज आहे.

भारतापेक्षा जास्त लोकसंख्या असलेला देश म्हणून आपण चीनला ओळखतो. पण एका भारतीय व्यक्तीने चीन आणि आखाती देशांतील कुटुंब  व्यवस्थेला मागे टाकले आहे आणि त्यांच्याही पुढे त्याने आपला (म्हणजे त्याचा) रेकॉर्ड केला आहे.

 

Biggest Family in The World - InMarathi 1
ajabgjab.com

त्या व्यक्तीला ३९ बायका, ९४ मुलं आणि ३३ नातवंड आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे हे सर्व एकत्र नांदतात. एका चार मजली इमारतीत हे भले मोठ्ठे कुटुंब राहते. आश्चर्याची गोष्टं म्हणजे या गोजीरवाण्याघरात हे सर्व गुण्यागोविंदाने राहतात. भारतातील मिझोराम येथे बाकत्वांग या गावात झियोंन चाना यांचे हे भले मोठ्ठे कुटुंब राहते. या घरातील सर्व सदस्यांना शिस्तीत रहावे लागते. त्यांची सर्वात पहिली पत्नी संपूर्ण कुटुंबावर लक्ष ठेवून असते.

 

entertales.com

त्यांची पहिली पत्नी झाथीयांगी ही झियोंन पेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे. घरातील सर्व व्यक्ती तिच्या शब्दाला मान देतात असे ती अभिमानाने सांगते. झियोंन यांच्या धर्मामध्ये एकहून अधिक पत्नी ठेवणे वैध असल्याने त्यांनी इतकी लग्न केल्याचे सांगितले आहे. तसेच ते आपल्या ३९ बायकांना आळीपाळीने वेळ देतात. तर सर्वात नवीन पत्नी सर्वाधिक काळ त्यांच्या जवळ असते.

 

Biggest Family in The World - InMarathi 3
dailymail.co.uk

त्यांची सर्वात तरूण पत्नी रिंकिमिनी (३५ वर्षं) ही सांगते की, आम्ही सतत त्यांच्या अवती भवती असतो. ते आमच्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती आहेत. चाना व त्यांची भेट कशी झाली असे विचारले असता रिंकिमिनी ने सांगितले की 18 वर्षांपूर्वी त्यांनी मॉर्निंगवॉक दरम्यान बघितले. त्यानंतर त्यांनी रिंकिमिनीला प्रेमपत्र लिहले. त्यामध्ये त्यांनी रिंकिमिनीला थेट लग्नाची मागणी घातली होती. रिंकिमिनी ने त्यांना होकार दिला आणि त्यांचे लग्न झाले.  पुढे रिंकिमिनी म्हणतात की ते गावातील सर्वात हँडसम व्यक्ती आहेत.

 

Biggest Family in The World - InMarathi 4
procaffenation.com

चाना यांच्या एका नातवाने असे सांगितले की, त्याला त्याच्या आजोबांचा अभिमान आहे. त्यांनी गावातील गरीब महिलांशी लग्न करून त्यांना आधार दिला आहे. चाना यांची आणखी एक पत्नी हुन्थारांगांकी असं म्हणते की, आम्ही एक कुटुंब आहोत आणि आम्ही सर्व एकत्र गुण्यागोविंदाने राहतो. चाना यांनी एकाच वर्षात १० लग्न केली असून ते अजूनही लग्नासाठी उत्सुक आहेत. प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी असे सांगितले आहे की लग्नासाठी मुली बघायला ते अमेरिकेला देखील जाणार आहेत.

 

Biggest Family in The World - InMarathi 2
dailymail.co.uk

या गोजिरवाण्या घरात रात्रीचे जेवण संध्याकाळी ६ वाजता सुरू होते. चाना यांच्या सर्व बायका जेवण बनवतात. तर मुली घरातली लहान सहान कामं करतात. जियोन यांच्या सुना घरातील धुणीभांडी करतात. अशा प्रकारे घरचे कामकाज त्यांनी घरातील महिलांमध्ये विभागून दिले आहे.

 

Biggest Family in The World - InMarathi 6
entertales.com

चाना यांचे घर चार मजली असून त्यात १०० खोल्या आहेत. त्या घराचे नाव छौन थर रन म्हणजेच नवीन पिढीचे घर असं आहे. १६७ जणांच्या या कुटुंबाला खुराकही रोज तितकाच लागतो. चाना कुटुंबियांना एका दिवसाला ४५ किलो भात, २५ किलो ़डाळ, २० किलो फळं, ४० कोंबड्या आणि ५० अंडी रोज लागतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?