इंग्रजी शाळा + ब्रॅण्डेड लाइफस्टाईलचा “असा” हा परिणाम
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
टीप : सदर लेखाचे लेखक अज्ञात आहेत.
===
थोडंसं विचित्र वाटेल आणि पचणार ही नाही. पण पोरगं चांगलं निघावं असं वाटत असेल तर यापुढे त्याला जिल्हा परिषद, बीएमसी किंवा इतर कोणत्याही खाजगी माध्यमाच्या मराठी शाळेत किंवा निदान एसएससी बोर्डाच्या शाळेत टाका.
कारणं बरीच आहेत आणि नसेल पटत तर तुमचं नशीब तुम्हाला लखलाभ…!
अतिशय संताप आणणारे कृत्य करून एका पोलीस ऑफीसरच्या मुलाने आईच्या बॉडी शेजारी तिच्याच रक्ताने स्माईली काढून लिहले की,
मी हिला कंटाळलो होतो मला शोधा आणि लटकवा.

मला यात मुलाचा दोष काही वाटत नाही. कारण त्याने घेतलेल्या शिक्षणात वा संस्कारात त्याला चोरी करणारा मुलगा आईचा चावा का घेतो ही गोष्टच माहीत नाही. त्याचा शैक्षणिक बोर्ड चेक केल्यास लक्षात येईल की त्याच्यावर सीबीएससी आणि आयसीएससीचे संस्कार असतील.
तिथे माणुसघाणी आणि संस्कार नसलेली पिढी घडवण्याचे जोरदार काम सुरू आहे.
विकृत इतिहासासोबत आपल्या कल्चरचा द्वेष करायला लावणारे अभ्यासक्रम आहेत असे ऐकिवात आहे. पोराला चांगला माणूस नाही बनवत तर एक मार्केटिंग प्रॉडक्ट् बनवून बाहेर काढायची स्पर्धा लागलीये. त्याची फळं आज पालक भोगत आहेत.
जागीतिकीकरणामुळे आपल्या देशात बऱ्यापैकी पैसे आले आणि सर्वच क्षेत्रात ते पैसे पसरले. मागची पिढी हमखास एसएससी बोर्डात शिकली होती आणि त्यामुळे ती मराठीच्या तासाला धडे गिरवून वा कविता म्हणून तत्कालीन शिक्षकाकडून संस्कारक्षम झाली होती.
या पिढीने सेटल झाल्यावर नवीन स्वप्न पाहिली व आपल्या मुलांसह ते स्वत: न झेपणाऱ्या अघोषीत स्पर्धेच्या युगात उतरले व बरबाद झालेले दिसत आहेत.
ही नवी डेंजर पिढी निर्माण झालेली आहे. त्यांना अंतर्वस्त्रही हजारो रुपयांची लागतात. पैसे असतील तर त्यात काहीच गैर नाही पण मग बाहेरच्या कपड्यांचे विचारू नका. आपल्या आई बापाची वडापाव खायची मारामार होती वा तो घेताना दहा वेळा विचार करावा लागत असे हे त्यांना पटत ही नाही वा पचतही नाही.
त्यांना मॅक्डोनाल्ड, बर्गर किंग, सबवे आणि बीबीक्यू बरे वाटते, त्यात हजारो रुपयेही कमी पडतात.

बाप एकटा कमवत असेल तर त्याचा हे किस पाडतात. चार कोटीचा फ्लॅट असेल तर आपण गरीब आहोत याची त्यांना स्ट्रॉंग फिलिंग होते. मागच्या वर्षातले पुमा, नायके, रिबॉकचे शूज त्यांना फेकून द्यावेसे वाटतात.
–
दर वर्षी फॉरेन ट्रिप केली नाही तर त्यांची इज्जत कमी होते आणि काश्मीरला कष्ट सोसून नेले तर त्यांची गळचेपी होते. मेट्रो सिटीजची ही हालत आहे. हळू हळू हे लोण लहान शहरात पसरत चालले आहे.
सगळ्यात डेंजर आहे तो मोबाईल!

त्याने ३ x ६ इंचात यांना कैद करून ठेवले आहे. मैदानं ओस पडली आहेत आणि वेब वर्ल्ड बुलंद झाले आहे. बहिणाबाईंची कविता वाचून घडलेली आई यांना वेडी वाटते आणि ते तसे बिनधास्त लिहतही असावेत. ती बिचारी भावना घेऊन आपलं स्वप्न म्हणून त्या पोराकडे पाहते आणि त्याच्या भविष्यासाठी आपलं मन मारते.
आपल्या आई बापाने आपल्याला वेळ परत्वे झोडले होते आपण असे करायचे नाही या विचाराने हल्ली पालक मुलांना हातही लावत नाहीत आणि ती मात्र त्याच गोष्टीचा फायदा घेत चोऱ्या आणि वार करत आहेत? कोणाला घडवतो आहोत आपण आणि कशासाठी याचा काही अंदाज आहे का?
आज जेव्हा बातमी वाचली तेव्हा मन व्यथीत झाले आणि कठोरही झाले.
मी निष्ठुर झालो आहे. जसा त्या पोराने आईचा मर्डर केला, तसा तो जर स्वत:च फालतु गोष्टींच्या हट्टाने सुसाईड करून मेला असता तरी कोणी आश्चर्य बाळगायचे काही कारण नाही. कारण याला आता खूप उशीर झाला आहे. या समोर काऊन्सिलर आणि संत महंत ही काम करू शकणार नाहीत इतके हे भयानक प्रकार आहेत.
ब्रँडची स्पर्धा आहे त्यात कोट्यावधी जरी ओतले तरी कमी पडणार आहेत. पोरांच्या कलेने घेऊनही फायदा नाही आणि फरफटत जाऊनही फायदा नाही. एकच सांगता येऊ शकेल ते निष्ठुर झाले आहेत तर तुम्ही भावनाशील राहून काय उपयोग आहे?
तुम्ही निष्ठुर व्हा आणि त्यांना त्यांच्या वाटेला स्वावलंबनाने जाउ द्या. ते विकृत झालेत असे वाटले तर कायद्याचा आधार घ्या आणि त्यात संकोच बाळगू नका.
जी माऊली गेली तिने त्या पाल्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्या असणार आणि तीच्या अपेक्षाचे ओझे त्या मुलाला पेलले नाही. त्याला तुम्हीच असे गुंतवले आणि आता कुंथुन उपयोग काय?

एकच अपत्य असणाऱ्या कुटुंबात हे प्रमाण प्रचंड आहे. यांना शेअर करायचे नसते आणि असे आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम घेऊन आल्यावर हे पैश्यांसाठी पालकांचे लिलावही करू शकतील. कारण ही भूक मोठी लागलेली आहे आणि त्याची शांती कधीच होणार नाही. ही अशी उदा. पाहून असे वाटते की अपत्य जन्मालाच आली नाही तर बरी. निदान असा दाह तरी देणार नाहीत.
मी तर म्हणेन आताच म्हातारपणी एक काठी शोधून ठेवा. कारण तुमची लाठी तुमच्यावरच चालली तर?
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Sanskar shala nave tar parents kartat
Pan school mde frnds sobat rahun mulga bighdu shakto ..High class mulansobt rahun..
Sagrika tumhala jar asa vattay ki “Highclass ” mulan mule pora bighadtat tar tumchyasarkha gairsamaj konalach nai ae.
Crore madhye english medium chi pora baher padtat,pan saglech khuni nastat. Mulan kade laksha thevna hey aai vadilancha kaam asta.
Psychology pan ek mhatvacha bhag aahe,aan baherchya culture la shivya ghlnyapeksha ,mulanchya manat kai challay hey ka nai baghat?? Mulanche velevar samopadeshan ka nai karun ghet.Mental health cha stigma ka asava?? Evdhach mhanna ahe ki Mr.Kailas chi comment achuk aahe,tumchya values jar strong astil tar tumhala baherchya culture chi bhiti ajibat noko.
Very true… bcz shaalet mul khup kami vel astaat aani mahatvaach mhanaje aapan ghari aaplya 1 or 2 mulana naahi changale valan laau shakat tr school aani teachers kadun kaay apeksha thevayacha ki tyaani at a time 30-35 mulana sanskar aani shisht laavavi..
… संगतीचा परिणाम खूप होत असतो…. कुणाची संगत करावी हे मुलांना सांगितले तरी त्यांना सांगणार्याचा राग येईल… मातृभाषेतून शिक्षण द्यावे लागेल पाल्याना… संस्कृती टिकून राहील…
पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणाचे यापेक्षा वेगळा काय परिणाम असु शकतो.
फार पुर्वी गुरूकुल शिक्षण पद्धती होती तीथे राजाचा राजपुत्र आणि सर्व प्रजेची मुले एकाच ठिकाणी शिकत होती.यामागील मतीथार्त म्हणजे सुयोग्य संस्कारशील पिढी निर्माण करणे मग तो राजघराण्यातील असो किंवा सर्वसामान्य प्रजेचा परंतु इंग्रजांनी आपल्यावर राज्य करण्याच्या हेतूने गुरूकुलशिक्षण पद्धती मोडून काढून लाॅर्ड मॅकाॅले शिक्षण पद्धती आणली.तीचीच विषारी फळे आज आपण चाखत आहोत.
आपलाही एक काळ होता आपले शिक्षकवृंद १०० मीटरवर जरी दिसले तरी आपण गायब व्हायचो,एक भितीयुक्त आदर आपल्या गुरूंबद्दल आपल्या मनात होता.पण आत्ता यापैकी काय शिल्लक राहीले आहे?पुर्वी आपले मातापिता शिक्षकांना पुर्णपणे मोकळीक देवून आपल्या पाल्याला घडविण्यात सहकार्य करायचे आजचे पालक पोलिस स्टेशनचा रस्ता दाखवितात.संस्कारांची पातळी सगळ्यांचीच ढासळली आहे,याला कारणीभूत कोण आहे ? याचा खोलात जावून विचार करावयास हवा.
Mala watate Palak ani Mulatil Communication problem hoyalet yala he Mobile, TV Programs, Internet Seva yancha, mule changlya gosthisathi upyog karanat, yacha chukichya karanasathi wapar hot aahe yala English Medum kinva Marathi Medum Jababdar nahiye, Khara tar palakaane aplya palyana thoda jast vel deun apan swatha nirvesani rahun, apan changale waghun eak adarsh aaiwadil kase aahot he aplya mulana aplya kratitun dakhawave manje aple mulana atomatic changale sanskar changale walan lagatil ugach dusaryana dos dene he chukiche aahe…
Khare tar mala ase watate ki palakaanach sanskar rahile nahitar mule tarei kay karnar… so