‘डबल मिनिंग’ गाण्यांचं अभद्रायण :- कद्दू कटेगा तो सब मे बटेगा!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

टीप: प्रस्तुत लेखाचा विषय, संदर्भामुळे आलेली छायाचित्रं तुम्हाला अश्लील वाटू शकतात.

===

अश्लीलतेचं सुद्धा स्वतःचे एक व्याकरण असते. नियम, ठोकताळे, निषेध आणि संकेत असं इतर कला-साहित्य प्रकारातील सगळे निकष, अश्लील म्हणून जे काही आपण संबोधतो त्याला देखील लागू पडतात. किंबहुना ते नसतील तर अश्लील-द्वीअर्थी गोष्टीतील मजा येईनाशी होते.


मराठीत दादा कोंडके ह्यांनी हा आनंद आपल्याला दिला. तिकडे भारतीय म्हणून रसेल पीटर्स किंवा काही प्रमाणात  AIB ह्यात संचार करतात. आता दादाचं हे सीन बघा “ओ तुमच्या खालचा तो नळ सुरु करा”  ह्या वाक्याला त्यावेळी थेटरात खूप हसे मिळालेत. ह्यात नळ असलेल्या भिंतीवर बसलेला एक माणूस चित्रपटात दाखवल्याने हा सीन द्विअर्थी होऊन लोकांची गम्मत झाली.

dada kondke-marathipizza

स्रोत

ती गम्मत आनंद बक्षी च्या “चोली के पीछे क्या है” ला नाही. तिथे सरळ सरळ चोळी अपेक्षित आदि दृश्य होती. दादा कोंडके आणि गुलजार (!) ह्यावर खूप लिहिता येईल आणि आपण लिहू. अभद्रायण ह्या सदरात आपण अश्या अश्लील-द्विअर्थी हिंदी-मराठी गाणी ह्यांचा आस्वाद, शक्य तितक्या भद्र पणे घेणार आहोत.

त्याआधी काही गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. दृश आणि अदृश असे दोन, तीन अर्थ असणे आणि ते अगदीच स्पष्ट नसणे, ह्यामुळे अश्लीलतेला रसिकतेच्या वेटाळात प्रवेश मिळतो. समाजतील चर्चित तसेच फक्त पुरुषात बोलले जाणारे तर्क-मत-गैरसमज आणि पूर्वग्रह हे सुद्धा बरेचदा आपल्याला इथे लिहावे लागतील. त्यांचा विषयाशी संबंध लक्षात घेऊन लेखक किंवा प्रकाशक ह्यांच्या चारित्र्याशी थेट संबंध लावू नये.


तर, आजचे गाण- R..राजकुमार ह्या शाहीद-सोनाक्षी-प्रभू देवा ह्यांच्या सिनेमातील “कद्दू कटेगा तो सब में बटेगा” होय.

kaddu-katega-marathipizza

स्रोत

हा कद्दू कटेगा प्रकार तुम्ही फेमिनिस्ट असाल तर खूप त्रास देणारा ठरेल. ७ च्या आत घरात सिनेमा आठवतो? त्यात निशिकांत कामत ह्याचा व्हिलन? त्यांनी बलात्काराचे कोर्टात दिलेले समर्थन आठवते? ताट समोर वाढलेले होते…हेच ते!

एकदा उपलब्ध झाली की सर्वांना तिचा आस्वाद घेता येतो अश्या ह्या हिंदीतील म्हणीचा (कद्दू कटेगा तो सब में बटेगा) अर्थ! चित्रपटात सोनू सूद व्हिलन आणि अतिशय सूचक अशी रागिणी द्विवेदी ह्यांवर हे गाणे आहे. ८० मधील बांगो बांगो (मांगो मांगो) आठवते ? सिल्क स्मिता -शक्ती कपूर इत्यादी..तसेच  काहीसे हे गाणे..!


 

 

पण कद्दू कटेगा हा अर्थ ह्या व्हिलन आयटम सॉंंग प्रकाराच्या खूप पुढे जातो, तो त्याच्या lyrics/बोला मुळे! गाण्याच्या पहिल्या चार ओळी म्हणजे कोरसने  ४ वेळा “कद्दू कटेगा तो सब में बटेगा” हे ओळ म्हणत अंतरा मित्रा हिला पुढील ओळी गायला लीड करने

जो मनवाके संदूक में बन्दूक छुपाई के

नीयत में मोहब्बत कि ज़रा भूख मिलाई के

सुनसान से पिछवाड़े में जो तंग गली है

उस तंग से गलियारे में माशूक़ बुलाई ले

मैल तन के बदन से धुलेगी

आबरू के सिलाई खुलेगी

शर्म का भी लिफाफा फटेगा

kaddu-katega-marathipizza01

तुझ्या मनातील संदुकीत पडून असलेले जे विचार आहेत ते आणि तुझी “बंदूक” घेऊन ये आणि मग तुझ्या इराद्यात प्रेमाची भूक(का थुक?) मिसळ! बाकी माशुक वगैरे दोन ओळीत पिछवाडा आणि तेथील अरुंद गल्ली ह्यावर जमेल तशी तुकबंदी आहे.

नंतर शरीराचा मळ फक्त शरीरानेच धुतला जाईल असे ती म्हणते. पण हे आपण इतरत्र ऐकले आहे. पुढे मात्र सिलाई आणि लिफाफा ह्यावर केलेला द्विअर्थी प्रकार सरळ शब्दात सांगणे कठीण आहे. तुम्ही उत्तर भारतीय शिव्या आणि काम-प्रतिके ह्यांचे थोडे निरीक्षण केल्यास तुम्हाला ते कळेल. कौमार्य भंगावर  केलेला हा द्विअर्थ सेन्सर बोर्डाच्या लक्षात आला नसेल कदाचित! मग गाण्यात अजून थोडा डान्स होतो. नंतर-

रूखी है, ज़रा सूखी है

ज़मीन बरसों से जिसम की

बरसा दे, रस बरसा दे

मेरे होठों पे तू रंगीन

आज कर दे तू ऐसी तबाही

खाली होते ही पुरी सुराही

खुद ब खुद जो बढ़ा ले घटेगा

kaddu-katega-marathipizza02

स्रोत


ह्यात रुखी जमीन, होठ, बरसात हे हिंदी गीतातील नेहमीचे प्रकार आहेत. कहर केला तो शेवटच्या दोन ओळीत. तुझी सुराई रिती झाली की जे काही छोटे होईल (आकसून जाईल), ते तू तुझे वाढवून घे रे बाबा….! यावर काय बोलणार आपण? पण त्यावर देखील कडी करते ते शेवटचे कडवे..-

देसी हूँ, मुझे गटका ले

तुझे भुलवा दूँ विलैती

मुद्दे कि फिर बातें हो

बड़ी कर ली हैं बकैती

जैसे ही हो ख़तम काम तेतीस

होते होते छुआरे से किसमिस

नाम तू सिर्फ मेरा रटेगा

 

kaddu-katega-marathipizza03

स्रोत

इथे बाई म्हणजे देसी दारू, चिकन वगैरे प्रकार आपण करीना कपूर-सलमान ह्यांवर चित्रित दबंग २ मधील फेविकॉल से गाण्यात ऐकलेले आहे. तसाच प्रकार पहिल्या चार ओळीत आहे. मग आशिष पंडित हे ह्या गाण्याचे कवी म्हणतात- “तुझे काम संपत आले की …म्हणजे आजचा तुझा  शक्तीचा कोटा संपत आला की मी खात्री देतो की ह्या नंतर तू फक्त माझेच नाव (माझा संग) आठवत राहशील!”

पण हे म्हणताना पंडित साहेब खरोखर म्हणतात ते जरा वेगळे आहे. “खारकेचा किसमिस व्हायला लागला की…मग तुला काय ते कळेल आणि तिथून पुढे तू फक्त माझेच नाव घेशील!” ओर्ग्यास्म आणि त्यातील भौतिकता ह्याच्या इतके जवळ गुलजार नंतर हिंदीत हे पंडित साहेबच आलेले आहेत.


हे गाणे येथे पहा: बघताना lyrics आणि डान्स moves ह्यांच्या कडे पण लक्ष द्या.

 

 

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?