संपर्क तुटलेल्या सॅटेलाईटशी तब्बल २ वर्षांनंतर संपर्क जोडला गेला होता…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

१३० कोटी भारतीय ज्याकडे श्वास रोखून लक्ष ठेवून होते ते चंद्रयान २ काल चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून इतिहास घडवण्यास सज्ज झाले होते.

संपूर्ण देशाने इस्रोला शुभेच्छा दिल्या होत्या. इस्रोमधील अवकाश संशोधकांनी रात्रीचा दिवस करून अत्यंत मेहनत घेऊन अवघ्या ९७८ कोटी रुपयांत चंद्रयान -२ अवकाशात यशस्वीपणे प्रक्षेपित करून दाखवले होते.

चंद्रयान मोहिमेला जितका खर्च आला तो खर्च हॉलिवूडचा ऍव्हेंजर्स चित्रपट बनवण्यासाठी जितका खर्च आला होता, त्यापेक्षाही कमी आहे.

 

chandrayaan-1_759
The Indian Express

संपूर्ण जगाचे लक्ष चंद्रयान २ कडे लागले होते. चंद्रयान चंद्रापासून ३० ते ४५ मिनिट किलोमीटरच्या अंतरावर असताना सर्व प्रक्रिया सुरळीत सुरु होती. चंद्रावर उतरणे हे अत्यंत आव्हानात्मक काम सुरळीत पार पडणे महत्वाचे होते. संशोधकांपुढे सॉफ्ट लँडिंग दरम्यान विक्रम लॅन्डरचा वेग कमी करण्याचे सर्वात मोठे आव्हान होते.

विक्रम लॅन्डर चंद्रावर उतरण्यास सुरुवात झाली. ते चंद्राच्या पृष्ठभागापासून केवळ २.१ किलोमीटर अंतरावर होते आणि दुर्दैवाने तांत्रिक अडचणी आल्या आणि चंद्रावर उतरण्याच्या काही मिनिटे आधीच अगदी अखेरच्या क्षणी यानाचा संपर्क तुटला.

गेली तीन वर्षे आपले अवकाश संशोधक चंद्रयान २ यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेत होते. यानाशी संपर्क पुनःप्रस्थापित करण्यासाठी इस्रोने प्रयत्न सुरु केले. पण सध्या तरी यानाशी संपर्क प्रस्थापित होऊ शकलेला नाही. इस्रोमधील संशोधक जीवाचे रान करून नेमके काय बिनसले ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

 

vikram chandrayan 2 inmarathi

लोकांनी सुद्धा हे लक्षात घेणे आवश्यक आहे की अवकाश मोहीम यशस्वीपणे पार पडणे खूप अवघड आहे. अथांग आणि अफाट अवकाशात यानाचा संपर्क तुटणे हे काही पहिल्यांदाच घडलेले नाही.

नासाचे सुद्धा एक यान असेच अवकाशात हरवले होते आणि तब्बल दोन वर्षांनी नासाचा त्या यानाशी संपर्क जोडला गेला होता. त्यामुळे आपण अजूनही आशा ठेवायला हरकत नाही.

नासाचे STEREO म्हणजेच सोलर टेरेस्ट्रियल रिलेशन्स ऑबझर्व्हेटरी हे अवकाशयान सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात आले होते. २००६ साली दोन जवळजवळ एकसारखी याने सूर्याच्या कक्षेत पाठवण्यात आली होती.

 

stereo sateline a and b NASA inmarathi
NASA

ह्या यानामुळे सूर्याच्या स्टीरियोस्कोपिक प्रतिमा टिपणे आणि कोरोनल मास इजेक्शन ह्यांसारख्या अवकाशात घडणाऱ्या अभूतपूर्व घटनांचा अभ्यास करणे शक्य होणार होते.

२६ ऑक्टोबर २००६ रोजी Delta II 7925-10L ह्या रॉकेटद्वारे फ्लोरिडाच्या केप कॅनावेरल एअरफोर्स स्टेशनच्या लाँचपॅडवरून स्टीरियो हे अवकाशयान लंबवर्तुळाकार भौगोलिक कक्षेत प्रक्षेपित करण्यात आले होते. १५ डिसेम्बर २००६ रोजी ही दोन्ही याने “ग्रॅव्हिटी असिस्ट” साठी चंद्राच्या बाजूने गेली. दोन्हींच्या कक्षेत थोडा फरक होता.

जे A (अहेड) यान होते ते पृथ्वीच्या कक्षेच्या आत पण हीलियोसेंट्रिक (सूर्याच्या) कक्षेत सोडण्यात आले आणि जे दुसरे B (बिहाइंड) यान होते ते तूर्तास हाय अर्थ ऑर्बिटमध्ये सोडण्यात आले. ए ह्या यानाला एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी ३४७ दिवसांचा कालावधी लागणार होता तर बी ह्या यानाला एका प्रदक्षिणेसाठी ३८७ दिवस लागणार होते.

६ फेब्रुवारी रोजी ही दोन्ही याने अवकाशात एकमेकांपासून १८० डिग्रीच्या कोनात होती. त्यावेळी ह्या दोन्ही यानांद्वारे सूर्याच्या दोन्ही बाजू एकाच वेळेला दिसणे शक्य झाले होते.

असे इतिहासात पहिल्यांदाच घडले होते. सूर्याची प्रदक्षिणा करताना ह्या दोन्ही यानांनी सूर्याच्या सगळ्या बाजूंचे दर्शन अनेक वेळेला घडविले.

स्टीरियो ए आणि स्टीरियो बी ही दोन्ही याने सोलर कॉन्ज्युगेशन दरम्यान काम करू शकतील अशी डिझाईन करण्यात आली नव्हती. सोलर कॉन्ज्युगेशन म्हणजे यान व पृथ्वी ह्यांच्या मध्ये सूर्य येतो आणि त्यामुळे संपर्कात बाधा निर्माण होते. ह्यावेळी यान ऑटोमेशन मोड वर असले तरच ते काम करू शकेल.

दोन्ही यानांत एक कमांड लॉस टायमर यंत्रणा बसवण्यात आली होती. ही यंत्रणा ऑटोमॅटिक रिसेट बटन प्रमाणे होती. जर यानाला ७२ तासांसाठी रेडियो सायलेन्स दरम्यान काम करावे लागले तर हे कमांड लॉस टायमर ऍक्टिव्हेट होईल आणि कुठलाही कम्युनिकेशनचा प्रश्न आपोआप सोडवेल अशी ती यंत्रणा होती.

पण हे कमांड लॉस टायमर बदलता आले नाही आणि यान दर तीन दिवसांनी रिबूट होऊ लागले. असे सोलर कॉन्ज्युगेशन दरम्यान चार महिने चालले. खरं तर असे घडणेच चुकीचे आहे पण संशोधकांना वाटले की सोलर कॉन्ज्युगेशन नंतर प्रश्न सुटेल. म्हणूनच ह्याची टेस्ट घेण्यासाठी सोलर कॉन्ज्युगेशनच्या आधी रिसेट प्रोसेस तपासण्याची संशोधकांची योजना होती.

१ ऑक्टोबर २०१४ रोजी यानाचे ऑटोमेशन टेस्ट करण्यासाठी रिसेट करण्याची योजना आखण्यात आली होती.

ही प्रोसेस करण्यासाठी टीमने यानाशी तीन दिवस संपर्क ठेवला नाही. आणि स्टीरियो ए व बी ह्या दोन्ही यानांत कमांड लॉस टायमर ऍक्टिव्हेट झाले. स्टीरियो ए चे काम व्यवस्थित चालू राहिले पण स्टीरियो बी मध्ये मात्र समस्या उत्पन्न झाली. यान स्वतःलाच रोटेशनल स्पीड बद्दल चुकीची माहिती देऊ लागले आणि त्यामुळे यान स्वतःभोवती गरागरा फिरू लागले.

असे झाल्यामुळे सोलर पॅनेल्सद्वारे तयार होणारी वीज कमी पडू लागली आणि ट्रान्समीटर सुरु होऊ शकले नाही. त्यामुळे त्याचा पृथ्वीशी संपर्क तुटला.

नासाने त्यांचे डीप स्पेस नेटवर्क वापरून तुटलेला संपर्क पुन्हा जोडण्याचे खूप प्रयत्न केले. सुरुवातीला त्यांनी दर आठवड्याला हे प्रयत्न केले व नंतर दर महिन्याला त्यांनी विविध तांत्रिक क्लृप्त्या वापरून ,त्यांचे सगळे विज्ञान पणाला लावून संपर्क जोडण्याचा खूप प्रयत्न केला.

अखेर २२ महिन्यांच्या मेहनतीनंतर २१ ऑगस्ट २०१६ रोजी डीप स्पेस नेटवर्कने स्टीरियो बी ला २.४ तासांसाठी लॉक केले असता, अमेरिकेतील स्थानिक वेळेप्रमाणे रात्रीच्या दहा वाजून सत्तावीस मिनिटांनी, अवकाशात हरवलेले स्टीरियो बी परत नासाला गवसले आणि त्यांनी यानाशी परत संपर्क जोडला…!

संशोधकांनी जेव्हा ह्या घटनेचा आणि त्यांना मिळालेल्या टेलिमेट्रीचा अभ्यास केला तेव्हा त्यांनी असा निष्कर्ष काढला की हे यान हे दर सेकंदाला तीन डिग्री ह्या वेगाने अनियंत्रितपणे गरागरा फिरत होते.

तेव्हा रिऍक्शन व्हील्स वापरून यानाची फिरण्याची गती तत्क्षणी कमी करता येणे शक्यच नव्हते. कारण रिऍक्शन व्हील्स ओव्हरसॅच्युरेट झाले होते.

इंजिनिअर्सने यानातील दोष दूर करण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्याचे ठरवले होते. पण जेव्हा यानातील कंप्यूटर सुरु झाले तेव्हा इंजिनिअर्सकडे हा प्रश्न सोडवण्यासाठी जेमतेम दोन मिनिटांचा अवधी होता. त्यानंतर स्टीरियो बी परत फेल्युअर मोड मध्ये गेले.

परत जेव्हा कॉन्टॅक्टच्या वेळेला यानाला वीजपुरवठा सुरु झाला, तेव्हा त्याचे ओरिएन्टेशन बिघडले, पावर लेव्हल्स सुद्धा घसरल्या आणि यानाशी संपर्क पुन्हा तुटला.

२७ सप्टेंबर २०१६ ते ९ ऑक्टोबर २०१६ ह्या कालावधीत नासाने यानाशी संपर्क जोडण्याचे सहा वेळेला प्रयत्न केले. पण सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले. २३ सप्टेंबर २०१६ नंतर कुठलीही कॅरियर व्हेव डिटेक्ट झालेली नाही. यानाशी संपर्क तुटल्यानंतर चार वर्षांनी नासाने ह्या यानाच्या पिरियॉडिक रिकव्हरी ऑपरेशन्सना स्थगिती दिली.

stereo sateline NASA inmarathi
NASA

नासाला अवकाश संशोधनाचा इतका अनुभव असून, त्यांच्याकडे सुसज्ज यंत्रणा असून, डीप स्पेस नेटवर्क असून देखील त्यांचेही यान अवकाशात भरकटू शकते. त्यामुळे आपण वाईट वाटून घेण्यात अर्थ नाही. संशोधन करताना, प्रयोग करताना अपयश येऊ शकते.

अवकाश हे अज्ञात आहे, अथांग आहे. त्यामुळे तिथे काम करताना कुणालाही अगदी परफेक्ट अंदाज येणे अवघड आहे.

म्हणूनच आपण अजूनही आशा सोडायला नको. आपले अवकाश संशोधक त्यांचे संपूर्ण ज्ञान पणाला लावून चंद्रयान २ चे काय झाले हे नक्कीच शोधून काढतील अशी आशा ठेवायला हरकत नाही.

जरी शेवटच्या क्षणी तांत्रिक अडचणी उद्भवल्या असल्या आणि यानाशी संपर्क तुटलेला असला तरीही आपल्या अवकाश संशोधकांची मेहनत वाया गेलेली नाही. संपूर्ण देशाला आपल्या अवकाश संशोधकांचा अभिमान आहे आणि आज इस्रोच्या पाठीशी सगळे भारतीय ठामपणे उभे आहेत.

कुठलेही संशोधन करताना त्यात अपयश येण्याची शक्यता असतेच. त्यात अवकाशाचे नियम तर सर्वसामान्य मनुष्याच्या आकलनापलीकडचे आहेत. त्यामुळे चुकत चुकतच आपण शिकणार आहोत. त्यामुळे इस्रोच्या अवकाश संशोधकांना जरी आत्ता धक्का बसलेला असला ,त्यांचे दुःख अगदी स्पष्टपणे दिसत असले तरी त्यांनी धीर सोडून चालणार नाही.

कारण संपूर्ण देशाला त्यांची गरज आहे. आणि संपूर्ण देशाला त्यांच्या क्षमतांवर पूर्ण विश्वास ही आहे.

एक ना एक दिवस अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेले आपले अवकाश संशोधक ही मोहीम नक्कीच यशस्वी करून दाखवतील.

===

हे पण वाचा:

“आपला संपर्क तुटलाय, पण मी सुखरूप पोहोचलोय, काळजी नसावी” : चांद्रयानचं भारतीयांना पत्र…!

२०२२ साली भारतीय माणूस थेट अंतराळात जाणार – या भारतीय महिलेच्या जोरावर…!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

4 thoughts on “संपर्क तुटलेल्या सॅटेलाईटशी तब्बल २ वर्षांनंतर संपर्क जोडला गेला होता…!

  • September 7, 2019 at 4:04 pm
    Permalink

    खरंच मलाही असंच काहीसं वाटतंय.मागील वेळी पाणी आपण शोधलं पण क्रेडीट नासाने घेतलं.त्यापेक्षा संपर्क तूटला तर तूटला काम पूर्ण झाल्यानंतर परत प्रस्थापित होऊदे.म्हणजे कामही आपलं आणि क्रेडिट ही आपलंच

    Reply
  • September 8, 2019 at 8:02 am
    Permalink

    खरं आहे.इथपर्यंत पोहोचलो हेही कमी नाही..तांत्रिक अडचणी मुले संपर्क तुटला तो पुन्हा प्रस्थापित होऊ शकतो..फक्त स्वतःवर विश्वास हवा..त्यादृष्टीने प्रयत्न करत राहिले पाहिजे..प्रक्रियेचे विश्लेषण केले पाहिजे..
    हे काही पहिल्यांदा घडते आहे असे न्हवे..अपयश ही यशाची पायरी आहे…

    Reply
  • September 9, 2019 at 9:44 pm
    Permalink

    नमस्कार मी संदीप चव्हाण नाशिक शहरी परसबाग म्हणजे गच्चीवरची बाग या विषयावर काम करत आहे गारबेज टू गार्डन अशी संकल्पना असून ग्रो ॲंड गाईड हे मिशन हाती घेऊन काम करत आहे
    घरच्या घरी सहज सोप्या पद्धतीने रसायनमुक्त भाजीपाला कसा पिकवावा या विषयी मार्गदर्शन करत आहे

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?