गणपतीच्या उगमाचं शास्त्रीय विवेचन !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

हिंदू धर्मातील सर्वात महत्वाच्या अश्या गणेशोत्सव या सणाकडे केवळ परंपरा आणि श्रद्धेचा भाग म्हणून पाहिलं जातं. परंतु आजच्या विज्ञान युगातील पिढी आपल्या परंपरांवर, प्रचलित लोककथांवर विश्वास न ठेवता विज्ञानाचा आधार मागते. केवळ वडीलधारे सांगतात म्हणून या गोष्टी आम्ही का करायच्या असा प्रश्न उपस्थित करते व ते सिद्ध करण्याचे आव्हान देखील देते.

आपल्या हिंदू धर्मांतील ग्रंथ, साहित्यसंपदा यांमध्ये लिहून ठेवलेल्या गोष्टी केवळ भाकडकथा वा अंधश्रद्धा नसून त्याला वैज्ञानिक, शास्त्रीय व तात्त्विक आधार आहे हे आजच्या जगासमोर येणे गरजेचे आहे.

याच उद्देशाने, गणपतीमागचं गणेशशास्त्र काय सांगतं बघूया!

 

ganesha-orogin-marathipizza01

स्त्रोत

अवकाशाच्या अनंत उर्जेचे जो नियमन करतो तो गणपती. गणपती या शब्दाची फोड केल्यास दोन शब्द उत्पन्न होतात ‘गण आणि पती’.


गण म्हणजे समूह आणि पती म्हणजे प्रमुख वा अध्यक्ष.

म्हणजेच गणपती हा समूहाचा प्रमुख आहे. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये असे सांगितले आहे की हा शिवाचा पुत्र आहे व पार्वतीच्या अंगाच्या मळापासून गणेशाची उत्पत्त्ती झाली. पण यावर विश्वास ठेवणे थोड कठीणच, याचं काही ठिकाणी सांगितलं जाणारं शास्त्रीय/तार्किक उत्तर मात्र आपल्या मनातील सर्व शंका दूर करणार आहे.

शिवाची जी नृत्यमुद्रा आहे म्हणजेच शिवाचं जे तांडव आहे, ज्याला वैज्ञानिक भाषेत Cosmic dance म्हटले जाते.

या Cosmic dance मार्फत शंकराकडून अल्फा, बीटा गॅमा आणि अशी वेगवेगळ्या प्रकारचे rays येतात. शिवाचं हे तांडव म्हणजेच सूर्यावर उत्पन्न होणारी उर्जा आणि तेथून पृथ्वीवर फेकले जाणारे विविध rays.

dancing-shiva-inmarathi
ishtadevata.com

या सर्व rays अडवून वा नियंत्रित करून केवळ आवश्यक असणाऱ्या rays पृथ्वीवर पाठवण्याचे मुलभूत काम गणपती करतो. कारण या सर्व rays थेट पृथ्वीवर येऊ शकत नाही. त्यामुळे सजीव प्राण्यास धोका आहे. हे सर्व नियंत्रित करणाऱ्या गणपतीला म्हणूनच ‘जेष्ठराज्यंब्रह्मणाम’ असं पुराणात म्हटलं गेलयं. म्हणूनच गणपतीला अग्रस्थानी मानून त्याला पहिला मान दिला जातो.

 

ganesha-orogin-marathipizza02

स्त्रोत

शिवाचं तांडव ही काही सांगोपांग कथा नसून त्याला विज्ञानाच्या संकल्पनेचा आधार आहे.

म्हणजेच आपल्या पूर्वजांनी सूर्याला शिवाचं रूप दिलं आणि सूर्याच्या गर्भात होणाऱ्या उर्जा प्रक्रियेला ‘शिवतांडव’ असं म्हटलं.

amazon.com

त्यापासून पृथ्वीचे रक्षण करणाऱ्या घटकाला गणपतीचे रूप मानण्यात आले आणि तसे संदर्भ पिढ्यानपिढ्या पुढे ग्रंथांमध्ये आणि लोककथांमध्ये उमटू लागले.

या जगाचे प्रथम आणि अंतिम सत्य हे आहे की हे विश्व अणूपासून बनले आहे.

प्राचीन भारतीय शास्त्रात याच अनुला ‘गण’ म्हटले असल्याचे दिसते. म्हणजे सृष्टीचा प्रत्येक लहानात आणि मोठ्यात मोठा कण अणूने बनलेला आहे. अणूचे अस्तित्व शाश्वत आहे. आणि गणेश या अणूचे प्रतिनिधित्व करतो म्हणून तो सर्वव्यापी आहे.

कुणाला हे विचार कदाचित ‘वैज्ञानिक’ वाटणार नाहीत – पण हे विचार वैज्ञानिक बैठकीवर आधारित आहेत, हे मान्य करायला तरी अडचण नसावी!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Vishal Dalvi

Anything, Everything, Whatever I like, I don't wait..I Just write......

vishal has 70 posts and counting.See all posts by vishal

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *