' भारत-इस्त्रायल संबंध : “पॅन-इस्लामचा” चा अडथळा – InMarathi

भारत-इस्त्रायल संबंध : “पॅन-इस्लामचा” चा अडथळा

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

पंतप्रधान मोदी या तीन वर्षात जगभर फिरून आले पण ते इस्त्रायला गेलेले नाहीत.आता जून मध्ये त्यांचा हा दौरा प्रस्तावित आहे. ते जर या दौऱ्यावर गेले तर तिथे जाणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरतील.

mod-israel-visit-marathipizza
jpost.com

भारत-इस्त्रायल संबध फार जुने आहेत. तरीसुद्धा अजून एकही भारतीय पंतप्रधान तिथे गेला नाही याची कारणे भारताच्या सामाजिक वास्तवाशी निगडीत आहेत. विशेषतः मुस्लीम धर्मीय भारतीय यांच्याशी !

इस्लाम व यहुदी या दोन धर्माच्या ऐतिहासिक शत्रूत्वाची याला किनार आहे. भारतातील मुस्लीम समुदायाची असलेली लक्षणीय संख्या लक्षात घेऊन आणि आपल्या विजयातील त्यांच्या मताचे महत्त्व यामुळे याआधीच्या कुठल्याही सरकारने विशेषतः काँग्रेसने हे संबंध पडद्यावर आणण्याऐवजी पडद्यामागूनच चालवणेच पसंत केले होते. उत्तर प्रदेशातील निवडणुका आणि त्यातील मुस्लीम मतदारांची लक्षणीय संख्या पाहून मोदी यांनीही या निवडणुका होईपर्यत इस्त्रायलला जाणे टाळलेलेच होते. पण आता युपीतील निकालानंतर ते निर्धास्त झालेले आहेत.

असे ही हे मुस्लीम समुदायाला फार किंमत देतच नाहीत पण तरीसुद्धा ते नाराज होऊन एकत्रित होणार नाहीत याची खबरदारी म्हणून हा दौरा आतापर्यत टाळला असावा.

 

muslim-vs-israel-marathipizza
slate.com

आता दुसरी बाजू बघूयात.

इस्त्रायल आणि भारत यांचे घनिष्ट संबध आहेत. शेती, पाणी, सैन्य या क्षेत्रात दोन्ही देशात अतिशय व्यापक सहकार्य आहे. इस्त्रायलने या तिन्ही क्षेत्रात केलेल्या संशोधनाचा लाभ आपल्याला मिळतोय. भविष्यात मिळत राहील. यामुळे आज हा देश आपल्यासाठी महत्त्वाचा भागिदार आहे. मुस्लीम समाज यांच्या भावनांना आज भारतीय सरकारने किंमत देण्याची गरजही नाही. का द्याव्यात?

आजच्या नेशन स्टेटच्या जमान्यात पॅन-इस्लाम असेल, नाहीतर इतर कुठल्या समुदायाच्या धार्मिक मान्यता असतील – त्या पायी इस्त्रायलचा द्वेष करणे कुठूनही व्यवहार्य नाही.

इस्त्रायलने किती भारतीय मुस्लीमांना मारले? त्यांच्यावर किती हल्ले केले ? किती आणि कसा अन्याय केला? या तिन्ही प्रश्नांची उत्तरे “एकही नाही” असेच आहे. मग भारतीय राज्याच्या फायद्याचे असणारे संबध तुमच्या अवास्तव दबावामुळे संथ राहावेत हे कुठूनही न्यायोचित नाहीच. इस्त्रायल तिकडे फलीस्तानी प्रकरणात काय करतो – हा त्यांचा व फलीस्तानी मुस्लीमांचा प्रश्न आहे. इस्त्रायल पॅलेस्टाईनमध्ये किंवा अरबांशी कसे वागते याच्याशी भारतीय मुस्लिमांना काही देणे घेणे असण्याचं कारण नाही.

पण असे घडत नाही. ज्या इस्त्रायलचा यांना शून्य त्रास तो यांच्या लेखी शत्रू आणि ज्या सौदीमुळे पूर्ण जगात आग लागली तो यांच्या लेखी मित्र. विचारसरणीत असलेल्या मूलभूत दोषांमुळे हे घडत आहे.

 

pan-islamism-marathipizza
youtube.com

मी मागेच लिहलेले…भारतीय मुस्लीमांनी फक्त भारतापुरताच विचार करावा. पॅन इस्लामीझमच्या नादाला लागून आपल्या भूमिका ठरवू नयेत. यामुळे त्यांचेच नुकसान जास्त आहे. जर ते याला चिकटून राहिलेत, तर जगातील कुठल्याही मुस्लीमाने केलेल्या चुकीच्या कृतीची जबाबदारीही त्यांना घ्यावी लागेल/त्यांच्यावर टाकली जाईल. त्यामुळे फक्त भारतीय म्हणूनच राहणे त्यांना जास्त फायद्याचे आहे.

याला अजूनही एक किनार आहे अरब राष्ट्रे .भारताला या देशांच्या प्रतिक्रियेची भिती वाटते. पण १९८२ साली मुंबईतील इस्त्रायलचे काउन्सिल जनरल योसेफ हास्टिन यांनी मुलाखातीत याबद्दल भारत सरकारचे चांगले वाभाडे काढलेले. ते म्हणाले होते,

मोशे दायान गुप्तवेशात का आले, मला ठाऊक नाही. बहुधा तुमच्या अरब मित्रांचा तुमच्यावर रोष नको म्हणून असेल. पण यात गुन्हा काय आहे? आम्ही काही डाकू -चोर नाहीत. तुम्हाला आमचे सगळे पटावे असेही नाही. तुमचे पाकिस्तान विषयक धोरण आम्हांला पटत नाही. तुम्ही सिक्किमला काय वागणूक दिलीत किंवा गोवा कसा घेतलात, याविषयी आमची मते निराळी असू शकतात. आम्ही एकच समजतो, तुमच्या हिताचे असेल ते तुम्ही केलेत. तुमचे राजकारणी लोक अरबांना भितात. त्यांना भिती वाटते की इराक कंत्राटे रद्द करील. सौदी अरेबिया मजूर घेणे बंद करील. तुम्ही अरबांना खूश करण्यासाठी पाकिस्तानशी स्पर्धा करीत असता की,अधिक इस्त्रायल विरोधी कोण? आम्ही तुम्हाला अरबांशी संबध तोडायला सांगत नाही, पण आमच्याशीही चारचौघासारखे संबध ठेवा एवढीच अपेक्षा आहे.

india-israel-marathipizza
unitedwithisrael.org

या मुलाखतीत प्रखर सत्य सांगितल्याबद्दल मग भारत सरकारने योसेफ यांची हकालपट्टी केली. थोडक्यात भारत -इस्त्रायल संबध हे अरब व स्थानिक मुस्लीम यांच्या भयाच्या प्रभावाखालून काढण्याची संधी मोदी यांना मिळालेली आहे. आज अरब राष्ट्रे व भारतीय मुस्लीम सरकारला यावरून ब्लॅकमेल करावे या स्थितीत नाहीत. जे भारताच्या फायद्याचे तेच सरकारने करणे अपेक्षित असते, इस्त्रायलचे सैन्य सहकार्य आपल्यासाठी आजच्या या असुरक्षिततेच्या काळात महत्वपूर्ण आहे. त्यामुळे इस्त्रायलबाबतीत असलेली ही मुढता सोडून देणेच भारतीय राज्याच्या फायद्याचे आहे.

यासाठी त्या फलिस्तीनी मुस्लीमांना बळी द्यावे लागले तरी दिले पाहिजे, ते आपले कुणी लागत नाहीत. आपण फक्त आपला फायदा बघितला पाहिजे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Shivraj Dattagonde

लेखक राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक आहेत.

shivraj has 25 posts and counting.See all posts by shivraj

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?