“प्रिये” ट्रेंड मागची प्रेरणा तुम्हाला माहितीये का? वाचा!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===


सध्या सोशल मीडिया वर “प्रिये” हॅशटॅग चा धिमाकूळ सुरू आहे. दोन ओळींच्या ह्या खुमासदार पोस्ट्स ओठांवर हसू आणल्याशिवाय रहात नाहीत.

“मी अमुक अमुक आणि तू तमुक तमुक तमुक #प्रिये”

– अश्या फॉरमॅट मधील ह्या कविता तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसांच्या डोक्यातील खट्याळ क्रियेटीव्ह माणूस झकासपैकी बाहेर काढत आहेत. 😀 तुम्ही ह्या पोस्ट्स वाचल्या असतीलच…तरी सध्या गाजत असलेल्या काही मोजक्याच, निवडक पोस्ट्स पुढे देत आहोत –

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अर्थात – ह्या प्रियेच्या भडिमाराने काही लोक ह्यावर वैतागले देखील आहेतच…त्यांनी देखील आपला राग व्यक्त केलाय…

 

 

 

असो…!

तर ह्या “प्रिये” ट्रेंड ची सुरूवात कुठून झाली असावी? किंवा, अधिक योग्य शब्दांत – ह्या ट्रेंडची प्रेरणा काय असावी – हा प्रश्न अनेकांना पडला असेल. सोशल मीडियावर आपल्या लेखनासाठी प्रसिद्ध असणारे, अनेक ऐतिहासिक महापुरूष आणि घटनांवर सुरेख व्याख्यान देणारे श्री विक्रम एडके ह्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवर ह्या ट्रेंडच्या प्रेरणेचं मूळ सांगितलं आहे. नक्की वाचा…!

===

सध्या सगळीकडे “प्रिये”च्या कवितांचा धिंगाणा सुरु आहे. जो उठतोय तो आपापल्या वकूबाप्रमाणे या ट्रेण्डपाठी धावतोय. कधीतरी, कुणीतरी एखादी ओळ पोस्ट केली असेल आणि बघता बघता वणव्यासारखा हा ट्रेण्ड फेसबुकवरच्या मराठी वर्तुळात पसरला. तो कुणी सुरु केला, मला माहिती नाही. पण तुम्हांला एक माहितीये का, या ट्रेण्डचं मूळ काय आहे? या ट्रेण्डच्या मुळाशी आहे, एक हिंदी हास्यकविता! ही कविता मी गेली ७-८ वर्षं कुठे ना कुठे पाहातोय. लिहिली कुणी, माहिती नाही. पण ज्याने कुणी लिहिलीये, तो अतिशय प्रतिभावंत असला पाहिजे, हे नक्की!! कवितेतले शब्द तर दिलखेचक आहेतच, पण त्याची खरीखुरी हुकलाईन कॅची आणि सोबत अर्थपूर्णसुद्धा आहे.

कवी म्हणतो, “मुश्क़िल है अपना मेल प्रिये, यह प्यार नहीं है खेल प्रिये”!


उपरोक्त ट्रेण्ड फॉलो करणाऱ्यांपैकी अनेकांशी बोललो मी, पण कुणालाच ही मूळ कविता ठाऊक नव्हती. त्यामुळे त्यांच्यासाठी आणि काव्यात रस असणाऱ्या इतरांसाठीही ती संपूर्ण कविता इथे पोस्ट करतोय. वाचा. आनंद घ्या. ट्रेण्ड फॉलो करताय, तर मूळचे काव्यही माहिती करुन घ्या!!

तर सिच्युएशन अशी आहे की, हिंदीभाषिक पट्ट्यातला एक खेडवळ पोरगा पहिल्यांदाच मुंबईला काम शोधायला गेलाय. हा आपला हिरो! हिरो गबाळा आहे. मुंबईतली चमकधमक पाहून बुजलाय, बावरलाय. दैववशात तो एका मुंबईकर रमणीच्या प्रेमात पडतो. पोरगी नुसती नावालाच मुंबईकर आहे, आतून मात्र पक्की “बॉम्बे-गर्ल”! ती सुंदर, मॉड, कॉन्फिडंट अशी फॅशनिस्टा, तो आपला गावठी हिरो. तो प्रयत्न करतो, पण हे सालं काही आपल्याच्याने जमणार नाही, हे त्याच्या लक्षात येतं आणि तो तिला एक पत्र लिहितो. पत्रात काय लिहितो?

वाचा —

“तुम एम ए फ़र्स्ट डिवीज़न हो, मैं हुआ मैट्रिक फेल प्रिये,
मुश्किल है अपना मेल प्रिये, ये प्यार नहीं है खेल प्रिये,
तुम फ़ौजी अफ़सर की बेटी, मैं तो किसान का बेटा हूँ,
तुम राबड़ी खीर मलाई हो, मैं तो सत्तू सप्रेटा हूँ,

तुम ए. सी. घर में रहती हो, मैं पेड़ के नीचे लेटा हूँ,
तुम नई मारुति लगती हो, मैं स्कूटेर लंबरेटा हूँ,
इस कदर अगर हम चुप-चुप कर आपस मे प्रेम बढ़ाएँगे,
तो एक रोज़ तेरे डैडी अमरीश पुरी बन जाएँगे,

सब हड्डी पसली तोड़ मुझे भिजवा देंगे वो जेल प्रिये,
मुश्किल है अपना मेल प्रिये, ये प्यार नहीं है खेल प्रिये,
तुम अरब देश की घोड़ी हो, मैं हूँ गदहे की नाल प्रिये,
तुम दीवाली का बोनस हो, मैं भूखो की हड़ताल प्रिये,

तुम हीरे जड़ी तश्तरी हो, मैं almuniam का थाल प्रिये,
तुम चिक्केन-सूप बिरयानी हो, मैं कंकड़ वाली दाल प्रिये,
तुम हिरण-चौकरी भरती हो, मैं हूँ कछुए की चाल प्रिये,
तुम चंदन वन की लकड़ी हो, मैं हूँ बबूल की छाल प्रिये,

मैं पके आम सा लटका हूँ, मत मारो मुझे गुलेल प्रिये,
मुश्किल है अपना मेल प्रिये, ये प्यार नहीं है खेल प्रिये,
मैं शनी-देव जैसा कुरूप, तुम कोमल कन्चन काया हो,
मैं तन से मन से कांशी राम, तुम महा चंचला माया हो,

तुम निर्मल पावन गंगा हो, मैं जलता हुआ पतंगा हूँ,
तुम राज घाट का शांति मार्च, मैं हिंदू-मुस्लिम दंगा हूँ,
तुम हो पूनम का ताजमहल, मैं काली गुफ़ा अजन्ता की,
तुम हो वरदान विधता का, मैं ग़लती हूँ भगवांता की,

तुम जेट विमान की शोभा हो, मैं बस की ठेलम-ठेल प्रिये,
मुश्किल है अपना मेल प्रिये, ये प्यार नहीं है खेल प्रिये,
तुम नई विदेशी मिक्सी हो, मैं पत्थर का सिलबट्टा हूँ,
तुम ए के-सैंतालीस जैसी, मैं तो इक देसी कट्टा हूँ,

तुम चतुर राबड़ी देवी सी, मैं भोला-भाला लालू हूँ,
तुम मुक्त शेरनी जंगल की, मैं चिड़ियाघर का भालू हूँ,
तुम व्यस्त सोनिया गाँधी सी, मैं वी. पी. सिंह सा ख़ाली हूँ,
तुम हँसी माधुरी दीक्षित की, मैं पुलिसमैन की गाली हूँ,

कल जेल अगर हो जाए तो दिलवा देना तुम बेल प्रिये,
मुश्किल है अपना मेल प्रिये, ये प्यार नहीं है खेल प्रिये,
मैं ढाबे के ढाँचे जैसा, तुम पाँच सितारा होटल हो,
मैं महुए का देसी ठर्रा, तुम रेड-लेबल की बोतल हो,

तुम चित्र-हार का मधुर गीत, मैं कृषि-दर्शन की झाड़ी हूँ,
तुम विश्व-सुंदरी सी कमाल, मैं तेलिया छाप कबाड़ी हूँ,
तुम सोने का मोबाइल हो, मैं टेलीफ़ोन वाला हूँ चोँगा,
तुम मछली मानसरोवर की, मैं सागर तट का हूँ घोंघा,

दस मंज़िल से गिर जाऊँगा, मत आगे मुझे धकेल प्रिये,
मुश्किल है अपना मेल प्रिये, ये प्यार नहीं है खेल प्रिये,
तुम सत्ता की महारानी हो, मैं विपक्ष की लाचारी हूँ,
तुम हो ममता-जयललिता जैसी, मैं क्वारा अटल-बिहारी हूँ,


तुम तेंदुलकर का शतक प्रिये, मैं फॉलो-ओन की पारी हूँ,
तुम getz, matiz, corolla हो मैं Leyland की लॉरी हूँ,
मुझको रेफ़री ही रेहने दो, मत खेलो मुझसे खेल प्रिये,
मुश्किल है अपना मेल प्रिये, ये प्यार नहीं है खेल प्रिये,

मैं सोच रहा की रहे हैं कब से, श्रोता मुझको झेल प्रिये,
मुश्किल है अपना मेल प्रिये, ये प्यार नहीं है खेल प्रिये!!

ही ती मुळची कविता.

तिच्या काही काही संदर्भांवरुन दिसतंय की ती किमान दशकभरापूर्वीची तरी आहे. कवी माहिती नाही, पण शेवटच्या ओळीवरुन कळतं की, ती कुणा हास्यकवीने कविसंमेलनासाठी लिहिली असावी. जे काही आहे, ते जबरदस्त आहे. बिचाऱ्या कवीला काय ठाऊक की इतक्या वर्षांनंतर त्याच्या कवितेवर आधारित ट्रेण्ड महाराष्ट्रात लोकप्रिय होणार आहे ते! खरं तर ही बाब कवीच्या शब्दसामर्थ्याची आणि प्रतिभेची अवचित मिळालेली पावतीच म्हणायला हवी! अश्या त्या कवीला प्रणाम आणि सदर ट्रेण्ड चालवणाऱ्या समस्त बहाद्दरांनाही प्रणाम!!

— © विक्रम श्रीराम एडके.

===

तर असं आहे हे…! विक्रम जींची मूळ पोस्ट वाचण्यासाठी इथे क्लिक करा.


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?