या एकाच इंग्रजाने राणी लक्ष्मीबाईला “प्रत्यक्ष” बघितले होते

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

‘खूब लडी मर्दानी वो झांसी वाली रानी थी’… कवितेच्या या ओळी आपल्यापैकी प्रत्येकाने शाळेत असताना गायल्या आहेत. जेव्हा केव्हा १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामची गोष्ट निघते तेव्हा सर्वात पहिले जर कुठलं नाव आठवत तर ते म्हणजे ‘राणी लक्ष्मीबाई’. त्यांच्या बाबतीत एक असा दावा करण्यात येतो आहे की, राणी लक्ष्मी बाईंना केवळ एकच इंग्रज बघू शकला होता.

InMarathi Android App

 

rani lakshmibai-inmarathi02
news18.com

काय आहे हा दावा आणि ती व्यक्ती कोण? वाचा सविस्तर माहिती…

ऑस्ट्रेलियाचे जॉन लँग हे ब्रिटनचे रहिवासी होते. तरी ते त्यांच्याच सरकार विरोधात म्हणजेच ब्रिटन सरकार विरोधात केस लढायचे. राणी लक्ष्मीबाई यांनी जॉन लँग यांना त्यांची केस लढण्यासाठी नियुक्त केले होते.

 

john lang-inmarathi03
writerjohnlang.blogspot.in

२८ एप्रिल १८५४ ला जेव्हा राणी लक्ष्मीबाईंना मेजर एलिस यांनी किल्ला सोडण्याचा फर्मान सुनावला. तेव्हा राणी लक्ष्मीबाई या त्यांच्या किला सोडून दुसऱ्या महालात राहायला लागल्या. पण त्यांना त्यांचा किल्ला परत हवा होता. त्यामुळे त्यांनी इंग्रजांच्या विरोधात केस लढण्याचा निर्णय घेतला. कारण त्यांना ती केस ब्रिटन येथे लढायची होती आणि त्यासाठी ब्रिटन विरोधात लढणारा एखादा वकील हवा होता. त्यासाठी त्यांनी इंग्रजांच्या विरोधात असणाऱ्या जॉन लँग यांची निवड केली आणि लँग यांना सोन्याच्या पट्टीवर पत्र लिहून भेटायला येण्याचे निमंत्रण पाठवले.

 

john lang-inmarathi02
hindustantimes.com

 

जेव्हा त्यांना राणीने भेटण्याकरिता पत्र पाठवले तेव्हा ते भारतातच आग्रा येथे होते. त्यांना आग्रा ते झांसी येण्याकरिता २ दिवस लागले होते. जॉन लँग यांनी त्यांच्या पूर्ण भारत यात्रेला एका पुस्तकात उतरवले. यात त्यांचा आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या भेटीचा उल्लेख आहे. जॉन लँग यांच्या या पुस्तकाच नाव ‘वांडरिंग्स इन इंडिया’ हे आहे.

 

john lang-inmarathi
booklahar.com

 

लँग हे आग्रा ते ग्वालियर आले आणि तेथून राणीने पाठवलेल्या शानदार घोडागाडीने त्यांनी झांसी पर्यंतचा प्रवास केला. त्या गाडीत हात पंखे होते आणि त्या घोडा-गाडीचे घोडे हे फ्रेंच घोडे होते. ते झांसी येथे पोहोचल्यावर तेथील लोकांनी त्याचं कश्याप्रकारे स्वागत केल, राणीच्या महालात जाण्याआधी त्यांना बूट काढण्यात सांगितल्या गेले, कशी दामोदर यांच्याशी त्यांची पहिली भेट झाली, हा इतिवृत्तांत त्यांनी त्यांच्या या पुस्तकात दिला आहे.

 

john lang-inmarathi01
amarujala.com

राणी लक्ष्मीबाई यांनी जॉन यांना महालाच्या वरच्या खोलीत बोलावले. राणी  आणि जॉन यांच्यामध्ये एक पडदा होता. ज्यातून राणींचा चेहरा जरा देखील दिसत नव्हता. तेव्हा अचानक राणीचा दत्तक पुत्र दामोदर राव यांनी पडदा बाजूला केला आणि जॉन यांना राणींचे दर्शन घडले.

 

rani lakshmibai-inmarathi
wittyfeed.com

 

जॉन लँग हे राणीला बघून एवढे प्रभावित झालेत की, ते राणीला म्हणाले,

“if the Governor-General could only be as fortunate as I have been and for even so brief a while, I feel quite sure that he would at once give Jhansi back again to be ruled by its beautiful Queen.”

जॉन लँग त्यांच्या पुस्तकात राणी बद्दल लिहितात की,

‘महाराणी या साधारण उंची, साधारण शरीरयष्टी आणि गोल चेहरा असलेली एक खूप सुंदर महिला होती. त्यांचे डोळे तेजस्वी तर त्यांचे नाक खूप रेखीव होते. त्यांचा रंग खूप गोरा किंवा खूप सावळा नव्हता, त्यांच्या कानात कानातल होत त्या व्यतिरिक्त आणखी कुठलाच दागिना नव्हता, त्यांनी पांढऱ्या रंगाचे मखमली कपडे नेसले होते. त्या खरच खूप सुंदर होत्या. पण त्यांच्या या सुंदरतेत एकच अडचण होती आणि ती म्हणजे त्यांचा आवाज. त्यांचा आवाज खूप जड होता. पण त्या एक प्रभावशाली आणि समजूतदार  महिला होत्या.’

जॉन लँग व्यतिरिक्त इंग्रज सर रोबर्ट हॅमील्टन यांनी देखील राणीला बघितलं असल्याच सांगितल्या जातं, पण त्याबद्दल कुठलाही ठोस पुरावा किंवा त्याचा कुठेही उल्लेख आढळून आलेला नाही.

२०१४ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील लँग यांचा उल्लेख केला होता. लँग यांनी राणींना केलेल्या मदतीमुळे भारत-ऑस्ट्रेलियाचे संबंध मजबूत होण्यास देखील मदत झाली.

 

modi-australia-visit-inmarathi
sampspeak.in

प्रसिद्ध लेखक रस्किन बॉन्ड यांनी १९६४ साली जॉन लँग यांची कबर मसुरी येथे शोधली होती. त्यानंतरच भारतीय लोकांना लँग बद्दल माहित झाल होतं.

जॉन लँग यांनी रणींना त्यांच्या कठीण काळात मदत केली तसेच त्यांनी त्यांच्या पुस्तकात राणींच जे वर्णन केल आहे त्यामुळे आज भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला राणी लक्ष्मीबाई यांच्या शूर व्यक्तित्वाची दुसरी बाजू समजली… त्यासाठी जॉन लँग यांचे आम्ही आभार मानतो…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

One thought on “या एकाच इंग्रजाने राणी लक्ष्मीबाईला “प्रत्यक्ष” बघितले होते

  • November 1, 2018 at 11:02 pm
    Permalink

    अप्रतिम लेख आवडला

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *