सामान्य पालकांना कर्जबाजारी करतील अश्या भारतातील “अतिमहागड्या” शाळा

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आपल्या मुलाने उत्तम शिक्षण घेऊन स्वत:चं जीवन स्वत: घडवावं आणि जीवनात यशस्वी व्हावं, ही प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. पण गेल्या काही काळात पालकांच्या मनात एक असा समाज निर्माण झालाय की जेवढ्या प्रसिद्ध आणि महागड्या शाळा तेवढं तिथे उत्तम शिक्षण मिळतं, म्हणून आजकाल ऐपत नसली तरी कर्ज काढून पालकांचा कल मुलांना इंग्रजी माध्यमांच्या महागड्या शाळांमध्ये घालण्याचाच असतो. काही शाळांची फि १ लाख असते तर काहींची २ लाख! तरी या शाळा इतर काही अति-महागड्या शाळांच्या तुलनेत बऱ्याच स्वस्त म्हणाव्या लागतील. आज आम्ही तुम्हाला भारतातील काही अश्याच अतिमहागड्या शाळांबद्दल माहिती देणार आहोत ज्यांची फि तब्बल ५-१० लाखांच्या आसपास आहे. अहो एवढा तर मध्यमवर्गीय माणसाचा वर्षाचा पगार देखील नसतो.

डून स्कूल, देहरादून

doon-school-marathipizza
euttaranchal.com

भारतातील टॉप स्कूल्स मध्ये या शाळेचा क्रमांक बराच वरचा आहे. १९२९ साली देहरादूनच्या निसर्गरम्य डून खोऱ्यामध्ये या शाळेची स्थापना करण्यात आली होती. ही शाळा केवळ मुलांसाठी आहे, मुलींना इथे प्रवेश नाही. या शाळेची वार्षिक फि ९.७ लाख रुपये इतकी आहे. सोबत २५ हजार टर्म फि आहे. अॅडमिशनच्या वेळी येथे ३.५० लाख रुपये सिक्युरिटी म्हणून जमा करावे लागतात. जे रीफंडेबल असतात. येथे केवळ श्रीमंतांचीच मुले शिकायला येतात, कारण एवढी फि त्यांनाच परवडू शकते. या शाळेमध्ये राहुल गांधी, राजीव गांधी तसेच हिरो ग्रुपचे सुनील मुंजाल आणि पवन मुंजाल यांनी शिक्षण घेतले आहे.

 

सिंधिया स्कूल, ग्वाल्हेर

Scindia-school-marathipizza
scindia.edu

१८९७ साली ग्वाल्हेर मध्ये सिंधिया स्कूलची स्थापना करण्यात आली. तेव्हाचे महाराज माधवराव सिंधिया यांनी ही शाळा उभारली होती. या शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा असले तर वर्षाला ७.७० लाख रुपये इतकी फि द्यावी लागते. अनेक बॉलीवूड स्टार्सनी या शाळेमध्ये शिक्षण घेतले आहे. त्यापैकी सलमान खान आणि अनुराग कश्यप यांची नावे आघाडीने घेतली जातात. तसेच रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक यांनी देखील याच शाळेमधून आपले शिक्षण पूर्ण केले होते.

 

मायो कॉलेज, अजमेर

Mayo_College-marathipizza
dailymail.co.uk

राजस्थानच्या अजमेर मध्ये स्थित असणारे हे शाळा-कॉलेज म्हणजे एक ब्यॉयज रेसिडेंशियल पब्लिक आणि बोर्डिंग स्कूल आहे. १८७५ साली ही शाळा बांधण्यात आली होती. भारतातील अतिशय जुन्या बोर्डिंग स्कूल्स मध्ये या शाळेचा क्रमांक लागतो. शाळेच्या कॅम्पसमध्ये ९ होल गोल्फ कोर्स आणि पोलो ग्राउंड देखील आहे. या शाळेची वार्षिक फि जवळपास ५.१४ लाख रुपये इतकी आहे.

 

इकोल मोंडिएल वर्ल्ड स्कूल, मुंबई

ecole-mondiale-school-marathipizza
tedxgatewaychange.wordpress.com

ही शाळा मुंबई मधील सर्वात प्रतिष्ठीत शाळांपैकी एक आहे. ही शाळा IB प्रायमरी ईयर्स प्रोग्राम, मिडल ईयर्स प्रोग्राम आणि डिप्‍लोमा प्रोग्राम ऑफर करते. ९ वी आणि १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी ही शाळा IGCSE देखील ऑफर करते. या शाळेची वार्षिक फि आहे १०.९ लाख रुपये!

 

वेलहम बॉय्ज स्कूल, देहरादून

Welham-Boys’-School-marathipiza
dehradun.locanto.net

ही शाळा तब्बल ३० एकर मध्ये पसरलेली आहे. या शाळेची वार्षिक फि ५.७ लाख रुपये इतकी असून ट्युशन आणि इतर सुविधांसाठी अधिकचे १ लाख रुपये द्यावे लागतात. येथून अनेक मोठ्या नेत्यांनी शिक्षण घेतलेले आहे. ज्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर, ओडीसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि विक्रम सेठ यांचा समावेश आहे. संजय गांधी यांनी देखील येथूनच शिक्षण घेतले होते.

 

वुडस्टॉक स्कूल, मसुरी

woodstock-school-marathipizza
storypick.com

हे एक को-एड बोर्डिंग स्कूल आहे. मसुरी स्थित या शाळेमधून अभिनेता टॉम अल्टर आणि लेखिका नयनतारा सहगल यांनी शिक्षण घेतले आहे. या शाळेची वार्षिक फि १५.९ लाख रुपये असून अॅडमिशनच्या वेळी अधिक ४ लाख रुपये द्यावे लागतात. जे नॉन रीफंडेबल असतात.

 

गुड शेफर्ड स्कूल, उटी

good-shephard-marathipizza
goodshepherdtvm.org

निलगिरी पर्वतासारख्या ठिकाणी स्थित ही शाळा म्हणजे एक फुल टाईम रेसिडेंशियल स्कूल आहे. या स्कुलचे कॅम्पस ७० एकरमध्ये पसरलेले आहे. या शाळेची वार्षिक फि १० लाख रुपये इतकी आहे.

या शाळांच्या फि अतिशय जास्त आहेत कारण येथील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा उच्चतम आहेत. पण ज्ञानाच्या मंदिरामध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा महत्त्वाच्या का त्यांना मिळणाऱ्या शिक्षांची गुणवत्ता महत्त्वाची हा प्रश्न उरतोच..!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?