USB वरचा हा symbol आपल्या रोज नजरेस पडतो, पण त्यामागचा अर्थ काय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

एखादी विशिष्ट आणि महत्त्वाची गोष्ट समजावून सांगायची असल्यास symbol चा वापर केला जातो. अश्या महत्वाच्या गोष्टी दर्शवणारे अनेक symbol आपण अनेक गोष्टींवर पाहत असतो. असाच एक symbol आपल्याला नजरेस पडतो USB  (Universal Serial Bus) वर!

हे symbol काहीसं त्रिशूळासारखं दिसतं. या symbol मागे देखील एक कहाणी आहे. चला जाणून घेऊया या symbol मागचा अर्थ!

 

usb-symbol-marathipizza02
स्रोत


पाहायला गेलं तर हा  symbol फक्त USB वरच असतो असं नाही, तर इतरही अनेक इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेजवर पाहायला मिळतो. या symbol मागे कोणतेही अधिकृत असे कारण नाही, पण त्या संदर्भात आजवर अनेक सिद्धांत मांडले गेले आहेत.

usb-symbol-marathipizza01

स्रोत

एक प्रसिद्ध सिद्धांत असा सांगतो की, एका गोष्टीने अनेक समस्या दूर करणे असा या symbol चा अर्थ आहे. म्हणजे USB च्या माध्यमातून तुम्ही एका पोर्ट मध्ये कितीतरी डिव्हाईस कनेक्ट करू शकता. पूर्वी डिव्हाईस कनेक्ट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पोर्टचा वापर करावा लागायचा. म्हणजेच माउस साठी  वेगळा पोर्ट, कीबोर्डसाठी वेगळा पोर्ट ई.

यावरून असे सिद्ध होते की, symbol वर असलेले चौकोन, त्रिकोण आणि वर्तुळ सारखे भूमितीय चिन्ह असे दर्शवतात की हा एक Standard पोर्ट आहे.


usb-symbol-marathipizza03

स्रोत

तसेच हा प्रसिद्ध सिद्धांत असेही सांगतो की  हा symbol म्हणजे  Neptune च्या त्रिशूळची कॉपी असू शकतो. त्रिशूळ ज्याप्रमाणे शक्तीचे प्रतिक आहे त्याचप्रमाणे USB symbol चा त्रिशूळ तांत्रिक शक्तीचा प्रतिक असावा.

त्याचबरोबर या USB symbol वर असणाऱ्या प्रत्येक चिन्हाचा देखील काहीना काही अर्थ आहे. यावर असलेला बाण/त्रिकोण Serial Data चे प्रतिक आहे, वर्तुळ हे 5V चे प्रतिक आहे ज्या वोल्टेजवर हे काम करते, तसेच चौकोन त्याचे ग्राउंड वोल्टेजचे प्रतिक आहे.

usb-symbol-marathipizza04

स्रोत


काय? आता लक्षात आला ना या USB symbol मागचा अर्थ! मग इतरांनाही सांगा की!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?