महाराष्ट्राचा ‘मांझी’ ज्याने डोंगर फोडून ४० किमीचा रस्ता उभारला!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

दशरथ मांझी या व्यक्तीबद्दल आता सर्वांनाच माहिती आहे. ‘माऊंटन मॅन’ म्हणून जगभरात त्यांचे नाव पोचले आहे. डोंगर फोडून त्यातून रस्ता निर्माण करणाऱ्या या अवलियाने एक वेगळाच प्रेरणादायी आदर्श समाजापुढे उभा केला होता. त्यांच्या या अचाट कामामुळे गावकऱ्यांचे कष्ट कमी झाले. त्यांना थेट डोंगरापलीकडे जाणारा शोर्टकट मिळाला. ‘नवाजुद्दिन सिद्दिकी’ याची प्रमुख भूमिका असणारा ‘मांझी द माऊंटन मॅन’ या चित्रपटाने तर घराघरामध्ये त्यांची रोमाचक गाथा पोचवली. आता तुम्हाला आम्ही अशीच एक गोष्ट सांगणार आहोत जी एकूण तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि अभिमान देखील!

rajaram-bhapkar-marathipizza
http://rajasthanpatrika.patrika.com

दशरथ मांझी यांना तर तुम्ही भेटलात आता भेटा महाराष्ट्राच्या ‘माऊंटन मॅन’ला, ज्यांनी गेल्या ५७ वर्षांमध्ये प्रचंड मोठा डोंगर फोडून ४० किमी लांबीचा रस्ता तयार केला. महाराष्ट्रात राहून अजूनही आपल्याला ही गोष्ट माहित कशी नाही असा विचार करत असालं तर हे पूर्ण प्रकरण तुम्ही जाणून घेतलंच पाहिजे.

महाराष्ट्राच्या या माऊंटन मॅनचे नाव आहे- राजाराम भापकर!

अहमदनगर जिल्ह्यातील गुंडेगाव या गावात ८४ वर्षीय राजाराम भापकर वास्तव्य करतात. शिक्षकी पेशामध्यें असल्याने संपूर्ण प्रदेशभर त्यांना भापकर गुरुजी म्हणून ओळखले जाते. गुंडेगावामधील प्रत्येक व्यक्तीसाठी ते आदर्श आहेत आणि म्हणूनच गावात त्यांना प्रतिष्ठेचे स्थान आहे.

rajaram-bhapkar-marathipizza01
http://www.theweek.in

स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही गुंडेगाव गावातून इतर गावांना जोडणारा धड रस्ता नव्हता. सरकारी आश्वासने देखील हवेतच विरली. १९५७ ते १९९१ या काळात भापकर गुरुजी कोळेगाव येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. तेव्हा त्यांना आपल्या गावामध्ये परत यायचे असल्यास तब्बल तीन गावे पायी पालथी घालण्याशिवाय गत्यंतर नव्हते. कारण गुंडेगावाच्या समोर संतोषा नावाचा भला थोरला डोंगर ठाण मांडून बसला होता. तो पार करणे शक्य नव्हते, म्हणून भापकर गुरुजी आणि इतर गावकऱ्यांना देखील ही पायपीट सोसावी लागायची.

भापकर गुरुजींनी शासनाकडे पाठपुरवठा केला आणि डोंगर फोडून त्यातून रस्ता काढण्याची विनंती केली, पण शासकीय अधिकाऱ्यांकडून योग्य तो प्रतिसाद लाभला नाही.

शेवटी आता स्वत:हूनच काहीतरी करावे लागेल असा विचार करून भापकर गुरुजींनी स्वत: पुढाकार घेतला. त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने रस्ता तयार करण्यास सुरुवात केली. आपल्याच भल्यासाठी काम होत आहे हे पाहून गावकरी देखील मदतीला आहे. पण कोणीही फुकट काम करण्यास तयार होईल अशी स्थिती नव्हती आणि भापकर गुरुजींच्या मागे आर्थिक सहाय्य देखील नव्हते. शेवटी स्वत:चा पगार कामगारांना देऊन भापकर गुरुजींनी कामाचा श्रीगणेशा केला.

rajaram-bhapkar-marathipizz02
http://www.theweek.in

जवळपास ५७ वर्षे ते दरमहिन्याला काहीशी रक्कम घरखर्चासाठी काढून ठेवायचे आणि बाकी सगळा प्रकार या समाजकार्यात अर्पण करायचे. कधी कधी तर Excavators सारखी यंत्रे मागवावी लागली, त्यांचा खर्च देखील पूर्णपणे भापकर गुरुजींनी केला. आपली जीवनभराची कमाई, पेन्शन अशी सर्व जमापुंजी त्यांनी या कामामध्ये लावली. हे करताना त्यांना बिलकुल वाईट वाटत नसे कारण त्यांच्या डोळ्यासमोर एकच लक्ष्य होते ते म्हणजे गुंडेगावामधून निघणारा प्रशस्त रस्ता!

अखेर १९९७ साली त्यांच्या या कष्टाचे चीज झाले आणि गुंडेगाव ते कोळेगाव असा रस्ता तयार झाला. पूर्वी जे अंतर २९ किमी होते ते या रस्त्यामुळे केवळ १० किमी एवढे झाले. त्यांनी असे तब्बल ७ रस्ते उभारले जे आसपासच्या गावांना देखील जोडण्यात आले. त्यामुळे गुंडेगावातून कोठेही जाणे आता सोपे झाले आहे.  सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारकडून एक रुपयाही न घेता त्यांनी ही सर्व किमया साधली.

rajaram-bhapkar-marathipizza03
www.youtube.com

आजही गुंडेगाव गावमध्ये भापकर गुरुजी वास्तव्यास आहेत. त्यांनी करून दाखवलेल्या या आभाळाएवढ्या कार्यामुळे जनमानसात त्यांच्याविषयी उपकाराची भावना आहे पण आजही भापकर गुरुजी अगदी साधे राहणीमान जगतात. त्यांच्याजवळ केवळ त्यांची आवडती Fiat Padmini ही कार आहे, ज्यामधून ते फेरफटका मारत असतात.

rajaram-bhapkar-marathipizza04
http://inextlive.jagran.com

महाराष्ट्राच्या या ‘माऊंटन मॅन’ खरंच मानाचा सलाम!!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?